गंगेत गगन वितळले ❤️
काही दिवसांपूर्वी पुस्तके खरेदी करत असताना मला राजहंस प्रकाशनाच्या वेबसाईटवर हे पुस्तक दिसलं.मुखपृष्ठावर बापुचा फोटो असल्याने कुठलाही विचार न करता. सरळ सरळ हे पुस्तक खरेदी केले होते..काही दिवसांपूर्वी हे पुस्तक वाचलं त्यावर विचार करून पुस्तक ठेऊन दिलं कारण याबद्दल लिहायला माझी मनस्थिती तेव्हा हवी तशी नव्हती..म्हणून म्हटलं आज काहीतरी याबद्दल लिहावं इतरांना सुद्धा कल्पना द्यावी या पुस्तकांबद्दल...
मागे मधूश्री प्रकाशनकडून प्रकाशित झालेलं आंबेडकर -अनुयायांच्या नजरेतून हे पुस्तक वाचण्यात आलं होतं.त्यामध्ये बाबासाहेबांच्या अनुयायांनी त्यांच्या नजरेतून बघितलेले बाबासाहेब आपल्यापुढे मांडले होते.बाबासाहेबांच्या आयुष्यातील किस्से त्यांनी या पुस्तकात खूपच उत्कृष्ट पद्धतीने मांडलेले आहेत अशाच प्रकारचं हे एक पुस्तक"गंगेमध्ये गगन वितळले "अंबरीश मिश्र सरांनी लिहलं आहे.या पुस्तकांमध्ये महादेवभाई देसाई , जमनालाल बजाज , मनुबेन गांधी , हरिलाल गांधी ... या आणि अशाच काही जिवलग सहकाऱ्यांच्या आठवणी, दैनंदिनी आणि पत्रव्यवहारातून एक वेगळेच गांधीजी रेखांकित होतात..
माणसं जोडण्याची अपूर्व अशी कला गांधींजीकडे होती . त्यांचं संघटनकौशल्य थक्क करून टाकणारं असं आहे . हा सगळा ऐवज लोकांसमोर यावा असं वाटलं , म्हणून हे पुस्तक लेखकांनी लिहलं आहे..लेखक म्हणतात
:- गांधीजी महामानव होते , सत्य आणि अहिंसेचे उपासक होते ,वगैरे भाषा अतिवापरामुळे गुळचट वाटते. गांधींसंबंधीचं बरंचसं लिखाण अशा स्वरूपाचं आहे . तर दुसरं टोक म्हणजे अधम ,विखारी टीका आणि निंदानालस्ती . खरा गांधी धुक्याच्या पुलावर उभा आहे. प्रसन्न , मिस्कील आणि सर्वांगसुंदर . मुंगी होऊन कष्ट करणारा .कमालीचा काटेकोर आणि व्यवहारचतुर माणसांना एका धाग्यात ओवणार . माणसांसाठी आसुसलेला . ' साधू चलता भला , पानी बहता भला ' , या म्हणीप्रमाणे सतत लगबग लगबग करणारा कृतिशील गांधी मला भावला . वाचकांनाही तो तसाच आवडो , ही इच्छा . काही निवडक आप्तस्वकीय आणि सहकाऱ्यांच्या नजरेतून गांधींकडे पाहण्याचा हा प्रयत्न आहे .
एकंदरीत हे पुस्तक अफलातून असून प्रत्येक गांधींवर प्रेम करणाऱ्या आणि गांधीजीचा द्वेष करणाऱ्या दोन्ही व्यक्तींनी वाचावा आणि एक वेगळा गांधी थोडा तरी समजून घ्यावा.❤️
©Moin Humanist✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा