हू मुव्हड माय चीज ? ❤️



"परिवर्तन संसार का नियम हैं " ही म्हण आपण अनेक वेळा ऐकत आलोय.योग्य वेळेवर बदल स्वीकारणे अथवा बदल करणे खुप गरजेचं असते.या वाक्याची प्रचिती आपल्याला हे पुस्तक वाचताना येते.हे एक छोटसं पण खूप काही शिकवून जाणारं पुस्तक अप्रतिम आहे.आयुष्यात येणाऱ्या बदलांना कशाप्रकारे सामोरे जावे याबद्दल हे पुस्तक आपल्याला कमालीचं मार्गदर्शन करते.कितीतरी महत्वपूर्ण धडे आपल्याला शिकायला मिळतातं.पुस्तकातील वेगवेगळे विचार आपल्याला नव्याने विचार करायला भाग पाडतात. कथेतील पात्रापैकी आपण नेमकं कोण आहोत ?याचा शोध आपल्याला हे पुस्तक घेण्यास भाग पाडते.

नोकरी-व्यवसायात तर आयुष्यात सुद्धा अनेक बदल घडत असतात, हे सत्य आपण सर्वजण मान्य करतो.पण या होणाऱ्या बदलांशी आपण किती जण जुडवून घेतो?आपल्या पैकी खूपच कमी लोकं आयुष्यात बदल घडायला हवेत अशी,अपेक्षा करतात.अन्यथा जसं सुरू आहे तसंच कायम स्वरूपी सुरू राहावं असं आपल्याला वाटतं असते.खूपच कमी लोकं आपला कंफर्ट झोन सोडून बाहेर पडतात.आयुष्यात नेहमी काही बदल अचानक घडतात त्यासाठी आपण नेहमी तयार असतोच असे नाही.त्यामुळे अनेकांची यामध्ये गोची होते.त्यांना काही मार्ग दिसतं नाही.या अश्याच अचानपणे घडणाऱ्या बदलांना कसं सामोरं जावं,याचा सोपा नकाशा म्हणजेच हे पुस्तक.

बदल या विषयीच्या अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणारी एक छोटीशी कथा यामध्ये दिलेली आहे.ही वरकरणी साधी वाटणारी कथा असली , तरी तिच्यात एक महान सत्य दडलंय . भूलभुलैयात अडकलेल्या चार पात्रांची ही उद्बोधक आणि मजेदार कथा आहे . ही चार पात्रं एका भूलभुलैयात राहत असतात . शिवाय , ती ' चीज'च्या शोधात असतात . या चार पात्रांपैकी दोन पात्रं म्हणजे स्निफ आणि स्करी ही उंदरं आहेत ; तर उर्वरित दोन पात्रं म्हणजे हेम आणि हॉ नावाचे छोटे लोक आहेत . कथेत वापरलेला ' चीज' हा एक प्रतीकात्मक शब्द आहे . आपल्या आयुष्यात 'चीज ' सर्वांनाच नेहमी हवंहवंसं वाटतं . चीज म्हणजे- गलेलठ्ठ पगाराची नोकरी , पैसा , मालमत्ता , आरोग्य किंवा मनःशांती . कथेतला ' भूलभुलैया ' हा शब्दही प्रतीकात्मक आहे . आपल्या नोकरीचं ठिकाण , आपलं घर किंवा आपण ज्या ध्येयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो ते ध्येय अशा अर्थानं ' भूलभुलैया ' हा शब्द वापरण्यात आलाय . प्रस्तुत कथेतल्या पात्रांना काही अनपेक्षित बदलांना सामोरं जावं लागतं . त्यांपैकी प्रत्येक जण या बदलांना तोंड देण्यात यशस्वी होतो . ही सर्व पात्रं या प्रवासात प्राप्त झालेला बोध भूलभुलैयाच्या भिंतीवर लिहीतात . 

हे पुस्तक वाचत असताना आपल्यासमोर जेव्हा भूलभुलैयाच्या भिंतीचं चित्र येतात , तेव्हा त्यावर काही सुविचार लिहिलेले असतात . या सुविचारांवरून आपल्याला बदलाला कसं तोंड द्यायचं , हे समजते . परिणामी आपल्या व्यक्तिगत आयुष्यात आणि करिअरमध्ये यशस्वी होण्याचं रहस्य आपल्यासमोर उलगडतो , ही कथा सर्व वयोगटातल्या वाचकांसाठी लिहिली आहे .खरंतर ही वाचायला एक तासही पुरेसा आहे . पण या एका तासात मिळालेलं ज्ञान आयुष्यभर आपल्या कामी येईल , हे नक्की.

मला आवडलेले काही विचार :- 

1)तुमचं चीज तुमच्यासाठी जितकं महत्त्वाचं असतं, तितके तुम्ही त्यावर अवलंबून राहता.

2)हेच तर जीवन आहे. जीवन नेहमी पुढं जात असतं आणि आपणही त्याच्यासोबत मार्गक्रमण केलं पाहिजे.”

3)नव्या दिशेनं वाटचाल केली की चीज शोधण्यास मदत होते.

4)तुम्ही जेव्हा तुमच्या भीतीवर विजय मिळवता, तेव्हाच तुम्ही खरं स्वातंत्र्य अनुभवता.

5)जितक्या लवकर जुनं चीज सोडाल, तितक्या लवकर नवीन चीज शोधू शकाल!

6)जर स्वतःमध्ये बदल घडवला नाही तर तुम्ही नष्ट होऊ शकता.

7)समज,तुला भीती वाटत नसती तर आता तू काय केलं असतंस ?

8)चीज जुनं केव्हा होतंय हे जाणण्यासाठी त्याचा वारंवार वास घेऊन पाहावा लागतो.

9)नव्या चीजचा आस्वाद घेण्याची कल्पना करा,मग नवं चीज मिळवणं खूप सोपं होईल.

10)चिजशिवाय राहण्यापेक्षा त्याचा भुलभुलैयात शोध घेणं यातच सुज्ञपणा आहे.

11)जुनाट विचारपद्धती आपल्याला नवं चीज मिळवून देऊ शकत नाही.

12)आपण नवं चीज शोधून त्याचा आस्वाद घेऊ शकतो,हे समजताच आपण आपला मार्ग बदलतो.

13)लहान - लहान बदलांचा आधीपासूनच अंदाज घेत गेलो , तर भविष्यात घडणाऱ्या मोठ्या बदलांना तोंड देणं सोपं जातं .

14)बदल घडत असतातच चीजची जागा बदलत राहणारच .

15)बदलांची चाहूल घ्या तुमचं चीज कोणीतरी हिरावून घेईल याची आधीच मानसिक तयारी ठेवा.

16)बदलांवर लक्ष ठेवा चीज शिळं कधी होत आहे हे समजण्यासाठी त्याचा वेळोवेळी अंदाज घ्या.

17)परिस्थितीत बदल घडतातच स्वतःमध्येही तत्काळ बदल करा जितक्या लवकर तुम्ही जुनं चीज सोडाल तितक्या लवकर तुम्ही नव्या चीजचा आस्वाद घेऊ शकाल.

18)स्वतःत बदल घडवा चीजसोबत पुढे चालत राहा.

19) बदलाचा आनंद घ्या बदलाच्या प्रक्रियेत साहस अनुभवा नव्या चीजच्या नव्या चवीचा आस्वाद घ्या.

 20)त्वरित बदलण्याची तयारी ठेवा आणि पुन्हा बदलाचा आनंद अनुभवा ! लक्षात घ्या , तुमचं चीज कोणी ना कोणी इतरत्र नेतच असतं.

©Moin Humanist✍️
मी वाचलेली पुस्तके ❤️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼