वाचन माझी आवड ❤️
वाचन माझा सर्वांत आवडता छंद आहे.माझी आवड आहे. ते कोणीही माझ्यावर लादलेलं नाही.माझ्या पुस्तकांवर माझा खूप प्रेम आहे.मी मुक्तपणे, मनाला वाटेल ते आणि तसे वाचन करत असतो.यामध्ये वाचन,पुस्तक संग्रह आणि लिखानासंबंधीत मला इतरांचे सल्ले अजिबात आवडत नाही.मला स्वतःच्या मर्जीने वाट्टेल ते वाचायला आवडतं.मग ते कोणालाही पटणारं नसेल तरी चालेल.
प्रेशर वगैरे घेऊन मला वाचन करावं असं अजिबात वाटतं नाही.मनसोक्तपणे बिंदास ,आपल्या आवडीने वाचन करायला मी प्राधान्य देत असतो.कारण यामध्ये माझी कोणासोबतही स्पर्धा नाही.हजारो पुस्तके वाचून संपवणे हा माझा लक्ष्य नाही.मला चांगली पुस्तके वाचायची आहेच पण ती प्रत्यक्षात जगायची सुद्धा आहे.हजारो, लाखो पुस्तके संग्रही करायची आहे.होय मला ठाऊक आहे की मी सर्वच वाचून पूर्ण करू शकणार नाही.पण मला माझ्या येणाऱ्या पिढीला ही संपत्ती द्यायची आहे.
वाचनाने होणारे असंख्य फायदे Automatically मला जाणवत आहेत आणि पुढे सुद्धा जाणवत राहतील.
वाचनाला एखाद्या स्पर्धेचा रूप मला द्यावं वाटतं नाही.हे वाच,हे वाचू नको, असे वाच,असे लिही,वाचलेल्या नोट्स काढाव्या का ,कोणती पुस्तके वाचावी,वाचलेलं लक्षात कसं ठेवावं ? हे आणि इत्यादी असंख्य गोष्टींच्या मी नादी लागतं नाही आणि लागणार नाही.
मी मस्त एखादं आवडीचं पुस्तक उचलतो आणि वेळ मिळेल तसं वाचत राहतो.नियमित ठराविक काही पेजेस तर न चुकता वाचत राहतो.
कोणी सांगतो म्हणून किंवा कोणाला दाखवायला मी अजिबात वाचत नाही.वाचलेलं इतरांसोबत शेअर करतो. उद्देश्य फक्त इतरांना चांगल्या पुस्तकाबद्दल आयडिया व्हावी हा असतो बस्स..❤️
©moin Humanist❤️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा