अर्थसाक्षर व्हा ! ❤️



काही दिवसांपूर्वी अभिजित कोळपकर (सीए) लिखित अर्थसाक्षर व्हा हे फार महत्वपूर्ण आणि आजच्या काळात फार गरजेचं असलेलं मराठी पुस्तक वाचलं.मनातील असंख्य Doubts,संभ्रम तर दूर झालेच त्यासोबत कमालीचं मार्गदर्शन सुद्धा मिळालं.या पुस्तकात अगदी सोप्या आणि साध्या भाषेत अर्थजतन व अर्थसंवर्धन वाचकाला समजावले आहे.एकूण 389 पृष्ठसंख्या असलेल्या या पुस्तकात आपल्याला अर्थसाक्षरते संबंधित असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळतात.एकंदरीत हे पुस्तक आपल्याला बोट धरून मार्गदर्शन करायचं काम करते.काय करावे यासोबतच काय करू नये हे सुद्धा समजावून सांगते.फायद्या सोबत होणाऱ्या तोट्याची सुद्धा पूर्वकल्पना हे पुस्तक आपल्याला देते.

लेखक म्हणतात :- 

अर्थसाक्षर व्हा ! हे केवळ आर्थिक नियोजनावर आधारित अनेक पुस्तकांपैकी एक पुस्तक नाही. या पुस्तकाचे वेगळेपण म्हणजे अगदी सर्वसामान्य वाचक, युवा, तसेच ज्येष्ठ नागरिक या साऱ्यांचा, वैयक्तिक व कौटुंबिक दृष्टिकोनाचा विचार करून हे पुस्तक लिहिण्यात आले आहे.एकूण ६ भागांमध्ये हे पुस्तक विभागण्यात आले असून यामध्ये

1)ओळख अर्थसाक्षरतेची,
2) आर्थिक नियोजन
3)विमा व कर्ज व्यवस्थापन
4)गुंतवणूक नियोजन
5)शेअर्स व म्युच्युअल फंड
6)आर्थिक फसवणुकींपासून सावधान !

असे एकूण 6 भाग समाविष्ट केल्या गेले आहे.
 या प्रत्येक भागामध्ये संबंधित विषय विस्तृतपणे सोप्या शब्दात मांडलेला आहे. लेखन, वाचन आणि आचरण या तिन्ही गोष्टींचा विचार करून विषय सोपा करण्यासाठी वेगवेगळी उदाहरणे, तक्ते, सूत्रे, चित्रे व फ्लो-चार्टसचा वापर करण्यात आला आहे.

अर्थसाक्षरता म्हणजे काय ?
पैसा म्हणजे काय ?
नोकरी करावी की व्यवसाय ?
तुमचे ध्येय खूप श्रीमंत होणे असावे की नसावे ?
वयक्तिक बजट म्हणजे काय ?
विमा म्हणजे काय ?
EMI म्हणजे काय ?

इत्यादी असंख्य प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवी असेल तर हे पुस्तक नक्की वाचावे ..❤️

©Moin Humanist✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼