माझा रशियाचा प्रवास ❤️


अण्णाभाऊ साठे यांनी लिहलेलं सर्वकाही मला वाचायचं आहे.मी आजपर्यंत जरी अण्णाभाऊ यांच विशेष असं काही अपवाद वगळता वाचलेलं नसलं तरीही आतापर्यंत जे काही वाचलंय त्यावरून अण्णा माझ्या आवडीच्या व्यक्तिमत्त्व आणि लेखकाच्या यादीत नेहमी अग्रणी आहेत आणि असतील .फक्त दिढ दिवसाची शाळा शिकून मराठी साहित्याला महत्वपूर्ण साहित्य देणारा हा साहित्यकार,शाहिर मला फार आदरणीय वाटतो नेहमीच.लवकरच त्यांचा समग्र साहित्य संग्रही करून मला वाचून काढायचं आहे.फकिरा ही अण्णांची मी वाचलेली व मला आवडलेली कादंबरी जी आजपर्यंत किमान 4 वेळा वाचून काढली आहे.ही कादंबरी वाचून व अण्णांबद्दल इतर काही वाचून तर मी या कायम उपेक्षित राहिलेल्या अवलियाच्या अजून कितीतरी प्रेमात पडलोय.

अण्णाभाऊ 1961 साली रशियाला गेले होते. त्यांनी या आपल्या प्रवासावर एक प्रवासवर्णनपर पुस्तक लिहलेलं आहे.याबद्दल मी सुरुवातीला वाचलं होतं.तेव्हापासून मला हे पुस्तक वाचण्याची जाम इच्छा होती.म्हणून मी हे पुस्तक काही ठिकाणी खूप शोधलं पण मला काही ते मिळालं नाही.आता अण्णांच्या समग्र साहित्यातच आपल्याला ते वाचायला मिळेल हा विचार करून मी मागे हे पुस्तक मिळवण्याचा नाद सोडून दिला होता.मग काही दिवसांपूर्वी अशातच एका जुन्या पुस्तक विक्रीच्या W.App ग्रुपवर माझ्या नजरेस हे पुस्तक पडलं आणि मी ते लगेच मागवून घेतलं.आणि याप्रकारे माझ्या हाती ही 1979 सालातील दुसरी आवृत्ती आली.आता मला किती आनंद झाला असेल हे वेगळं सांगायला नकोच.पुस्तक घरी आलं आणि अवघ्या 2 तासांत मी हे छोटसं 57 पृष्ठसंख्या असलेलं पुस्तक वाचून संपवल सुद्धा.आणि काही वर्षाची असलेली उत्सुकता अखेर समाप्त झाली.पण आता अण्णांचा इतर साहित्य अभ्यासायची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.❤️

तर झालं असं की' 1961 मध्ये फकिरा या कादंबरीला महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिला पारितोषिक मिळाला आणि याच वेळी इंडो सोव्हिएट कल्चर सोसायटीनं अण्णांना रशियाला पाठवण्याचं ठरवलं.

वाटेल ते करून एकवेळ आपण सोव्हिएट संघराज्य पाहावे.रशियातील ते कामगार-राज्य कसे असेल ,तेथे कॉम्रेड लेनिन यांनी केलेली क्रांती व मार्क्सचे महान तत्वज्ञान कसे साकार झाले असेल,ती नवी दुनिया,नवी संस्कृती, नवी सभ्यता कशी फुलत असेल या विचाराने अण्णाभाऊचं मन भारावलं होतं. जणू ते वेडेच झाले होते.1934 च्या दरम्यान त्यांनी अनेक जप्त पुस्तके वाचली होती.रशियन क्रांतीचा इतिहास,कॉम्रेड लेलिनचे चरित्र या पुस्तकांनी त्यांच्या मनावर खूप परिणाम केलेला होता.आणि म्हणूनच ते रशिया पाहण्यासाठी उत्सुक होतेच.1948 च्या दरम्यान काही योग सुद्धा आले होते पण तेव्हा ते काही जमलं नव्हतं..

आता ही संधी समोरून चालून अण्णाभाऊ यांच्याजवळ आली होती. त्यांना हा मौका घालवायचा नव्हता.त्यांनी प्रयत्न केले.परंतु मध्ये पैशाची अडचण निर्माण झाली.पण महाराष्ट्राला ही बातमी समजताच ही अडचण दूर झाली.आणि अण्णा रशियाला जाण्यासाठी तयार झाले.अनेक भानगडीतून जाऊन त्यांनी पासपोर्ट मिळवलं.आणि त्यांचा रशियाचा हा प्रवास सुरु झाला..मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मॉस्को असा अण्णांचा एकंदरीत हा प्रवास वर्णन खूप वाचनीय आहे.अण्णांच्या दृष्टीकोनातून 1961 सालचा रशिया आपल्याला अनुभवायला मिळतो.त्यांचे अनुभव,त्यांना भेटलेली माणसे,त्यांनी भेट दिलेली स्थळे इत्यादीचा सुंदर वर्णन अण्णा आपल्या या पुस्तकात करतात..❤️

©Moin Humanist✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼