माझ्या लिखाणाची गोष्ट...❤️🌼

आज मी माझ्या खूप आवडत्या लेखकांचं अनिल अवचट (बाबा) यांचं माझ्या लिखाणाची गोष्ट हे पुस्तक वाचून पूर्ण केलं... खरंतर हे पुस्तक एकदम आपलं वाटलं. अगदी जसं कुणी आपल्याला त्यांच्या मनातलं बोलून दाखवतंय तसं.

बाबांचं लेखन हे खूप साधं, सरळ नि थेट असतं. त्यांनी डॉक्टर म्हणून काम करताना अनुभवलेली माणसांची दुःख, अडचणी, मानसिक जखमा हे सगळं त्यांना लिहायला भाग पाडत गेलं. त्यांना लवकरच जाणवलं की फक्त औषधं देऊन काही बदल होत नाही, माणसांच्या आयुष्यातल्या प्रश्नांवर खोलवर विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे.

मग त्यांनी समाजातल्या अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, विषमता, शिक्षण, कारागृहातली माणसं, कामगार, शेतकरी, कलाकार, कार्यकर्ते या सगळ्या विषयांवर खूप लिहिलं. त्यांच्या लेखनात कुठेही अवाजवी शब्द नाहीत, भारी भाषेचा आव नाही पण तरी ते थेट मनाला भिडतं.

या पुस्तकात त्यांनी अगदी सहजपणे सांगितलंय की त्यांना कोणकोणते प्रसंग भिडले, कोणत्या व्यक्तींच्या बोलण्याने अंतर्मन हललं, कोणत्या ठिकाणी फिरताना काही वेगळी जाणीव झाली नि त्यातून ते लिहायला लागले. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या लेखनप्रवासाची गोष्ट त्यांनी का अन् कसं लिहायला सुरुवात केली, हे समजून घेण्यासाठी खूपच खास आहे.त्यांचं लेखन केवळ माहिती देणारं नाही, ते अनुभवातून आलेलं आहे  म्हणून वाचताना आपल्यालाही त्या गोष्टी जशाच्या तशा डोळ्यासमोर येतात.

बाबांचं हे पुस्तक वाचताना असं वाटलं की, खरंच मनापासून लिहिणाऱ्याच्या शब्दांना वेगळीच ताकद असते. त्यांनी अनुभवलेलं, जाणलेलं, पाहिलेलं ते इतकं खरं नि प्रामाणिक आहे की वाचताना आपणही त्यांच्या अनुभवात सहभागी होतो.

जर तुम्हाला वाचनाची आवड असेल, किंवा तुम्हाला लिहायला आवडत असेल, तर हे पुस्तक नक्की वाचा.❤️🌼

©️Moin Humanist❤️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼