Fund for Humanity मध्ये कैलास जावळे या मुलाच्या उपचारासाठी फंडिंग हिशोब 🌼
फेब्रुवारी 2025 मध्ये आपण सर्वांनी मिळून कैलास जावळे (वय 20, सुलतानपूर, ता. लोणार, जि. बुलढाणा) यांच्या मेडिकल उपचारांसाठी ₹31,400 ची फंडिंग केली होती. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे कैलास यांना फिनिक्स हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर येथे उपचार मिळाले. आता मी आपल्या सर्वांसमोर पारदर्शकपणे हिशोब सादर करत आहे.😊
खर्चाचा तपशील खालीलप्रमाणे...❤️
हॉस्पिटल बिल: ₹13,000 (ICU, शेअरिंग रूम, डॉक्टर भेटी, इ.) औषध आणि वैद्यकीय साहित्य: ₹10,890.77 (न्यू सप्तगिरी, हेल्थकेअर, सुमनांजली, स्वस्त औषधी सेवा)
डायग्नोस्टिक्स/पॅथॉलॉजी: ₹3,700 (CT Brain, CBC, KFT, ELE)
प्रवास खर्च: ₹2200 (गाडी भाडे, इतर)
एकूण खर्च: ₹30,790.77
शिल्लक रक्कम: ₹609.23टिप्पणी:शिल्लक रक्कम (₹609.23) कैलास यांच्या पुढील वैद्यकीय गरजांसाठी (जसे की फॉलो-अप औषधे) वापरली जाईल किंवा त्यांच्या कुटुंबाला परत केली जाईल.
सर्व बिले नि पावत्या इथे दिल्या आहेत चेक करू शकता.
तुमच्या सर्वांच्या उदार सहभागामुळे कैलासला वेळेवर उपचार मिळाले. तुमच्या विश्वास नि पाठिंब्याबद्दल मनापासून धन्यवाद नि प्रेम.
काही edits असतील किंवा चुकी असेल तर नक्कीच सुचवा मी Edit करेल...❤️🌼
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा