प्रेरणा - द साउंड ऑफ सायलेन्स...❤️


Nothing Is Impossible✊

काही दिवसांपूर्वी हे प्रेरणादायी आणि खूप काही शिकवून जाणारं पुस्तक वाचलं.नुसतं वाचलं नाही तर अनुभवलं,समजून घेतलं..सहाणे कुटुंबाच्या प्रवासात सहभागी  झाल्याचा,त्यांचा संघर्षमय जीवन प्रवास फार जवळून बघून आल्याचा प्रत्यय हे पुस्तक वाचून आला..या पुस्तकाच्या प्रवासात कळत/नकळत खूप काही जीवनोपयोगी धडे शिकायला मिळाले. आयुष्यात काहीही झालं,कितीही संकटे आली तरीही हार मानायची नाही. त्या आलेल्या संकटांना कडाडीची झुंज देत मार्गक्रमण करत राहायचं ही महत्त्वाची शिकवण या पुस्तकाने मला दिली..कितीतरी वेळा निशब्द करून जाणाऱ्या या आत्मचरित्राने मला दुःखासोबत लढायची हिम्मत दिली. आयुष्यातील समस्येशी मैत्री करायची महत्वपूर्ण गोष्ट मला या पुस्तकाने सांगितली.यासोबतच आयुष्यातील प्रत्येक क्षण कसा जगायचं याबद्दल कमालीचं मार्गदर्शन सुद्धा केलं.अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्याने उंच भरारी घेण्याची जिद्द जागृत या पुस्तकाने केली.
 आपण हे करू शकत नाही किंवा आपल्याला हे जमणार नाही असा विचार सुद्धा आता कधी हे पुस्तक वाचल्यानंतर मला येणार नाही एवढं नक्की. कारण प्रेरणा ताई सारख्या खऱ्या अर्थाने रोल मॉडेल असणाऱ्या ताईचा उदाहरण माझ्या नेहमी डोळ्यासमोर असेल.

हे पुस्तक वाचत असताना कितीतरी वेळा आपल्या डोळ्यांना पाझर फुटतो.वाचत असताना पूर्णपणे आपण यामध्ये गुंतवून जातो.लेखिकेच्या जीवनप्रवासाचा आणि त्यांच्या कुटुंबाचा जणू आपण एक भाग होऊन जातो.लेखिकेची लेखन शैली खूप छान आणि सुंदर असून वाचत असताना आपल्याला कोठेही कंटाळा वाटतं नाही.एकदा हातात घेतल्यावर खाली ठेऊच वाटतं नाही एवढं अप्रतिम हे पुस्तक आहे.लेखिकेचं अनुभव पुरेपूर त्यांच्या लेखनीत उतरलं आहे.जे पावलोपावली आपल्याला जगण्याची, लढण्याची शिकवण देतो.जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीचं आनंद घ्यायला आणि जेवढं आहे तेवढ्यात आनंदी राहण्याची शिकवण देतो.यासोबतच लेखिकेचा समाजाकडे डोळसपणे बघण्याचा दृष्टीकोन वाखण्याजोगा आहे.

आपल्या कर्णबधिर मुलीला घडवताना तिच्या पालकांनी केलेल्या संघर्षाची गाथा आपल्याला या पुस्तकातून वाचायला मिळते.प्रेरणाच्या कुटुंबाने व गुरूने प्रेरणा सहाणे ला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रेरणा सहाणे दीक्षित बनवण्यापर्यतचा प्रवास या पुस्तकात देण्यात आला आहे.सहाणे कुटुंबाचा इथपर्यंतचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता.पावलोपावली त्यांना संघर्ष करावा लागला.समाजाशी,व्यवस्थेशी,परिस्थिशी आणि आयुष्याशी झगडावं लागलं.अनोनात मानसिक,शारीरिक कष्ट करावे लागले.अनेक समस्यांचा सामना करावा लागला.अनेक दुःख सोसावे लागले.पण तरीही हा कुटुंब काही मागे हटला नाही.आलेल्या संकटांना शिंगावर घेत आपल्या वाटेवर मार्गक्रमण करत राहिला.आत्मविश्वास, जिद्द,इच्छा आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते.कोणताही संकट आपल्या जिद्दीसमोर छोटा आहे.हा महत्वपूर्ण संदेश आपल्याला सहाणे कुटुंब आपल्या प्रवासातून नकळतपणे देऊन जातो.

या पुस्तकात आपल्याला सहाणे कुटुंबाचे तीन पातळीवरचे जीवन अनुभव वाचायला मिळतात.आंतरजातीय विवाह केल्यावर बसलेल्या चटक्यांचे व शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी कराव्या लागलेल्या धडपडीचे अनुभव,दुसरा शाळेच्या संस्थाचालकांशी पावलोपावली दिलेल्या लढ्याचे अनुभव तर तिसरा आपल्या कर्णबधिर झालेल्या मुलीला घडवण्यासाठी केलेल्या अतोनात कष्टाचे अनुभव.आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयापर्यत जाऊन परत आलेल्या या कुटुंबाचे हे प्रवासवर्णन खूपच वाचनीय आहे.जे वाचत असताना आपण थक्क झाल्याशिवाय राहत नाही.हे पुस्तक फक्त मोठमोठ्या बाता मारून आपल्या तात्पुरती प्रेरणा देत नाही.तर यातील प्रेरणा आपल्याला या कुटुंबाच्या सच्च्या अनुभव व प्रवासातून मिळत असते.
हे पुस्तक दिव्यांग मुलांच्या पालकांसाठी एक लाईटहाऊसचा काम करणार यात काही वाद नाही.तर समाजाचा दिव्यांग,अपंग मुलांकडे बघण्याचा एकंदरीत दृष्टिकोन सुद्धा बदलायचं काम करणार आहे.पुस्तक वाचल्यानंतर दिव्यांग मुलाप्रति बघण्याचा दृष्टिकोन चेंज होऊन त्या मुलांबद्दल आपुलकी निर्माण होते. यासोबतच नैराश्यात गेलेल्या युवकांना हे पुस्तक नैराश्यातून बाहेर काढण्याचं काम सुद्धा करते.एकंदरीत हे पुस्तक आपल्याला फक्त त्यांच प्रवास,अनुभवच सांगत नाही तर आपल्याला आजूबाजूला, आयुष्याला बघण्याचं एक नवीन दृष्टी देऊन जाते एवढं नक्की.❤️

सर्वांनी आयुष्यात एकदा तरी नक्कीच वाचावे असे हे पुस्तक.

बाकी मी आता जास्त काही लिहीत नाही.सर्वांनी हा अनुभव स्वतः पुस्तक वाचून घ्यावा अशी माझी इच्छा आहे.अनिल अवचट सारख्या दिगग्ज लेखकाची या पुस्तकाला प्रस्तावना लाभलेली आहे.यातच सर्वकाही आलं..So कोणालाही हे पुस्तक वाचायची इच्छा असेल तर आपण सरळ सरळ मॅमला 9922213695 या नंबरवर संपर्क करून घरपोच मागवू शकता..❤️

हॅट्स ऑफ To You सहाणे कुटुंब 🙏
More Power To U ❤️❤️✊

©Moin Humanist✍️
मी वाचलेली पुस्तके ❤️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼