जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातील पुस्तक खरेदी...♥️
मी रोज विचार करत असतो की आता माझ्याजवळ खूप पुस्तके गोळा झाली आहेत.एकंदरीत आता (काही अपवाद वगळता) सर्वंच दर्जेदार पुस्तके आपल्या संग्रहात आहेत.आता स्टडी बंकर मध्ये पुस्तके ठेवायला सुद्धा व्यवस्थित जागा नाही..दोन्ही रॅक आणि कपाट पूर्ण भरलं आहे.त्यामुळे आता सध्या नवीन पुस्तके घ्यायची नाहीत.पण जेव्हा सुद्धा इतर नवीन पुस्तकांबद्दल वाचतो,इतरांचा पुस्तक संग्रह बघतो तेव्हा पुन्हा एक नवीन प्रेरणा मिळते.
आपण जास्तीत जास्त पुस्तके खरेदी करून संग्रही करायची आणि ती वाचायची.आपली सध्या ही तर फक्त सुरुवात आहे. अजून कितीतरी पटीने असंख्य भरपूर पुस्तके वाचायची आहेत. संग्रही ठेवायची आहे.
फक्त आणि फक्त पुस्तकांच्या साठी राजगृह बांधणाऱ्या त्या बाबासाहेबांचा डोळ्यासमोर आदर्श आहे..
त्यामुळे कधी थांबायचं प्रश्नच येत नाही.स्वतःची एक लायब्ररी बनवायची आहे.त्या लायब्ररी मध्ये प्रत्येक विषयाची दर्जेदार आणि वाचनीय पुस्तके संग्रही करून ठेवायची आहे.ही पुस्तके जिवापार जपायची आहे.आजूबाजूच्या ग्रामीण भागातील मुलामुलींना सुद्धा वाचनाची आवड निर्माण करून पुढे ही लायब्ररी सर्वांसाठी खुली करायची आहे.
एकच व्यसन आहे वाचण्याचा आणि पुस्तके खरेदी करण्याचा.आणि हा व्यसन मी कधीही सोडणार नाही.कारण या एकाच व्यवसनाने कुठलाही रोग होतं नाही तर नैराश्य,दुःख सारखे रोग नाहीसे होतात.हा व्यसन मस्तक घडवतो आणि घडलेला मस्तक कधीही कोणाचा हस्तक होत नाही एवढं नक्की..
जानेवारी -फेब्रुवारी महिन्यात बरीच पुस्तके खरेदी केली. मुख्य म्हणजे उपक्रमातुन ही पुस्तके मला सुद्धा सवलतीत उपलब्ध झाली.अनेक दिवसांपासून ही पुस्तके विशलिस्ट मध्ये ऍड होती.जी मला उपक्रमातुन आणि निखिल दादाकडून खरेदी करता आली.
मी खरेदी केलेली काही पुस्तके खालीलप्रमाणे.♥️
1)कॅनव्हास -अच्युत गोडबोले/ दिपा देशमुख
2)इन्फोटेक -अच्युत गोडबोले
3)जातीव्यवस्थेचे उच्चाटन - डॉ.बाबासाहेब आंबेडकर
4)आपण का झोपतो ? -मॅथ्यू वॉकर
5)मायलॉर्ड - अच्युत गोडबोले
6)कबीर कबीर -पुरुषोत्तम अग्रवाल
7)डॉ.आंबेडकरांच्या सहवासात -डॉ.सविता आंबेडकर
8)जीन मशीन -वेंकी रामकृष्णन
9)जॉर्ज ऑर्व्हल निवडक निबंध आणि लेख -अनुवाद:-मनोज पाथरकर
10)आंबेडकर ग्रंथायन -डॉ.धनराज डाहाट
11)पद्मावत -पुरुषोत्तम अग्रवाल
12)विश्व की श्रेष्ठ कहानियां भाग 1 आणि 2 -
13)प्रेरणा द साउंड ऑफ सायलेन्स - डॉ.उज्वला सहाणे
14) गणेश मतकरी सरांची एकूण 5 पुस्तके
चौकटीबाहेरचा सिनेमा,खिडक्या अर्ध्या उघड्या,बटरफ्लाय इफेक्ट,इंनस्टॉलेशन्स आणि कदाचित इमँजिनरी.2 पुस्तके आधीच संग्रही होती..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा