बाबासाहेब आणि मी ❤️

लहानपनापासूनच या माणसाचे विशेषकरून बौद्धमित्रांच्या घरात,चित्रपटातील कोर्टात- पोलिस ठाण्यात फोटो बघायचो.गावातील चौकात असलेला यांचा पुतळा नेहमीच बघायचो.गावातील जयंतीत सुद्धा नेहमी यांचा फोटो हमखास दरवर्षी नजरेत पडायचा.दरवर्षी 14 एप्रिल जयंतीच्या दिवशी आमच्या पूर्ण बौद्ध वाड्यात प्रत्येकांचे घरी निळे व पंचशील झेंडे लावलेले असायचे.वर्षभर जुने,फाटके कपडे घालणारे माझे मित्र नवीन कपडे ,बुट घालून जयंतीत नाचायचे.आनंद साजरा करायचे.त्यांना बघून खरंच मला खूप आनंद व्हायचा.

मी नेहमी हाच विचार करायचो की हा चष्मा,सुटबुट घातलेला आणि हातात नेहमी एक जाड पुस्तक घेऊन उभा असलेला हा माणूस आहे तरी कोण ?? या माणसाने नेमकं केलं तरी काय ?? की प्रत्येक गावात यांचा एक तरी पुतळा आहेच .. नंतर मला वाटले की हे बौद्ध बांधवांचे एक देव आहेत आणि यांचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे.मग समजलं की ते एक डॉक्टर होते त्यांनी गरिबांचे मोफत इलाज करून अनेकांचे प्राण वाचवले म्हणून त्यांना लोकं देव मानतात.
त्यानंतर मला समजले की हे देव नसून एक मोठे नेते आहेत आणि हे फक्त बौद्ध बांधवांचेच आहे. कारण बौद्ध मित्रांच्या घरातच यांचा फोटो असायचा.पण इतर समाजातील लोकांच्या घरी मात्र दिसायचा नाही.

त्याकाळी मी काहींना विचारले तर समजलं की बाबासाहेब हे आपले नाही ते फक्त बौद्धांचेच आहेत.त्यांनी बौद्धांना/महारांना समान अधिकार मिळवून दिले,यांना समान हक्क मिळवून दिले,आरक्षण दिलं.देशाचा कायदा लिहला इत्यादी. पण त्याकाळी मला ह्या वरील शब्दांचा अर्थच माहिती नव्हता. आणि या आणि आजूबाजूच्या मानसिकतेमुळे माझा स्वतःचा असा एक मत बनला  की बाबासाहेब हे आपले नाहीत.जसे शिवाजी महाराज हिंदूंचे आहेत तसे बाबासाहेब आंबेडकर हे बौद्धांचे आहेत.ते फक्त जयभीम वाल्यांचे आहेत.आणि आपण ते नाही त्यामुळे आपण नवीन कपडे घेत नाही किंवा आपल्या घरात यांचा फोटो लावू शकत नाही.आपण यांची जयंती साजरी करत नाही अथवा नवीन कपडे घालत नाही.इत्यादी विचार करून थोडं वाईट वाटायचं.

पण पुढे जसा मी घडलो ,शिकलो तस तस मला बाबासाहेब समजले त्यांचे कार्य समजले आणि ७ वी पासूनच त्यांना मी आदर्श मानून माझ्या ध्येयाकडे वाटचाल सुरू केली आणि ती बाबासाहेबांच्या आशिर्वादाने सध्या सुद्धा सुरूच आहे.मला आज सुद्धा आठवतं जेव्हा मी सर्वप्रथम बाबासाहेबांचा फोटो माझ्या अभ्यासाच्या खोलीत लावला होता.तेव्हा मी किती खुश आनंदीत झालो.हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.
हे असलं काही करायचं मी कधीही स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता.हे छोटीशी गोष्ट सुद्धा वाटतं असली तरीही ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.आमच्या खानदानात प्रथमच मी ही परिवर्तनाची सुरुवात करत होतो.जी दिसायला सोप्पी होती पण येणाऱ्या काळासाठी महत्वाची असणार होती.कुटुंबाला हे काही समजलं नाही पण त्यांना मी सर्वकाही समजवलं पटवून दिलं.अभ्यासाने,वाचनाने हे शक्य झालं.मी पूर्ण चेंज झालो,बदललो.स्वप्न बघू लागलो.माझ्या आयुष्यात पुस्तके आली ती फक्त या अवलियामुळेच. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो मी स्टडी बंकरमध्ये लावला तेव्हापासूनच मी Proudly म्हणू लागलो आणि नेहमी म्हणत असतो जय भीम.जय भीम हा माझ्यासाठी ऊर्जेचा आणि प्रेरणेचा स्रोत आहे.खिशात लावलेल्या दोन पेनापासून तर डोळ्याला लावलेल्या गोल चष्म्यापर्यत सर्वकाही मी बाबासाहेब आंबेडकरापासून शिकलोय.सुटा बुटात आणि आत्मविश्वास आणि स्वाभिमाने राहायला शिकलो ते फक्त बाबासाहेब आंबेडकरामुळेच.❤️

#जय_भीम💜

©️Moin Humanist✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼