पोस्ट्स

जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आस्तिकशिरोमणी चार्वाक ❤️🌼

इमेज
चार्वाक या तत्त्वज्ञानाबद्दल जेव्हा मला कोणी  विचारतो तेव्हा मी त्यांना नेहमी एकच पुस्तक सुचवतो डॉ. आ. ह. साळुंखे लिखित "आस्तिकशिरोमणी चार्वाक".  हे पुस्तक चार्वाक तत्त्वज्ञानाची सखोल नि नवी दृष्टी देणारं आहे. आपल्याकडे चार्वाक म्हटलं की लगेच ‘नास्तिक’, ‘भोगवादी’, ‘धर्मद्रोही’ अशा चुकीच्या संकल्पना पुढे येतात. पण या पुस्तकातून लेखकाने चार्वाक हा नास्तिक नाही, तर खऱ्या अर्थाने ‘आस्तिकशिरोमणी’ आहे असं ठामपणे सांगितलं आहे. कारण चार्वाक वेदांवर, देवावर, आत्म्यावर विश्वास न ठेवता मनुष्य, त्याचं शरीर, अनुभव, बुद्धी नि प्रत्यक्ष जीवन यावर आधार ठेवतो. तो परमेश्वर, आत्मा, पुनर्जन्म या गोष्टी नाकारतो पण माणसाचं सुखदुःख, न्याय-अन्याय, विवेक अन् समता यांवर विश्वास ठेवतो. हे पुस्तक एकूण आठ भागांमध्ये विभागलेलं असून चार्वाकांचे मूळ ग्रंथ कसे नष्ट झाले, तरी त्यांचे विचार कसे जिवंत राहिले, त्याचा इतिहास, तत्त्वज्ञान, सामाजिक दृष्टिकोन, स्त्री-पुरुष समानतेविषयीचे विचार, यज्ञ-धर्म-जातिव्यवस्थेविषयी त्यांचा विरोध नि माणसाच्या स्वातंत्र्याचा सन्मान या सर्व गोष्टी खूप समजूतदारपणे मांड...

भंगार...💔🌼

इमेज
एखादं पुस्तक असतं, जे वाचताना ते आपल्याला आपल्या जागेवर बसूनच हेलावून टाकतं. भंगार असंच एक पुस्तक आहे.मागे दलित साहित्यातील सर्वच आत्मचरित्र वाचल्यानंतर मी जेव्हा हे पुस्तक उघडलं नि वाचत गेलो नि हे वाचल्यानंतर लक्षात आलं की ही फक्त अशोक जाधव यांची गोष्ट नाही... ही त्या संपूर्ण गोसावी समाजाची वेदना, जगणं नि त्यातून वर यायचा संघर्ष आहे. अशोक जाधव नावाचा एक लहान मुलगा, उकिरड्यावर, कचऱ्यातून भंगार गोळा करत मोठा होतो. भीक मागणं, अपमान सहन करणं, भुकेलेपणावर झोपणं नि आईला रोज दारु पिऊन येणाऱ्या बापाकडून शिव्या-मार खाणं हे त्याचं बालपण असतं. त्या समाजात शिक्षण म्हणजे “बिगडणं” असं समजलं जातं. पण अशोकला शाळा बघून शिकायचं वेडच चढतं. अन् तिथून सुरू होतो त्याचा प्रवास अंधारातून प्रकाशाकडे. तो शाळेत जातो, चोरी करून का होईना पण पुस्तक मिळवतो नि बी.ए., बी.एड्. होतो. शिक्षक होतो. शिक्षक म्हणून काम करताना तो समाजाच्या खऱ्या प्रश्नांवर बोट ठेवतो, बोलतो, प्रश्न विचारतो. हेच त्याचं वेगळेपण ठरतं.त्याच्या समाजात जातपंचायत म्हणजे सर्वोच्च सत्ता. पण तिथे न्याय नाही, केवळ दहशत असते. महिलांना काहीच क...

माती, पंख आणि आकाश... 🌼❤️

इमेज
हे पुस्तक मी प्रथमच वाचलं ते 2021 च्या लॉकडाऊन काळात. त्या वेळी बाहेरचं सगळं बंद असताना माझ्या मनातल्या विचारांमध्ये फार काही सुरू होतं नि अशाच वेळी ‘माती, पंख आणि आकाश’ हे अप्रतिम पुस्तक माझ्या हातात आलं. अक्षरनामा पोर्टवरील एक लेख वाचून मी हे पुस्तक वाचायला घेतलं नि वाचतच सुटलो. मला आठवतं हे वाचल्यानंतर मी फार भारावून गेलं होतं.या पुस्तकातून मला सकारात्मक विचार, प्रेरणा नि आत्मविश्वास याचं एक वेगळंच बळ मिळालं होतं ज्याची त्याकाळी मला फार गरज होती. तेव्हा हे पुस्तक वाचल्यानंतर आपण भविष्यात या लेखकाला प्रत्यक्ष भेटु असं अजिबात विचार केलं नव्हतं.पण गेल्या वर्षी आमच्या कॉलेजमध्ये Colloquy या कार्यक्रमासाठी सर आले. त्यांची मुलाखत होती त्यावेळी मी आवर्जून त्यांना भेटलो.वेळेअभावी जरी फारसं बोलणं झालं नाही तरीही पुस्तकाबद्दल थोडंफार बोललो. तो क्षण आजही लक्षात आहे.तेव्हापासून मला दोन शब्द या पुस्तकाबद्दल लिहायचं होतं जेणेकरून इतरांना या पुस्तकाबद्दल माहिती होईल,पण हेक्टिकमुळे ते तेव्हा काही जमलं नाही पण आज अखेर माझा हा छोटासा अनुभव लिहितोय. हे पुस्तक वाचताना सतत असं वाटत की, एका स...

युगंधर...❤️ 🌼

इमेज
मी सर्वप्रथम कधी वाचली हे मला व्यवस्थित आठवतं नाही पण हि माझ्या वाचन प्रवासातील सर्वांत पहिली मोठी कादंबरी होती जी तब्बल 978 पेजेसची होती. जी मी वाचून पूर्ण केली होती नि वाचताना अक्षरशः हरवून गेलो होतो.या कादंबरीने मला श्रीकृष्णाची एक वेगळी ओळख करून दिली होती.इथपर्यंत श्रीकृष्ण हे माझ्यासाठी फक्त टीव्ही मालिकेतील एका पात्रापुरतेच मर्यादित होते.या कादंबरीत मी प्रथमच त्यांच्याबद्दल वाचत होतो जे मनाला फार आनंद देणारा अनुभव होता माझ्यासाठी. आपण सर्वच लहानपणापासून श्री कृष्णाच्या कथा ऐकत, वाचत नि बघत आलोय पण त्या सगळ्या कथा नेहमी एकाच चौकटीतल्या, चमत्कारी नि देवत्वाच्या रंगात रंगलेल्या असायच्या. पण युगंधर या कादंबरीने मात्र या चौकटीला छेद दिला नि यातून श्री कृष्णाला एका अत्यंत मानवी, भावुक नि संघर्षशील रूपात आपल्यासमोर उभं केलं आहे. ही कादंबरी वाचताना मला वाटलं, आपलं आयुष्यही कधीकधी असंच असतं बाहेरून सगळं ठिक असं वाटतं, पण आतून मात्र सतत संघर्ष, द्वंद्व, तडजोड नि काहीतरी शोध सुरूच असतो. शिवाजी सावंतांनी ‘युगंधर’ मध्ये श्री कृष्णाच्या जीवनातील अनेक पैलू उलगडले आहेत. कादंबरीची म...

द कृष्णा की ...🌼❤️

इमेज
हि कादंबरी म्हणजे इतिहास, पौराणिकता नि थरार यांचं एक भन्नाट मिश्रण आहे. अश्विन सांघी यांची लेखनशैली म्हणजे माहिती नि कल्पनेचं सुंदर कॉम्बिनेशन आहे. सुरुवातीला असं वाटतं की ही एक साधी गुन्हेगारी गोष्ट असेल, पण जसं-जसं आपण वाचत जातो, तसं आपण एका ऐतिहासिक शोधयात्रेत सामील होतो. कथा सुरू होते एका खुनापासून जेव्हा एका नामवंत इतिहासकाराचा खून होतो, तेव्हा त्याचा मित्र प्रोफेसर रवी मोहन सैनी याच्यावर संशय घेतला जातो. पुढे प्रोफेसर सैनी स्वतःच्या निर्दोषतेचा शोध घेत असतानाच तो एका मोठ्या गुपितात अडकतो “कृष्णा की” चं गुपित ही किल्ली केवळ पुराणांमधली कल्पना नाही, तर त्यामागे खूप सखोल संशोधन, ऐतिहासिक पुरावे नि धार्मिक सुत्रे जोडलेली आहेत. या कथेमध्ये लेखकाने श्री कृष्णाच्या जीवनातील अनेक प्रसंग वापरले आहेत पण ते केवळ आध्यात्मिक नसून, वैज्ञानिक, सामाजिक संदर्भात जोडले आहेत. पुस्तकात असे अनेक विविध  संदर्भ येतात . उदा. द्वारका शहराचं रहस्य, समशेरपूरचा खजिना, वेदांमधील संख्यांचं गणित, आर्यवंशाचा इतिहास जे वाचताना आपण भारावून जातो. भारतीय इतिहासाची नि पौराणिकतेची नवी ओळख करून देणं...

माझ्या लिखाणाची गोष्ट...❤️🌼

इमेज
आज मी माझ्या खूप आवडत्या लेखकांचं अनिल अवचट (बाबा) यांचं माझ्या लिखाणाची गोष्ट हे पुस्तक वाचून पूर्ण केलं... खरंतर हे पुस्तक एकदम आपलं वाटलं. अगदी जसं कुणी आपल्याला त्यांच्या मनातलं बोलून दाखवतंय तसं. बाबांचं लेखन हे खूप साधं, सरळ नि थेट असतं. त्यांनी डॉक्टर म्हणून काम करताना अनुभवलेली माणसांची दुःख, अडचणी, मानसिक जखमा हे सगळं त्यांना लिहायला भाग पाडत गेलं. त्यांना लवकरच जाणवलं की फक्त औषधं देऊन काही बदल होत नाही, माणसांच्या आयुष्यातल्या प्रश्नांवर खोलवर विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे. मग त्यांनी समाजातल्या अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, विषमता, शिक्षण, कारागृहातली माणसं, कामगार, शेतकरी, कलाकार, कार्यकर्ते या सगळ्या विषयांवर खूप लिहिलं. त्यांच्या लेखनात कुठेही अवाजवी शब्द नाहीत, भारी भाषेचा आव नाही पण तरी ते थेट मनाला भिडतं. या पुस्तकात त्यांनी अगदी सहजपणे सांगितलंय की त्यांना कोणकोणते प्रसंग भिडले, कोणत्या व्यक्तींच्या बोलण्याने अंतर्मन हललं, कोणत्या ठिकाणी फिरताना काही वेगळी जाणीव झाली नि त्यातून ते लिहायला लागले. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या लेखनप्रवासाची गोष्ट त्यांनी का अन् क...

खऱ्या शिक्षणाच्या शोधात ❤️🌼

इमेज
आपल्याला लहानपणापासून शिकवले जातं की अभ्यास करा, परीक्षेत चांगले गुण मिळवा नि पुढे जाऊन चांगली नोकरी मिळवा. पण शिक्षण म्हणजे नुसतं हेच का ? मुलांना शाळेत खरोखर माणूस म्हणून घडवलं जातं का? त्यांच्या जिज्ञासेला, कल्पनाशक्तीला, आत्मभानाला पोसण्याचं काम शाळा करतं का? याच विचारांनी झपाटलेला शिक्षक डेव्हिड ग्रिबल सरांनी "खऱ्या शिक्षणाच्या शोधात" हे पुस्तक लिहिलं आहे. लेखक स्वतः पारंपरिक शिक्षणव्यवस्थेतील शिक्षक होते. डार्टिंग्टन हॉल स्कूलमध्ये शिकवताना त्यांनी अनुभवलं की शाळा ही फक्त शिकवण्याची जागा नसून एक प्रयोगशाळा असते जिथे विचार, स्वातंत्र्य, सहभाग अन् आनंद असायला हवा. जेव्हा ही शाळा बंद झाली, तेव्हा त्यांनी सँड्स स्कूल सुरू केली जी अधिक खुले, स्वायत्त नि मुलांना केंद्रस्थानी ठेवणारी शाळा होती. या पुस्तकात त्यांनी जगभरातील 14 वेगवेगळ्या शाळांची सफर घडवून आणली आहे. या शाळा इंग्लंड, अमेरिका, भारत, जपान, इस्रायल, इक्वाडोर, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड या देशांमध्ये आहेत. प्रत्येक शाळेची पद्धत, मूलभूत तत्त्वं, मुलांसोबतचा संवाद नि शिकवण्याची शैली वेगळी आहे पण एक समान धागा...

भटक्यांचे लग्न ...🌼💜

इमेज
हे पुस्तक भारतातल्या भटक्या-विमुक्त जातींच्या विवाह पद्धतींचा एक अनमोल आणि रोचक दस्तऐवज आहे. उत्तम कांबळे यांनी आपल्या पत्रकारितेच्या अनुभवातून आणि संवेदनशील दृष्टिकोनातून कैकाडी, कूचकोरवी, पामलोर, घिसाडी, कुडमुडे जोशी, पिंगळे जोशी, पोपटवाले जोशी, ओढ बेलदार, राजपूत बेलदार, कांजरभाट, डोंबारी, गोसावी, लमाणी, पंचाळ, वड्ड, डवरी, फिरस्ते कोळी, फासेपारधी, गोपाळ गोंधळी, भामटे, बागडी, मांगगारुडी, वैदू, नंदीवाले, वंजारी, कंझार, हेळवे, श्रीरामभक्तरू आणि रावळ या जातींच्या लग्न परंपरांचं इतकं जिवंत वर्णन केलं आहे, की वाचताना आपण त्यांच्या अनोख्या जगात हरवतो. हे पुस्तक भटक्या जातींच्या आयुष्याला नि त्यांच्या सांस्कृतिक वैभवाला समजून घेण्याचा एक खिडकीसारखा अनुभव आहे. भारतात असंख्य जाती आहेत नि प्रत्येक व्यक्ती आपापल्या जातीत जन्माला येऊन आयुष्य जगतो. पण भटक्या-विमुक्त जातींचं आयुष्य वेगळंच आहे त्यांना गाव नाही, शासकीय दप्तरात नाव नाही, सामाजिक प्रतिष्ठा नाही. डोक्यावर फाटकं आभाळ अन् पायाखाली दुभंगलेली जमीन घेऊन ते भाकरीच्या तुकड्यासाठी गावोगावी भटकतात. त्यांचं राहणीमान, भाषा, रीतीरिवाज नि लग्न पद्ध...

वाट तुडवताना ...❤️🌼

इमेज
221 पानांचं हे पुस्तक फक्त आत्मचरित्र नाही तर एका भुकेल्या मनाचा पुस्तकांशी जोडलेला प्रवास आहे. उत्तम कांबळे यांनी आपल्या खडतर आयुष्यातील संघर्ष, पुस्तकांप्रतीची ओढ नि वाचनाने त्यांचं आयुष्य कसं घडवलं, हे इतक्या सोप्या व प्रामाणिक शब्दांत मांडलं आहे, की वाचताना आपण त्यांच्या प्रत्येक सुख-दु:खात हरवून जातो. ‘वाट तुडवताना’ ही उत्तम कांबळे यांच्या बालपणापासून पत्रकार नि संपादक होण्यापर्यंतची कहाणी आहे. दारिद्र्य, जातीचा अभाव नि भुकेने जाळलेल्या मनात पुस्तकांची भूक कशी निर्माण झाली, याचा हा आलेख आहे. “रोज एक पाटी शेण गोळा करतो, मग देशील पुस्तक?” असं विचारणाऱ्या मुलाला आई म्हणते, “शेणकुट्याचं पैसं पुस्तकावर उधळलास तर खाशील काय?” या दोन प्रश्नांच्या संघर्षात कांबळे यांचं आयुष्य घडत गेलं. त्यांनी शेण गोळा केलं, डिंक जमा केलं, खांद्याला घट्टे पडल्यावर पाणी वाहिलं, कंपाउंडर म्हणून काम केलं. भुकेने आतडी जळत असताना भुताचा नैवेद्य खाल्ला, नळाला तोंड लावून पाणी पिऊन भूक मारली. पण या सगळ्यात त्यांची पुस्तकांची भूक कधी कमी झाली नाही, उलट ती तीव्र होत गेली. ही भूक त्यांना चार्वाक, बुद्ध, गांधी, आंबेड...

चिखल, घाम आणि अश्रू....❤️🌼

इमेज
चिखल, घाम आणि अश्रू’ (Mud, Sweat and Tears) हे बेअर ग्रील्स यांचं आत्मचरित्र वाचताना मला नेहमीच असं वाटतं की माणसाच्या आयुष्यातील खरे संघर्ष हे बाहेरून दिसणाऱ्या संकटांपेक्षा आतल्या मनाच्या लढाईत अधिक असतात.बेअर ग्रील्स हा नाव जगभरात साहस, धाडस नि जिद्दीचा प्रतीक आहे. त्यांच्या जीवनाचा प्रवास अगदी लहानपणापासूनच वेगळा होता. वडिलांसोबत गिर्यारोहण, जंगलात फिरणं, निसर्गासोबत जुडणं या सगळ्या गोष्टींनी त्यांच्या मनात साहसाची बीजं पेरली. शाळेतील शिक्षणात ते फारसे पुढे नव्हते, पण निसर्गाशी, संकटाशी सामना करण्याची त्यांची तयारी लहानपणापासूनच होती. मला स्वतःला निसर्गात भटकायला आवडतं, नि बेअर ग्रील्स च्या अनुभवातून मला हे जाणवलं की, निसर्ग आपल्याला नम्र, धैर्यवान नि जिद्दी बनवतो. बेअर यांच्या जीवनातील सर्वात मोठा टप्पा म्हणजे त्याचा SAS (Special Air Service) मध्ये निवड होण्यासाठीचा संघर्ष. SAS मध्ये निवड होणं म्हणजे जगातील सर्वात अवघड नि कठोर प्रशिक्षण प्रक्रियांपैकी एक. बेअर ने या प्रशिक्षणात जे शारीरिक नि मानसिक कष्ट सहन केले, ते वाचताना अंगावर काटा येतो. दिवस-रात्र चालणं, चिखलात झो...

Fund for Humanity मध्ये कैलास जावळे या मुलाच्या उपचारासाठी फंडिंग हिशोब 🌼

इमेज
फेब्रुवारी 2025 मध्ये आपण सर्वांनी मिळून कैलास जावळे (वय 20, सुलतानपूर, ता. लोणार, जि. बुलढाणा) यांच्या मेडिकल उपचारांसाठी ₹31,400 ची फंडिंग केली होती. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे कैलास यांना फिनिक्स हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर येथे उपचार मिळाले. आता मी आपल्या सर्वांसमोर पारदर्शकपणे हिशोब सादर करत आहे.😊 खर्चाचा तपशील खालीलप्रमाणे...❤️ हॉस्पिटल बिल: ₹13,000 (ICU, शेअरिंग रूम, डॉक्टर भेटी, इ.) औषध आणि वैद्यकीय साहित्य: ₹10,890.77 (न्यू सप्तगिरी, हेल्थकेअर, सुमनांजली, स्वस्त औषधी सेवा) डायग्नोस्टिक्स/पॅथॉलॉजी: ₹3,700 (CT Brain, CBC, KFT, ELE) प्रवास खर्च: ₹2200 (गाडी भाडे, इतर) एकूण खर्च: ₹30,790.77 शिल्लक रक्कम: ₹609.23टिप्पणी:शिल्लक रक्कम (₹609.23) कैलास यांच्या पुढील वैद्यकीय गरजांसाठी (जसे की फॉलो-अप औषधे) वापरली जाईल किंवा त्यांच्या कुटुंबाला परत केली जाईल. सर्व बिले नि पावत्या इथे दिल्या आहेत चेक करू शकता. तुमच्या सर्वांच्या उदार सहभागामुळे कैलासला वेळेवर उपचार मिळाले. तुमच्या विश्वास नि पाठिंब्याबद्दल मनापासून धन्यवाद नि प्रेम. ...

साद घालतो कालाहारी ...❤️🌼

इमेज
कधी कधी एका पुस्तकात इतकी ताकद असते की ते आपल्याला आपल्या खुर्चीवर बसूनही हजारो किलोमीटर दूर कुठल्याशा अफाट प्रदेशात घेऊन जातं. “साद घालतो कालाहारी” हे असंच एक पुस्तक आहे. मूळ इंग्रजी शीर्षक Cry of the Kalahari, लेखक आहेत मार्क आणि डेलिया ओवेन्स एक अमेरिकन जोडपं जे प्राणीशास्त्र शिकून थेट आफ्रिकेतील कालाहारी वाळवंटात पोचतं. त्यांच्या त्या अफलातून 7 वर्षांच्या प्रवासाचा, संघर्षांचा, अनुभवांचा नि निसर्गाच्या गाभ्यात केलेल्या निरीक्षणांचा दस्तऐवज म्हणजेच हे पुस्तक. हे पुस्तक वाचताना सुरुवातीला वाटतं की आपण एखादी साहसी कादंबरी वाचतोय, पण पुढे पुढे कळतं की ही तर खरीखुरी गोष्ट आहे. मार्क नि डेलिया हे दोघंही प्राणीप्रेमी. त्यांना मोठ्या मांसाहारी प्राण्यांचं वर्तन अभ्यासायचं होतं नि त्या अभ्यासाचा उपयोग आफ्रिकेतील प्राणिसंवर्धनासाठी व्हावा असं त्यांचं प्रमाणिक स्वप्न होतं. त्यामुळे अगदी थोडकं सामान फक्त एक दुर्बिण, काही कपडे नि थोडे पैसे घेऊन ते थेट बोट्सवाना या देशात पोचतात. तिथे त्यांनी एक थर्ड हँड लँड रोव्हर घेतली नि कालाहारी वाळवंटाच्या अंतर्भागात जिथे ना रस्ते आहेत, ना माणसं तिथे जाऊन रा...

मुसाफिर....❤️🌼

इमेज
अच्युत गोडबोले यांचं ‘मुसाफिर’ हे आत्मचरित्र मी वाचलं, त्याला बरीच वर्षं झाली असली तरीही या पुस्तकाची मोहिनी आजही माझ्या मनावर तशीच आहे. या पुस्तकाबद्दल माझा अनुभव मी असंख्य वेळा लिहायचं ठरवलं, पण ते काही जमलं नाही. मात्र, काल रात्री एका मित्राने सुचवल्यामुळे दोन ओळी लिहितोय जेणेकरून ज्यांनी अजून हे अफाट आत्मचरित्र वाचलं नसेल, त्यांना याबद्दल कल्पना येईल नि ते आवर्जून वाचून समृद्ध होतील.🌼 मुसाफिर एक स्वप्नं, ध्येयं नि आयुष्यातील चढ-उतारांमधून प्रवास करणाऱ्या एका मुसाफिराची प्रेरणादायी गाथा आहे. अच्युत गोडबोले, एक मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा, जो आपल्या बुद्धिमत्तेच्या, मेहनतीच्या नि सकारात्मक दृष्टिकोनाच्या जोरावर आयटी, साहित्य, संगीत नि समाजकार्य अशा विविध क्षेत्रांत यशस्वी झाला, त्याची ही कहाणी प्रत्येकाला काहीतरी शिकवते. ‘मुसाफिर’ वाचताना मला जाणवलं, की आयुष्य हा एक प्रवास आहे, अन्  तो कसा जगायचा, हे आपल्या हातात आहे.मुसाफिर’ हे अच्युत गोडबोले सरांच आत्मचरित्र आहे, जे २०१२ मध्ये प्रकाशित झालं नि फार लोकप्रिय झालं. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या आयुष्याचा प्रवास बालपणापासून ते आय...

श्यामची आई....❤️🌼

इमेज
आज साने गुरुजींच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाची आठवण येणे साहजिकच आहे नि त्यामुळे मी याबद्दल मागे लिहलेलं अनुभव इथे देतोय जेणेकरून अजूनपर्यंत ज्यांनी हे पुस्तक वाचत नसेल तर वाचतील..🌼 हे पुस्तक आईच्या प्रेमाचा, संस्कारांचा नि माणुसकीचा एक खजिना आहे. साने गुरुजींनी आपल्या आई, यशोदाआई, यांच्या आठवणींना शब्दबद्ध केलं नि मराठी साहित्यात एक अजरामर कृती निर्माण केली.‘श्यामची आई’ हे साने गुरुजींचं आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे, ज्यात श्याम (म्हणजेच साने गुरुजी) आपल्या बालपणीच्या आठवणी सांगतात. हे पुस्तक त्यांनी 1933 मध्ये नाशिकच्या तुरुंगात असताना अवघ्या पाच दिवसांत लिहिलं 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी. 42 रात्रींच्या कथांमधून त्यांनी आपल्या आईच्या प्रेमाचा, त्यागाचा नि संस्कारांचा प्रवास मांडला आहे. प्रत्येक रात्र वाचताना आपण कोकणातल्या गावात, सह्याद्रीच्या सान्निध्यात नि समुद्रकिनारी हरवतो.पुस्तकात यशोदा आईचं प्रेम कसं नितळ आहे, हे दिसतं. ती श्यामला सांगते, “प्रेम देण्यातच खरा आनंद आहे.” माणसांवर, प्राण्यांवर, झाडांवर प्रेम करायला ती शिकवते. “तळव्याला म...

राधेय ...❤️

इमेज
अखेर काही दिवसांपूर्वी राधेय ही रणजित देसाई सरांची मराठी साहित्यात महत्वपूर्ण असलेली कादंबरी वाचून पूर्ण केली.जी महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारित आहे. 1973 साली प्रकाशित झालेली ही कादंबरी फार वाचनीय आहे.कर्णाच्या जीवनातील अंतर्गत द्वंद्व, त्याची वीरता, त्याग नि सामाजिक अन्याय यांचे मार्मिक चित्रण या कादंबरीतून केले आहे, ज्यामुळे ती वाचकांसाठी एक पर्वणी आहे. पांडवांचा सावत्र भाऊ असूनही ‘सूतपुत्र’ म्हणून हिनवल्या गेलेल्या कर्णाची कहाणी ही त्याच्या जन्मापासूनच सुरू झालेल्या संघर्षाची, अपमानाची नि आत्मसन्मानासाठीच्या लढ्याची कहाणी आहे. लेखकांनी कर्णाच्या व्यक्तिरेखेला एक मानवी चेहरा दिला आहे, ज्यामुळे वाचकांना त्याच्या भावनिक अन् मानसिक द्वंद्वाशी जोडता येते. कादंबरीची सुरुवातच मुळात पांडवांना कर्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या खऱ्या ओळखीची जाणीव होत असताना होते नि मग कर्णाचा संपूर्ण जीवनप्रवास उलगडत जातो. कर्णाला ‘राधेय’ का म्हणतात? याचा उलगडा या कादंबरीच्या नावातच आहे. कर्णाला त्याच्या आई राधेच्या नावाने ओळखले जाते, जरी तो कुंतीचा पुत्र असला तरी. लेखकांनी कर्णाच्या या ओळखीच्या...

वपुर्झा....🌼❤️

इमेज
व.पु. काळे यांचं हे पुस्तक हातात घेतलं नि वाचताना मला जणू आयुष्याच्या रंगीबेरंगी सुगंधांनी भरलेल्या अत्तराच्या कुपीत हरवून गेल्यासारखं वाटलं. ही 258 पृष्ठसंख्या असलेली ललित लेखसंग्रहाची कादंबरी एक सुंदर अनुभव आहे जिथे आपण माणसाच्या साध्या पण खोल भावनांमध्ये, त्याच्या रोजच्या जगण्यातल्या सुख-दु:खात नि विचारांच्या लाटांमध्ये गुंतत जातो. व.पु. चं लेखन इतकं हृदयाला भिडणारं अन् सहज आहे की त्यांच्या शब्दांनी मला माणुसकीचा, प्रेमाचा नि आयुष्याचा खरा सुगंध जाणवला. त्यांनी शब्दांतून जीवनातल्या छोट्या छोट्या क्षणांचा असा खजिना उलगडलाय की मी वाचता वाचता त्या भावविश्वात रमलो.‘वपुर्झा’ ही कोण्या कथा-कहाणी वगैरेचं पुस्तक नाही, तर व.पु. यांच्या लघुकथा, ललित लेख नि वैचारिक तुकड्यांचा संगम आहे, जो माणसाच्या नात्यांचा नाजूकपणा, त्यातली गुंतागुंत अन् आयुष्याची साधी सत्यं उलगडतो.  व.पु. म्हणतात, “कोणतंही पान उघडा आणि वाचा, ‘वपुर्झा’ हे पुस्तक कोणासाठी? ज्यांना मोत्यातील चमक बघायची आहे अशा वेड्यांसाठी ” हे वाक्य मला खूप आवडलं, कारण खरंच यातील प्रत्येक लेख जणू एका वेगळ्या अत्तरासारखा आहे.आपल...

द दा विंची कोड: रहस्य अन् थराराचा अविस्मरणीय प्रवास 🌼

इमेज
डॅन ब्राऊन यांची ‘द दा विंची कोड’. ही साधारण 454 पानांची कादंबरी वाचताना मला जणू एका गूढ खजिन्याच्या शोधात पॅरिसच्या रस्त्यांवरून लंडनच्या गल्लीबोळांपर्यंत नि त्याही पलीकडे स्कॉटलंडच्या गडद जंगलांपर्यंत भटकल्यासारखं वाटलं.हे एक असा अनुभव आहे जिथे आपण इतिहास, कला, धर्म अन् रहस्य यांच्या एका गुंतागुंतीच्या जाळ्यात सापडत जातो. डॅन ब्राऊन यांचं लेखन इतकं ताकदवान  आहे की लुव्हर संग्रहालयातली रहस्यमयी रात्र, प्राचीन गुप्त संस्थांचा थरार नि होली ग्रेलचा शोध माझ्या डोळ्यांसमोर जिवंत झाला. त्यांनी शब्दांतून एका गूढ विश्वाचा नकाशा इतक्या बारकाईने रंगवलाय की मी वाचता वाचता त्या रहस्याचा एक हिस्सा बनलो होतो. ही कादंबरी पॅरिसच्या लुव्हर संग्रहालयातल्या एका रहस्यमयी खुनाभोवती फिरते. हार्वर्डचा सिम्बॉलॉजिस्ट प्राध्यापक रॉबर्ट लँग्डन नि फ्रेंच क्रिप्टॉलॉजिस्ट सोफी न्युव्हो यांना या खुनाच्या तपासात अनपेक्षितपणे ओढलं जातं. खून झालेला माणूस, जॅक सॉनिए, लुव्हरचा क्युरेटर, मरताना काही गुप्त संदेश, कोड अन चिन्हं मागे ठेवतो, जे लिओनार्दो दा विंचीच्या कलाकृतींशी जोडलेले असतात. मला लँग्डनचं त्य...

बनगरवाडी....❤️🌼

इमेज
मारुती चितमपल्ली गुरुजींच्या पुस्तकानंतर मी व्यंकटेश माडगूळकरांच्या लेखनाच्या इतका प्रेमात पडलोय की त्यांची सर्वच पुस्तकं मला हवीहवीशी वाटतात. त्यामुळे मी त्यांची मिळतील ती पुस्तकं भराभर वाचत सुटलोय नि त्यातलंच एक रत्न म्हणजे बनगरवाडी.  ही 132 पानांची छोटीशी पण अफाट कादंबरी वाचताना मला माणदेशच्या धनगरवस्तीच्या मातीत हरवून गेल्यासारखं वाटलं. ही फक्त एक कथा नाही तर एक असा अनुभव आहे जिथे आपण गावकऱ्यांच्या साध्या जीवनात त्यांच्या भाबड्या भावनांमध्ये अन् त्यांच्या छोट्या छोट्या सुखदु:खात गुंतत जातो. माडगूळकरांचं लेखन इतकं जिवंत आहे की बनगरवाडीचं गाव तिथली धूळमाती मेंढ्यांचा आवाज नि गावकऱ्यांचं प्रेमळ मन माझ्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. त्यांनी शब्दांतून माणदेशच्या ग्रामीण जीवनाचा आत्मा इतक्या सुंदरतेने टिपलाय की मी वाचता वाचता त्या गावातलाच एक भाग बनलो. बनगरवाडी ही कादंबरी माणदेशातल्या एका छोट्या धनगरवस्तीवर आधारित आहे जिथे 1938 साली माडगूळकरांनी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी शब्दबद्ध केल्या आहेत. ही कथा आहे एका नवख्या शिक्षकाची जो बनगरवाडीत पहिल्यांदा शिक्षक म्हणून रुजू होतो. गावा...