सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼


काही वर्षांपूर्वी युट्यूबवर 'सुपरमॅन ऑफ मालेगाव' ही डॉक्युमेंटरी पहिल्यांदा पाहिली होती नि आजपर्यंत किती वेळा पाहिली याचा हिशोबच नाही. आज पुन्हा एकदा पाहिली नि ठरवलं की या वर काहीतरी लिहावं, जेणेकरून ज्यांनी पाहिली नसेल त्यांना या डॉक्युमेंटरीबद्दल माहिती होईल...😊

'मालेगाव का सुपरमॅन' या खानदेशी चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेवर, नि एकूणच खानदेशातील लोकांच्या चित्रपट बघण्याच्या व बनवण्याच्या असलेल्या अप्रतिम पॅशनवर आधारित ही डॉक्युमेंटरी आहे. कोणत्याही सुविधा नसताना, धार्मिक कट्टरता नि बेरोजगारीचा सामना करत, कुटुंबाची जबाबदारी पेलत, खानदेशवासी फक्त चित्रपट पाहत नाहीत, तर जुगाड करत चित्रपट कसे बनवतात हे पाहणं एक अद्भुत अनुभव आहे. त्यांची चित्रपट बनवण्याची जिद्द आणि पॅशन खूपच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. खूपच कमी संसाधनांचा वापर करून, आपल्या स्थानिक बोली भाषेत सुंदर सामाजिक संदेश देणारा चित्रपट कसा बनवावा, हे यांच्याकडून शिकायला हवं.

मालेगावमध्ये लोकांचा चित्रपट पाहण्याचा उत्साह जसा जोरात आहे, त्यापेक्षा चित्रपट बनवण्याचा उत्साह अनेक पटींनी अधिक आहे. हे दाखवायची गरज नाही कारण युट्यूबवर किंवा जुन्या मोबाईलमध्ये आपण अनेक खानदेशी कॉमेडी क्लिप्स पाहिल्या असतील. खासकरून 'आसिफ अलबेला'यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारत खानदेशी चित्रपटांना एक वेगळी ओळख दिली आहे. यांचा चित्रपट बनवण्याचा उत्साह इतका अफाट आहे की ते कमीत कमी संसाधनं वापरून, उत्कृष्ट सामाजिक संदेश देणारे चित्रपट तयार करतात.

'मालेगाव का सुपरमॅन' हा चित्रपट बनवणारे नासिर शेख नि त्यांच्या टीमच्या जिद्दीला सलाम आहे. या प्रवासातील संघर्ष आणि मेहनतीची झलक पाहताना प्रेरणा नक्कीच मिळते. सर्व सुविधा असूनही आपण कधी काही करू शकत नाही असं म्हणतो, पण यांच्या जवळ काहीही नसतानाही हे लोक हिम्मत करतात नि यश मिळवतात. त्यांच्या कामातील प्रेम आणि पॅशन अफलातून आहे. मालेगावच्या या ध्येयवेड्या लोकांना खरंच सलाम! ❤️

नक्कीच ही डॉक्युमेंटरी पाहा!

©️ Moin Humanist 🖋️✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

जोगवा 💔🌼