मनातलं काही....❤️
अश्या असंख्य गोष्टी आहेत ज्या मला शिकायच्या आहेत.मला खुप काही शिकायला,करायला आवडतं. पण सुरुवातीपासून गावातच राहिल्याने या गोष्टींवर काही मर्यादा आल्या.खूप काही करायचं, शिकायचं होतं आणि आहे.but काही कारणाने ते करू शकलो नाही.पण आता ते भविष्यात करायचं आहे.असंख्य गोष्टीबद्दल खूप उशिरा कळालं त्याबद्दल अनेक वेळा खूप दुःख होतो.आता जे मार्गदर्शन करणारे,मार्ग दाखवणारे पूर्वी मिळाले असते तर आयुष्य फार नाही But थोडं वेगळ्या वळणांवर असलं असतं. Its ok जे झालं ते झालं.माझी माझ्या आयुष्याबद्दल अजिबात तक्रार नाही. मला आजपर्यंत जे काही मिळालं ते असंख्य जणांच आजसुद्धा स्वप्न आहे.मी संघर्ष केला नाही आजपर्यंत.पण मला तो करायचं आहे.
मी संघर्ष/Struggle साठी पूर्णपणे तयार आहे.बापाच्या पैशांवर मला जगायचं नाही.जे काही करायचं आहे ते स्वतःच.एक छोटीशी झोपडी असेल ती स्वतःची आणि सेल्फ made असेल एवढं नक्की..आजपर्यंत कम्फर्टझोन मध्ये जगलोय तो कम्फर्ट झोन सोडायचं प्रयत्न करतोय पण तो कधी कधी जमतं नाही.स्वतःशी रोज लढतोय. कधी जिंकतोय तर कधी हरतोय..अभ्यास,वाचन वगैरे न चुकता करतोय.दिनक्रम बदललं आहे.आयुष्याची वाट सोपी आणि सरळ दिसतं आहे.पूर्वीप्रमाणे अंधार वगैरे काहीही आता दिसतं नाही.नौकरी,करियर वगैरेची चिंता नाही.सुखाने आयुष्य जगू शकेल कुटुंबासोबत इतर 1/2 जणांचा सुद्धा पोट भरू शकेल एवढं पैसा कमावण्याची लायकी आणि प्लॅन मी तयार केला आहे.त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही.
पण कधी कधी विचित्र वाटतं.ज्या भागात राहतो त्या भागात आता कधी कधी राहावंस वाटतं नाही.कारण एवढंच की मनातील दोन शब्द बोलायला प्रत्यक्ष येथे आजूबाजूला कोणी नाही.गल्ली दिवसभर भयाण पडलेली असते.मित्र असंख्य आहेत पण त्या पद्धतीचा मित्र आजूबाजूला कोणी नाही.रोज असंख्य कॉल्स येतात पण प्रत्यक्षात कोणीही नसतो बाजूला.त्यामुळे स्टडी बंकर,पुस्तके,गाणे,चित्रपट,सोशल मीडिया,अभ्यास आणि मी बस्स एवढंच सध्या माझं आयुष्य आहे.एकंदरीत अभ्यास आणि पुस्तके सोडून हाच माझा विरंगुळा आणि मनोरंजनाचा साधन आहे. सांगायचा मुद्दा हाच की दिसतं तेवढं सोपं नसतं. समोरचा व्यक्ती तुम्हाला हसत वगैरे दिसतं असेल तर तो आनंदीच असेल असं नाही.त्यामुळे कोणालाही Without भेटता,बोलता त्याबद्दल गैरसमज करून घेणे चुकीचं आहे.तो कोणत्या परिस्थितीत असतो त्याचं त्याला ठाऊक असतं..बाकी मी एकदम आनंदी आहे आणि शेवटपर्यंत असणार आहे.थोरो लाईफ मध्ये आल्यापासून नैराश्य वगैरे मला गाठू शकत नाही.कारण माझ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे मला बुद्ध आणि थोरो गुरुजींनी दिली आहेत.आता एकांतवास मला आवडतो.आणि याच कारणाने मी थोरो गुरुजींचा कट्टर फॅन झालोय.गौतम बुद्धानंतर त्यांनी दाखवलेला मार्ग मला प्रिय वाटतो आणि मी याचं वाटेवर चाललोय..भविष्यात खूप काही करायचं आणि शिकायचं. सध्या फोकस फक्त स्टडीवर आहे.त्यामुळेच सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह नाही किंवा पुस्तका व्यतिरिक्त कशाबद्दल लिहीत नाही.आता फक्त कम्फर्ट झोनमधून बाहेर निघायचं आहे.
पुन्हा आजारी पडायचं नाही ही गाठ मनाशी बांधली आहे.छोट्याशा आजारामुळे 2 वर्ष मागे गेलोय.त्यामुळे Health is Wealth हा मंत्र तंतोतंत पटलं आहे.आता लवकरच ध्येय गाठायचं आहे..Aim खूप आहेत त्यामुळे Small स्टेप्स टाकतोय.फक्त एकच Aim च्या मागे लागायचं नाही.Cse पहिला प्रेम आहे तो काहीही झालं तरी सोडायचं नाही.पण फक्त त्याच्याच मागं सुद्धा लागायचं नाही..बस्स एवढंच.
Hope माझ्याबद्दल असलेल्या काही प्रश्नांची उत्तरे clear झाली असतील.So माझी काळजी करणाऱ्या मित्रांनी बिंदास रहा मी योग्य ट्रॅक वर आहे.रस्ता भटकलेलो नाही आणि भटकणार सुद्धा नाही.मार्ग तोच आहे पण त्या मार्गाला विविध वाटा निर्माण करतोय.💜
लव यु ऑल❤️❤️
Moin Humanist ✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा