अरण्याचे अतरंग ❤️

गौतम बुद्ध आणि त्यानंतर हेन्री डेव्हिड थोरो उर्फ थोरो गुरुजी यांच्याबद्दल आणि यांनी लिहलेलं साहित्य वॉल्डन,केपकॉड वाचल्यापासून निसर्ग,प्राणी,पक्षी आणि पर्यावरणाची खूप आवड निर्माण झाली आहे.निसर्ग आणि प्राण्यांच्या सानिध्यात जीवन जगावं असं आता नेहमी वाटतं असतं.पर्यावरणाच्या संवर्धनासाठी चांगलं कार्य करावं,वेगवेगळी झाडे लावावी आणि ती जगवावी,प्राण्यांच्या सानिध्यात जावं त्यांच निरीक्षण करावं असं आता प्रामुख्याने वाटायला लागलं आहे.आणि लवकरच सुरुवात करणार आहेच.लहानपणी जंगलबुक बघितल्यापासूनच ही इच्छा कायम मनात होती आणि आता ती कितीतरी पटीने वाढलेली चाललेली आहे. निसर्ग,प्राणी व पक्ष्यांची आवड लागली म्हटल्यावर या संबंधित वाचन सुद्धा आलंच.यामुळे मी आता निसर्ग साहित्याकडे मोर्चा वळवला आहे.एकंदरीत हा जेनर माझा आवडता बनत चालला आहे.चकवा चांदण,डॉ.सलीम अली,भारतीय पक्षी, वॉल्डन,निसर्गमित्र जॉन म्युर,बनकीस्सा,शेकरा,नदिष्ट,माचीवरला बुधा,सत्तांतर इत्यादी या विषया संबंधित काही पुस्तके मी वाचली असून अजून कितीतरी पटीने पुन्हा खूप काही वाचायचं बाकी आहे.मारुती चितमपल्ली, व्यंकटेश माडगूळकर इत्यादी लेखक माझ्...