सिद्धार्थ ❤️
या बौद्ध पौर्णिमेला विशेष करून नोबेल पुरस्कार प्राप्त लेखक हरमान हेसे यांची जागतिक पातळीवर गाजलेल्या "सिध्दार्थ" या कादंबरीचा अनुवाद दुसऱ्यांदा वाचून पूर्ण केला.1922 साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीला यावर्षी 100 वर्ष पूर्ण झाले आहेत.आणि यामुळे विशेष ही कादंबरी मी यावर्षी दुसऱ्यांदा वाचून पूर्ण केली..एकंदरीत मला ही कादंबरी खूप आवडली आणि भावली..दुसऱ्या वाचनात काही नवीन आयाम समजले,उमजले.खूप काही नव्याने शिकवलं या कादंबरीने.मनात असलेल्या काही प्रश्नांची उत्तरे मला या कादंबरीत मिळाली.स्व:अध्ययन करण्यासाठी विशेष प्रेरणा मिळाली..
कादंबरीचे नाव जरी 'सिद्धार्थ' असले तरी ही कादंबरी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्याबद्दल नाही.या कादंबरीत गौतम बुद्धाच्या समकालातील एका मनस्वी भारतीयाचा आत्मरूपाचा शोध घेण्यात आला आहे. कादंबरीचा काळ हा मात्र गौतम बुद्धाच्या समकालीन आहे.आणि यामध्ये बुद्ध आणि धम्माचा उल्लेख आलेला आहे.एकंदरीत हरमान हेसे यांनी गौतम बुद्धांच्या कथेची वेगळ्या प्रकारे पुनरावृत्ती केली आहे, परंतु त्याच परिमाणात, त्याच अर्थाने..
या कादंबरीचा मुख्य नायक सिद्धार्थ याच्या जीवनात बौद्ध धर्म व हिंदु धर्म या विचारसरणीचा प्रभाव आपल्याला जानवतो. ज्याला मानवी जीवनाचा अर्थ कळाला तो सिद्धार्थ असा सिद्धार्थ या शब्दाचा अर्थ आहे.सिद्धार्थ या तरुण ब्राह्मणाचा आत्म-साक्षात्काराचा शोध या कादंबरीचा गाभा आहे. वास्तव आणि त्याला जे शिकवले गेले आहे यातील विरोधाभास ओळखून तो भ्रमंती करण्यासाठी आपले आरामदायी जीवन सोडून देतो.त्याचा असा विश्वास आहे की भीतीला पराभूत करण्यास व आनंद, दुःख, जीवन आणि मृत्यू यासह जीवनातील विरोधाभास समभावाने अनुभवण्यास हा मार्ग त्याला सक्षम करेल.तपस्वी उपवास समाधानकारक सिद्ध होत नाहीत, तसेच संपत्ती, कामुकता आणि सुंदर गणिकडे सुद्धा तो लक्ष देत नाही..
पूर्तता शोधण्याच्या निराशेने, तो नदीवर जातो आणि तेथे नदीचं ऐकायला शिकतो. तो स्वतःमध्ये प्रेमाचा आत्मा शोधतो आणि मानवी वेगळेपणा स्वीकारण्यास शिकतो. सरतेशेवटी, सिद्धार्थ संपूर्ण जीवनाचे आकलन करतो आणि आनंदाची आणि सर्वोच्च बुद्धीची स्थिती प्राप्त करतो..ही कादंबरी कोणाचा शिष्य होण्यापेक्षा स्वयंशिक्षणाची मोठी पुरस्कर्ती आहे. मूलभूत बौद्ध तत्त्वावर ठाम आहे - तुम्हाला शहाणपण मिळवण्यासाठी, तुमच्या दुःखाचा योग्य वाटा उचलण्याची गरज आहे. ज्ञान दिले जाऊ शकते किंवा सामायिक केले जाऊ शकते परंतु शहाणपण आपण इतरांना देऊ शकत नाही..इत्यादी महत्वपूर्ण धडे या कादंबरीतुन आपल्याला मिळत जातात..❤️🙂
लवकरच विस्तृत आणि थोड्या वेगळ्या अँगलने मी या कादंबरीवर लिहणार आहे.सध्या यातून शिकलेल्या धड्यांची आयुष्यात अंमलबजावणी करायचं प्रयत्न करत आहे.बघू मी यामध्ये कितपत यशस्वी होतो.🧡
©Moin Humanist✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा