माझी मुंबई डायरी ♥️ भाग - 2


औरंगाबाद येथे ट्रेन मध्ये येऊन बसलो.पण मला येथे खूपच अवघड वाटतं होतं.रात्रभर आपल्याला येथे व्यवस्थित झोप येणार नाही.एवढं काहीच मिनिटांत मला कळून चुकलं.
त्यामुळे मी ट्रेन मध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आणि बाहेर आलो.. खर्च करून काढलेलं रेल्वे तिकीट बॅगेत नाईलाजाने तसाच ठेऊन दिला.(फाडायची हिम्मत झाली नाही) बाहेर येऊन एक कप चहा घेऊन जवळच्या एका ट्रॅव्हल्स ऑफिस मधून एक स्लीपर बसचा तिकीट घेतला.
बसची वेळ होती 10.30 जी बाबा पेट्रोल पंपाजवळून पिकअप करणार होती.जवळच्या हॉटेलमध्ये मध्ये एक बिर्याणी खाऊन मी ऑटोने बसजवळ आलो आणि बसमध्ये येऊन बसलो..

रात्री ठीक 11 वाजता बस औरंगाबाद वरून मुंबईला निघाली.बस निघाल्यावर मी सोबत आणलेलं डॉ.सलीम अली हे वीणा गवाणकर मॅमच पुस्तक वाचत बसलो.वाचता वाचता कधी झोप लागली हे कळलंच नाही..सकाळी 7.45 ला मी दादर वेस्ट रेल्वे स्टेशनजवळ उतरलो..स्टेशनवर येऊन फ्रेश होऊन एक चहा घेतली.(अजिबात आवडली नसल्याने अर्धी तशीच फेकून दिली😢)स्टेशनवर 15 मिनिटं थांबून आजूबाजूचं निरीक्षण केलं.आजपर्यंत टीव्हीवर बघितलेलं मुंबईच धावपडीचं जीवन थोडक्यात बघितलं.
बाहेरील भाजी मार्केट बघितलं.तेथील गोंधळ अनुभवला,वेगवेगळ्या लोकांची जगण्याची धडपड बघितली..इत्यादी...

GPS On करून चैत्यभूमी सर्च केलं आणि चैत्यभूमीच्या दिशेने पायी निघालो.काही वेळात दुरूनच चैत्यभूमी समोरील प्रवेशद्वार आणि अशोक स्तंभ नजरेस पडला.ते दृश्य बघून फार छान वाटलं आणि उत्सुकता वाढली. पायाची गती वाढवून मी त्या आकर्षक प्रवेशद्वाराजवळ गेलो.आणि काही वेळ फक्त त्यालाच निहाळतं राहिलो.त्याच्यावरची आकर्षण मन लुभावणाऱ्या कलाकारीने हृदयात घर केलं.सांचीच्या स्तूपाच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती असलेल्या या प्रवेशद्वारावरचं कोरीव कामाचे बारकावे बारकाईने बघितले.एकंदरीत फारच छान आणि उत्कृष्ट वाटलं.येथे काही फोटोस काढून मी निघालो सरळ सरळ समाधीस्थळावर.गेट मधून मी सरळ आता गेलो.चप्पल वगैरे बाहेर काढून मी चैत्यस्मारक बघत बघत आत समाधीस्थळावर गेलो.आजपर्यत फोटोत,व्हिडिओत बघितलेलं हा समाधीस्थळ जेथे बाबासाहेब आंबेडकर शेवटचे होते हा विचार करूनच डोळे एकंदरीत पाणावले.आयुष्यात फर्स्ट टाईम चैत्यभूमी च्या आत विजिट दिली होती.तेव्हा जी फीलिंग आली ती शब्दांत व्यक्त करू शकत नाही.आजपर्यंत वाचलेलं बाबासाहेबांचा सर्वकाही इतिहास डोक्यात फिरत होता.6 डिसेंबर रोजी भारत भरातून कोटी अनुयायी येथे अभिवादन करण्यासाठी येतात.तेव्हा येथे पाय फिरवण्यासाठी सुद्धा जागा नसते.आणि आज आपण या भूमीवर आलोय हा विचार करूनच भारी वाटतं होतं.प्रचंड ऊर्जा अंगात संचारल्याचा भास होतं होता एवढा मी विचारांच्या चक्रात गुंतलो होतो.
नतमस्तक होऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं. काही महत्वपूर्ण संकल्प घेतले तर बाबासाहेबांना काही प्रॉमिस करून बाहेर आलो.

थोडं आजूबाजूला निहाळलं, निरीक्षण केलं. बाजूलाच शमशान भूमी दिसली.तेथे बहुतेक अंतिम संस्कार होतं होते.मी त्यात शामिल झालो.तेथे जाऊन जवळच्या टेबलावर बसलो.आयुष्यात प्रथमच अंतिम संस्कार एवढ्या जवळून प्रत्यक्षात बघितलं.कधीही विचार केलं नव्हतं की हा अनुभव असा अचानक अनुभवायला मिळेल.गावात कधीही पूर्वी भीतीपोटी आणि मग नंतर आईमुळे मयतीत शामिल होता आलं नाही.दफन करताना अनेक जणांना बघितलं होतं पण अग्नी देताना प्रथमच बघत होतो.काही वेळ तेथे थांबून बाहेर आलो.

बाहेर येऊन एका पुस्तक स्टॉलला भेट दिली.तेथील काकांना काही वेळ बोललो.त्यांनी कोठुन आलात ?विचारल्यावर त्यांना येथे येण्याचं सर्व प्रयोजन सांगितलं.पुरस्काराबद्दल कळवलं.त्यांना खूप छान वाटलं.त्यांनी सुद्धा कौतुक करून अभिनंदन केलं तेव्हा फार भारी फीलिंग आली.
त्यांनी मला वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल माहिती दिली.मग मी तेथून खालीलप्रमाणे तीन पुस्तके खरेदी केली.

1)डॉ.आंबेडकरांच्या सहवासात - डॉ.सविता आंबेडकर(माईसाहेब)
2)आंबेडकर ग्रंथायन - डॉ.धनराज डाहाट
3)जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागुल

आणि तेथून निघालो. पुढे येऊन समुद्रकिनारी उभे राहून तेथील सुंदर दृश्यांचा, लाटां व पक्षांच्या आवाजांचा आनंद घेतला.अफाट समुद्र बघून फार भारी वाटतं होतं.तेथील समुद्र किनाऱ्यावर कचरा साफ करणाऱ्या 2 जणांना बघितलं.(माझ्यासाठी खरे हिरो)मुंबई सारखा मोठा शहर कायम स्वच्छ ठेवण्यासाठी किती अफाट मेहनत घेतात ही लोकं हा विचार करून त्यांच्याप्रति असलेली इज्जत पुन्हा वाढली.

नंतर थोडं पुढं चालून गेलो. सकाळची वेळ असल्याने भेटायला येणाऱ्या मंडळीना थोडा उशीर होता.म्हणून समोरच असलेल्या एका बागेत(नारळी बाग) जाऊन बसलो.चोहीकडे नारळाचे झाड असणाऱ्या या बागेत फार सुकून वाटतं होतं.येथील वातावरण प्रसन्न वातावरण होतं.आजूबाजूला सकाळी योगा,मॉर्निग वॉक करताना येणाऱ्या लोकांची चहल पहल होती.
थोडावेळ तेथील आजूबाजूचं निरीक्षण केलं.आणि मग मी अलबर्ट एलिस हे पुस्तक बॅगेतून काढून निवांत वाचत बसलो...♥️♥️

To Be Continued.....😊

टीप - भाग 1 वाचला नसेल तर
 https://m.facebook.com/story.php?story_fbid=897287134275011&id=100019811971268
या लिंकवर क्लिक करून वाचावा..♥️

©Moin Humanist✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼