एकलव्य ❤️



मला एकलव्य बद्दल माहिती मिळाली ती Harshal कडून. सर्वप्रथम जेव्हा त्याच्याकडून विस्तृतपणे एकलव्य आणि करत असलेल्या त्यांच्या ग्रेट कार्याबद्दल ऐकलं तेव्हा फारच आनंद झाला.असं सुद्धा काही असेल कोणी याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करत असेल याची कधीही कल्पना केली नव्हती.आपण सुद्धा TISS, APU,JNU सारख्या विद्यापीठात जाऊन शिक्षण घेऊ शकतो हा आत्मविश्वास त्याच्या बोलण्यातून मला आला.आणि उच्चशिक्षण घेण्याची माझी मेलेली इच्छा पुन्हा नव्याने जिवंत झाली.JNU चा आजपर्यंत नाव ऐकलं,बऱ्याच प्रमाणात वाचलं होतं पण त्यामध्ये जाऊन कधी शिक्षण घेण्याचं स्वप्न तर काय विचार सुद्धा केला नव्हता.पण आता मी हा स्वप्न बघू शकतो तो फक्त माझा मित्र हर्षलने दिलेल्या आत्मविश्वासामुळे .आणि एकलव्य सारखी संस्था मार्गदर्शन करायला पाठीशी आहे या विश्वासामुळे.माझ्या सारख्या असंख्य जणांना एकलव्यने नव्याने स्वप्न बघायला शिकवलं आहे.पंखांना बळ देऊन उंच भरारी घेण्यासाठी प्रवृत्त केलं आहे.आणि वर्तमानात तर दिसत आहेच पण भविष्यात याचे सकारात्मक परिणाम अजून कितीतरी पटीने जास्त दिसतील एवढं नक्की.

उच्चशिक्षित होण्याचं स्वप्न माझ्यासारख्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांचा असतो.देश-विदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये जाऊन उच्चशिक्षित होऊन समाजासाठी काहीतरी करावे ही अनेकांची इच्छा असते. But इथपर्यंत मजल नेमकी कशी मारायची ?यामध्ये प्रवेश कसा मिळवायचा ?प्रवेश परीक्षेची तयारी कशी करायची ? इत्यादी काही सर्वांत मोठे प्रश्न आमच्यासमोर उभे असतात.शहरी आणि विशेष शिक्षित बॅकग्राऊंड असणाऱ्या विद्यार्थ्यांचं ठीक आहे.त्यांना संसाधन,माहिती आणि मार्गदर्शनाचा अभाव नसल्याने ते मोठ्या प्रमाणात त्यांच स्वप्न पूर्ण करू शकतात .आणि एकंदरीत बघितलं तर उच्चशिक्षित होताना सुद्धा आपल्याला याचं विशेष प्रकारात मोडणारे विद्यार्थी जास्त प्रमाणात दिसतात.शिक्षणात असणारी विषमता आपल्याला येथे सुद्धा जाणवते.

मग आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं काय ?त्यांनी उच्चशिक्षण नेमकं कसं घ्यावं ?कोठून मार्गदर्शन आणि माहिती मिळवावी ? या प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत आम्हाला मिळतं नव्हतं.

ग्रामीण भागातील आपल्या पहिल्या पिढीतील उच्चशिक्षित होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना याबद्दल संसाधन,मार्गदर्शन आणि माहितीचा फार मोठ्या प्रमाणात अभाव असतो.इच्छा असून सुद्धा त्यांना उच्चशिक्षित होता येत नाही.मोठ्या चांगल्या कॉलेजमध्ये जाऊन शिकण्याचं यांचा सुद्धा स्वप्न असतो.पण परिस्थितीमुळे आणि विशेष म्हणजे योग्य वयात,वेळेत मार्गदर्शन नसल्याने यांना आपली उच्चशिक्षणाची तहान तालुका अथवा जिल्ह्यातील एखाद्या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन भागवावी लागते.

माझ्यासारख्या अनेकांचं स्वप्न फक्त बी.ए, बीकॉम,बीएस्सी,इंजिनिअरिंग पर्यत असतो.इथपर्यंत शिकायचं. आणि मग एखादी छोटीमोठी नोकरी धरून कामाला लागायचं.यातून काही जण डोळेझाकून स्पर्धा परीक्षांकडे वळतात.
यामध्ये किती जणांना यश मिळतो हे सर्वांना माहिती आहेच.
पोलीस भरती,एमपीएससी, यूपीएससी,बँकिंग,रेल्वे, नीट,इंजिनिअरिंग पर्यतच करियरचे पर्याय उपलब्ध आहे का ?यामध्ये सामाजिक शास्त्रात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना इतर काही संधी उपलब्ध नाहीत का ? नॉन सायन्स बॅकग्राऊंड असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे पर्याय उपलब्ध नाहीत का ?

तर आहे नक्कीच आहेत. पण याबद्दल कोणीही कोठेही माहिती देताना दिसत नाही किंवा कोणीही मार्गदर्शन करत नाही.

"आयआयटीमध्ये" इंजिनिअरिंग वगळता सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अभ्यासक्रम आहेत.
हे कितीजणांना माहिती आहे ?

TISS, APU, JNU यासारख्या प्रतिष्ठित विद्यापीठात आपण फक्त त्यांची प्रवेश प्रक्रिया क्लिअर करून पदवी आणि पदव्युत्तर कोर्स साठी प्रवेश घेऊ शकतो.याबद्दल किती जणांना आयडिया आहे ?

एम.ए आपण 200 पेक्षा जास्त विषयांमध्ये करू शकतो याबद्दल खूप कमी जणांना माहिती असते.

ज्याप्रमाणे स्पर्धा परीक्षेला आणि इतर परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी कोचिंग क्लासेसचा जणू बाजार झाला आहे.एका क्लिक वर तुम्हाला या रिलेटेड माहिती उपलब्ध असते.पण  IIT, TISS, APU ,JNU,Jamia Milia, DU सारख्या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी तुम्हांला कोठेही विशेष मार्गदर्शन तर सोडाच व्यवस्थित माहिती मिळत नाही.एवढंच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील वेगवेगळ्या कॉलेज,फेलोशिपचे व्यवस्थित नाव सुद्धा आपल्याला माहिती नसतात.आणि या माहितीच्या अभावानेच ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडताना दिसतात. जास्त स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे वळण्याचं कारण सुद्धा बहुतेक प्रमाणात हाच आहे.स्पर्धा परीक्षेला जणू पर्यायच उपलब्ध नाहीत अशी धारणा अनेकांची झालेली आहे.

पण आता स्पर्धा परीक्षेला वेगवेगळे सक्षम पर्याय देण्याचे काम यवतमाळमध्ये एकलव्य नावाची संस्था गेल्या 4/5 वर्षापासून करत आहे.एकलव्यने आतापर्यंत महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाड्यातील शेकडो विद्यार्थ्यांना देशभरातील नामांकित विद्यापीठात प्रवेश व वेगवेगळ्या फेलोशिप मिळवून दिल्या आहे.Tiss, Apu, Jnu सारख्या कॉलेजमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा जाऊन देशविदेशातील विद्यार्थ्यांसोबत खांद्याला खांदा लावून शिकू शकतात.हा आत्मविश्वास एकलव्यने असंख्य विद्यार्थ्यांना दिला आहे.

अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी(APU), टाटा इन्स्टिट्यूट (TISS) आणि इतर विद्यापीठातील प्रवेश परीक्षा आणि महत्त्वाच्या फेलोशिप मिळवण्यासाठीची तयारी एकलव्य संस्थेकडून करून घेण्यात येते.यासाठी एकलव्य विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेत नाही. तीन-तीन महिन्यांच्या निवासी तसेच अ-निवासी कार्यशाळा त्यांच्याकडून घेतल्या जातात. वेगवेगळ्या विषयांवर ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग सुद्धा घेतले जातात.हा फारच महत्वाचा काम टीम एकलव्य निस्वार्थी पद्धतीने करत आहे.

दर 5-10 विद्यार्थ्यांमागे एक मेंटर  दिला जातो. तो मेंटर संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरण्यापासून ते प्रवेश मिळाल्यानंतर अगदी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत संपर्कात राहून मदत करतो. .नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाल्यानंतर स्कॉलरशिप, फेलोशिपच्या माध्यमातून शिक्षणाचा खर्च कसा उभारता येईल याबाबत ही येथे माहिती दिली जाते. एकदा याठिकाणी प्रवेश मिळाल्यानंतर पैशांअभावी शिक्षण थांबण्याची शक्यतो वेळ येत नाही.  
येथे शेवटच्या वर्षाला शिकत असताना कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे अनेक विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळतात. एकलव्यच्या माध्यमातून या मोठ्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेले तसेच नोकऱ्यांना लागलेले बरेचजण आता इथे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे मेंटर म्हणून काम करू लागले आहेत. त्यांना मार्गदर्शन करत आहेत.ही खरंच फार महत्वाची बाब आहे.आजच्या काळात जेव्हा स्वार्थ वाढत चालला त्याकाळात हे असे निस्वार्थी माणसं खूप कमी बघायला मिळतात.

Raju Kendre दादा, Prashant Chavhan दादा,akash Modak दादा व त्यांच्या काही मित्रांनी 5 वर्षांपूर्वी एकत्र येऊन एकलव्यची सुरुवात केली होती. स्पर्धा परिक्षेव्यतिरिक्त उच्च शिक्षणात असंख्य संधी उपलब्ध आहेत. मात्र मार्गदर्शनाअभावी पहिल्या पिढीत शिक्षण घेणारे विद्यार्थी तेथे पोहचू शकत नाहीत.त्यामुळे त्यांना मदतीचा हात देण्यासाठी एकलव्य सुरू झाली.आणि एकलव्य असंख्य विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवण्याचं ग्रेट काम करत आहेत. एकलव्य आधुनिक शिक्षण क्षेत्रात एक नवीन पायंडा रचत आहे.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र "Educate, organize agitate चा खरा अर्थ एकलव्यने दाखवून दिला आहे.

Thank U so Much Eklavya ❤️
Bravo✊😊

अधिक माहितीसाठी आणि नियमित अपडेट्स साठी एकलव्य - Eklavya च्या फेसबुक पेजला visit करा.

©Moin Humanist❤️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼