पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाचन प्रवास....🌼❤️

इमेज
माझ्या आयुष्याचा खरा अभ्यासाचा प्रवास हा 7 वीच्या दुसऱ्या सत्रापासून सुरू झाला. त्याआधीपर्यंत माझं आयुष्य खरं सांगायचं तर काळोखात हरवल्यासारखं होतं. शाळेचं नाव जरी काढलं तरी माझ्या अंगावर काटा यायचा. अभ्यास करणं, पुस्तक वाचणं हा तर अगदी लांबचा विषय होता. पाचवीपासून जवळपास अडीच वर्षं मी अक्षरशः न्यूनगंडात अडकलो होतो. त्या काळात मी फक्त वेळ वाया घालवला जुगार खेळणं, गावच्या नदीवर किंवा शेतात दिवसभर बसणं, निरर्थक फिरणं. माझ्या आयुष्याची गाडी अक्षरशः रुळावरून घसरलेलीच होती. पण प्रत्येकाच्या आयुष्यात जसा एखादा लाईफ-चेंजिंग प्रसंग येतो तसाच माझ्याही आयुष्यात आला. तो म्हणजे दिवाळीच्या सुट्टीत मी जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट माझं आयुष्य बदलून गेला. त्या आधीपर्यंत माझ्या गावात, समाजात ऐकून माझ्या मनात बाबासाहेब म्हणजे फक्त बुद्ध धर्माचे नेते, “जय भीम” म्हणणाऱ्यांपुरते मर्यादित व्यक्ती असं एक गैरसमजाचं चित्र होतं. पण जेव्हा मी हा चित्रपट पाहिला तेव्हा पहिल्यांदा मला बाबासाहेबांचं खरं अफाट व्यक्तिमत्त्व दिसलं. त्यांचा संघर्ष, त्यांचं कष्टाळ...

या जागा राखीव आहेत...🌸❤️

इमेज
आज कॉलेजमध्ये Parliamentarians’ Club ने Does Reservation weaken or redefine merit? या विषयावर चर्चा घडवून आणली.  विद्यार्थ्यांनी आपापली मतं मांडली, वाद–प्रतिवाद झाले. मी माझा एक छोटासा view मांडला नि त्यासाठी मी नेहमी सोबत ठेवत असलेल्या अभिनव चंद्रचूड यांच्या “या जागा राखीव आहेत” या पुस्तकाचा आधार घेतला नि इतराना आवर्जून वाचायचं सुद्धा सांगितलं…❤️ हल्ली मी याबद्दल बऱ्याचदा वाचतोय, म्हणूनच मला हे पुस्तक सुचवावसं वाटतं. या पुस्तकात स्पष्ट सांगितलं आहे की merit म्हणजे फक्त marks किंवा exams नाहीत माणसाला आयुष्यात संधी मिळाल्या का नाहीत, हेही merit चाच भाग आहे. सुरुवातीलाच line unequal असेल, तर Result सारखे कसे असतील? आरक्षण म्हणजे कुणाला gift देणं नाही तर समान पातळीवर आणणं आहे. त्यामुळे reservation weaken करत नाही उलट redefine करतं हा मुद्दा समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचायला हवं..❤️

प्रथम अर्थात् अंतिम मुक्ति…..❤️

इमेज
ओशो यांना वाचल्यानंतर काही दिवसांपुर्वी जे. कृष्णमूर्ती यांच्याकडे वळलोय.आधी यूट्यूब नि गुगल वर काही बघून ,वाचून त्यांच्या ‘The First And Last Freedom’या पुस्तकाचा मराठी अनुवाद , ‘प्रथम अर्थात् अंतिम मुक्ति’ हे वाचायला घेतलं नि कधी वाचून पूर्ण केलं समजलं सुद्धा नाही .🌱 हे पुस्तक वाचताना मला कायम जाणवत राहिलं की आयुष्यात खरी मोकळीक, मनःशांती नि आनंद मिळवण्यासाठी कोणत्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून राहणं चुकीचं आहे. कृष्णमूर्ती खूप स्पष्टपणे सांगतात, की आपली सुख-दुःख, समस्या, गोंधळ हे सगळं बाहेरच्या गोष्टींमुळे किंवा नियतीमुळे घडत नसतं तर ते आपल्याच मनाच्या विचाराच्या अन् जुन्या सवयींच्या साखळीत अडकलेलं असतं. हे पुस्तक वाचताना प्रकर्षानं जाणवतं की खरी “मुक्ती” म्हणजे स्वातंत्र्य, ही धर्म, प्रथा, शिकवणी किंवा कुठल्या आदर्शाच्या मागे धावून मिळत नाही तर ती आपल्याला स्वत:च्या मनाचा, विचारांचा नि कृतींचा तल्लखपणे शोध घ्यावा लागतो असे कृष्णमूर्ती यात समजावतात. या पुस्तकात सुरुवातीला कृष्णमूर्तींनी अनेक दैनंदिन प्रश्न कंटाळा, भीती, दुःख, ईश्वर, आत्मज्ञान अगदी सरळ भाषेत सांगितले आहेत. ...

बुद्ध चरित्र…🩷

इमेज
हे पुस्तक धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेलं आहे. यात गौतम बुद्ध यांचं जीवन अगदी सोप्या नि समजण्यास सोप्या भाषेत सांगितलंय. बुद्धांचा जन्म राजघराण्यात झाला पण त्यांना लहानपणापासूनच जगातील दुःख नि वेदना समजायला लागल्या. त्यांनी सुखी आयुष्य सोडून सत्याचा शोध घेतला. धूप, उपवास, कठोर तपश्चर्या करूनही त्यांना समाधान मिळालं नाही. शेवटी त्यांनी एका झाडाखाली ध्यान करून जीवनातलं खऱं ज्ञान मिळवलं, ज्यामुळे त्या वेदना दूर होतील, हा मार्ग समजला. बुद्धांनी लोकांना अहिंसा, करुणा नि समतेचा संदेश दिला. त्यांनी सांगितलं की माणसाला स्वतःच्या मनाला समजून घेतलं पाहिजे व इतरांशी प्रेमाने वागलं पाहिजे. हे पुस्तक केवळ इतिहास सांगत नाही तर आपल्या जीवनासाठीही खूप महत्त्वाचं आहे. आपण सुखी होण्यासाठी बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून न राहता, मन शांत ठेवावं, साधं जगावं अन् चांगुलपणा जगात पसरवावा असं हे पुस्तक शिकवतं.  या पुस्तकामुळे वाचकाला स्वतःच्या आयुष्याबद्दल खोल विचार करता येतो नि जगण्याचा अधिक अर्थ समजतो. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकाने नक्की वाचावं.💙 ©️Moin's Shelf🌿🩵

तर सर्वप्रथम We Read मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे....🌼❤️

इमेज
तर सर्वप्रथम We Read मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे....🌼❤️ "पुस्तकं ही माणसाची खरी मित्र असतात," असं आपण नेहमीच ऐकत आलोय. पण ही मैत्री जपण्यासाठी नि टिकवण्यासाठी ही पुस्तकं सहज उपलब्ध होणं खूप गरजेचं आहे. हाच विचार डोळ्यांसमोर ठेवून आपण We Read ही वाचन चळवळ सुरू केली आहे. मी Moin Humanist, बुलढाणा जिल्ह्यातील सुलतानपूर गावचा एक सामान्य वाचक जो वाचतो,वाचल्यानंतर पुस्तकाबद्दल लिहितो नि ती पुस्तके माझ्यासारख्या वाचकांपर्यंत सवलतीत घरपोच पोहोचवतो सुद्धा माझ्या वाचनप्रेमाला बघून शरद तांदळे सरांनी मला 2022 साली एका वाचकाला दिला जाणारा पहिला 'स्वप्नील कोलते साहित्य पुरस्कार' दिला आहे. लॉकडाऊनच्या काळात मी Study Bunker नावाचा एक छोटासा उपक्रम सुरू केला ही अशी एक जागा आहे जिथे कुणीही वाचक मोफत येऊन पुस्तके वाचू शकतो.याची दखल BBC मराठीने सुद्धा घेतली आहे जी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बघू शकता. हळूहळू ही जागा वाचकांचं केंद्र बनत गेली. याच स्टडी बंकरमधून ‘We Read’ ही कल्पना आकारास आली.केवळ वाचनापुरती मर्यादित न ठेवता, वाचनसंस्कृती पोसणारी नि ती पुढे नेणा...

शहीद भगतसिंहांची जेल डायरी…🩷🌱

इमेज
हे पुस्तक वाचताना असं जाणवतं की आपण फक्त तुरुंगातल्या कैद्याची नोंद वाचत नाही तर एका विचारवंताचा मेंदू, त्याची स्वप्नं, त्याची जिद्द नि त्याच्यातून उमलणारी क्रांती यांना जवळून अनुभवतोय . या डायरीतून कळतं की भगतसिंह हे केवळ बंदुकीवर विश्वास ठेवणारे क्रांतिकारक नव्हते तर ते प्रखर वाचन करणारे, प्रश्न विचारणारे नि समाजाचं भविष्य घडवण्याचं स्वप्न पाहणारे तत्त्वज्ञ होते. तुरुंगातल्या 713 दिवसांत त्यांनी तब्बल 302 ग्रंथ वाचले, 5 पुस्तकं लिहिली नि 116 दिवसांच्या उपोषणानंतर ही 404 पानांची डायरी लिहायला सुरुवात केली. जरी आज आपल्या हातात फक्त 137 पाने उपलब्ध असली तरीही त्या प्रत्येक पानात विचारांची संपत्ती आहे.  यात इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य अशा अनेक विषयांवर सखोल चिंतन आहे. भगतसिंहांनी धर्म, जात, विषमता, न्यायव्यवस्था अन् स्वातंत्र्य यावर जे विचार लिहिले ते आजच्या काळातही तितकेच लागू पडतात. प्रत्येक पान वाचताना असं वाटतं की ते थेट आपल्या मनाशी बोलत आहेत नि आपल्याला जागं करत आहेत.  आपल्यापैकी अनेकांनी भगतसिंहांना फक्त शौर्यवान क्रांतिकारक म्हणून प...

उष्टं…❤️

इमेज
मागे ओमप्रकाश वाल्मिकी यांच्या ‘जुठन’ या आत्मकथनाचा मराठी अनुवाद ‘उष्टं’ वाचून पूर्ण केलं. मराठीतील उपरा, बलूतं, उचल्या, अक्करमाशी, भंगार, कोल्हाट्याचं पोरं या धाटणीतील दलित साहित्याच्या परंपरेत बसणारं हे पुस्तक प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचलंच पाहिजे. हे फक्त आत्मचरित्र नाही तर हा समाजाच्या अंतर्मनात लपलेल्या कुरूपतेचा आरसा आहे. भंगी समाजात जन्मलेले वाल्मिकी यांनी पावलोपावली अनुभवलेली हीन वागणूक, उपेक्षा, जातीयभेदाचे जळजळीत चटके, असमानता नि दारिद्र्याचे अनुभव ते निःसंकोचपणे मांडतात. वाचताना मन सुन्न होतं, डोळे पाणावतात नि आपण अजूनही बदलाची गरज आहे हे नाकारता येत नाही. या पुस्तकाची ओळख मला पहिल्यांदा NCERT च्या एका धड्यातून झाली. तिथला एक छोटा प्रसंग वाचूनच पोटात गोळा आला होता नि तेव्हाच ठरवलं की हे पुस्तक पूर्ण वाचायचंच. हिंदी मूळ वाचण्याऐवजी 2018 साली लोकवाङ्मय गृहकडून आलेला डॉ. मंगेश बनसोड यांचा मराठी अनुवाद बोलावला नि पहिल्या पानापासूनच ते डोक्यात नि हृदयात उतरलं. वाल्मिकी यांचं बालपण उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील एका लहान गावात गावकुसाच्या बाहेर, नाल्याजवळील भ...

कंट्या …. 🩷🤍

इमेज
गणेश बर्गे या लेखकांच नाव ऐकलं की सर्वात आधी डोळ्यासमोर येतं ते त्यांच्या लिखाणातील खरं, साधं पण मनाला स्पर्श करणारं गावाचं चित्र.पहिल्यांदा शिरसवाडी वाचल्यानंतर त्यांच्या शब्दांच्या प्रेमात पडलो होतो नि कंट्या वाचून तर अजून जास्त …🌿 कंट्या ही फक्त एका मुलाची गोष्ट नाही तर ती एका पिढीची, एका गावाची नि त्या सगळ्या एकट्या मनांची गोष्ट आहे जी प्रेम, आधार अन् ओळख शोधत असतात. कंट्याचा जन्मच आईच्या मायेविना झाला. लहानपणीचं आईचं सावट गेलं नि तो आजी-आजोबांच्या आधाराने वाढला. बाहेरून बिनधास्त, रांगडा, गावभर भटकणारा, कुणासाठी लोफर तर कुणासाठी टुकार… पण आतून? आतून तो एकटा, तुटलेला, खूप संवेदनशील नि कुणीतरी आपलं म्हणावं यासाठी तडफडणारा मुलगा. गणेश सरांची लेखनशैली ही या कथेला वेगळं आयुष्य देते. त्यांची गावरान नि थेट मनात उतरणारी भाषा वाचकाला सरळ त्या गावाच्या वेशीवर आणून उभी करते. जणू आपण तिथेच आहोत चहाच्या टपरीवर बसलेलो, शेताच्या कडेला उभे राहून मळ्याची हवा घेत आहोत किंवा एखाद्या उन्हाळी दुपारी गावातील मुलांसोबत गल्लीबोळात खेळतोय. यातील पात्रं इतकी जिवंत आहेत की आपण त्यांना आपल्या गल्लीत  किं...

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म …🩷

इमेज
सध्या परत एकदा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचतोय नव्हे तर मन लावून अभ्यासतोय. 🌿  हे पुस्तक म्हणजे केवळ धर्माचा इतिहास नाही तर मानवी विचारांना दिशा देणारं, अंधश्रद्धा नि द्वेष यांच्या बेड्यांतून मुक्त करणारं असं ग्रंथरत्न आहे. बाबासाहेबांनी स्वतःच्या अनुभवातून नि अभ्यासातून लिहिलेलं हे लेखन वाचताना असं वाटतं की जणू आपण बुद्धांच्या विचारांचं थेट मूळ गाठतोय. आतापर्यंतच्या एकंदरीत वाचन-अभ्यासाने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे.द्वेष व नफरत कुणाचंही भलं करू शकत नाहीत. याने होतो तो फक्त नि फक्त नुकसानच. गौतम बुद्ध या बाबतीत सदैव आदर्श ठरतात. त्यांनी द्वेषापासून शंभर फूट लांब राहण्याचा मार्ग दाखवला. धर्म, पंथ, समाज किंवा व्यक्ती कोणाचाही द्वेष करणे म्हणजे आपण स्वतःलाच फसवणं. द्वेष हा माणसाच्या नि देशाच्या प्रगतीचा सर्वात मोठा अडथळा आहे. प्रेमाने जे काम सहज पूर्ण होतात ते द्वेषाने कधीच होत नाहीत. माणूस जसा वाचतो, शिकतो, तसतशी त्याची परिपक्वता वाढत जाते नि ती वाढायलाच हवी. पूर्वी योग्य वाटणाऱ्या गोष्टी नंतर चुकीच्या वाटू लागतात, आपल्या चुका उमगतात अन् आ...

अर्थसाक्षर व्हा’, म्युच्युअल फंड विषयी बोलू काही’नि‘पैशाविषयी बोलू काही’..❤️🌼

इमेज
अर्थसाक्षर व्हा’, म्युच्युअल फंड विषयी बोलू काही’नि‘पैशाविषयी बोलू काही’ ही तीन पुस्तकं मी आवर्जून कॉलेजला सोबत घेऊन आलोय. वेळ मिळेल तेव्हा वर्गात असो, कँटीनमध्ये किंवा लायब्ररीत निवांत क्षण असो… मी ही पुस्तकं चाळत राहतो,नोट्स काढतो. सुरुवातीला अर्थकारणाच्या भाषा कळतच नव्हत्या SIP म्हणजे काय, Compound Interest म्हणजे काय, Mutual Fund चा फायदा काय ? … हे सगळं धूसर होतं. पण या पुस्तकांमुळे माझी  पैशांकडे बघण्याची नजर फार बदलून गेली आहे. ‘अर्थसाक्षर व्हा’ हे पुस्तक माझ्यासाठी एक मार्गदर्शक ठरलं आहे . सीए अभिजीत कोळपकर सरांनी अतिशय सोप्या भाषेत पैशाचं नियोजन, कर्ज नि विमा व्यवस्थापन, गुंतवणुकीचे तत्त्व सांगितले आहेत. आज मी काही ठरवून वागतो पैसे खर्च करताना थांबतो, बचतीचं मूल्य समजतो याचं श्रेय या पुस्तकाला जातो . त्याचवेळी, ‘म्युच्युअल फंड विषयी बोलू काही’ वाचताना मी पहिल्यांदा गुंतवणुकीला गांभीर्याने पाहिलं. मोनिका मॅम यांची लेखनशैली खूप आपुलकीची वाटते जसं एखादी मोठी बहीण आपल्याला सांगतेय, की “हे कर… पण असंही बघ…💖 त्यासोबतच खोलवर जाऊन परिणाम केला तो ‘पैशाविषयी बोलू काही’ ...

जीम कॉर्बेटच्या सान्निध्यात…💖💙

इमेज
हल्ली वाचनात सतत जीम कॉर्बेट सर येतायत… त्यांच्या प्रत्येक पुस्तकातून ते अधिक जवळ येतायत, जणू काही मी त्यांच्या सोबतच त्या जंगलात फिरतोय, त्या वाघाच्या मागावर चाललोय, त्या भीतीच्या, एकटेपणाच्या नि धाडसाच्या क्षणांना टच करतोय. सुरुवातीला माय इंडिया पासून सुरुवात केली नि जंगल लोअर” वाचलं अन् एक गोष्ट लगेच लक्षात आली की निसर्गाला समजून घेणं म्हणजे केवळ माहिती जमवणं नाही तर अनुभवातून शिकणं. जीम कॉर्बेट म्हणतात की जंगल समजण्यासाठी पुस्तकं पुरेशी नाहीत झाडांच्या सावलीत, प्राण्यांच्या हालचालींमध्ये, मातीतून उठणाऱ्या वासात जे शिकता येतं तेच खरं जंगलाचं शास्त्र असतं. त्यांचं Man-Eaters of Kumaon वाचताना मी अक्षरशः त्या थरारक क्षणांमध्ये होतो. जिथे एखादा नरभक्षक गावकऱ्यांवर दहशत निर्माण करतो नि जीम सर त्या प्राण्याला शोधून, त्याच्या सवयी समजून, अखेर अत्यंत संयमानं त्याला मारतात. पण यात कुठेही सूडाचा भाव नाही फक्त जवाबदारी आहे, नि माणसांच्या जीवनासाठी केलेली कर्तव्यपूर्ती आहे. My India वाचताना मात्र त्यांच्या मनातली माणुसकी समोर आली. त्यांनी ज्या प्रकारे आदिवासी, ग्रामीण लोकांशी नातं ...

मॅनइटर्स ऑफ कुमाऊँ …🍀💖

इमेज
हल्ली जिम सरांच्या सानिध्यात आहे. वेळ मिळेल तशी त्यांची पुस्तके वाचून पूर्ण करतोय .काही दिवसापूर्वी  ‘माय इंडिया’ वाचून मन हलकं झालं होतं… नि त्यानंतर हातात घेतलं हे पुस्तक मॅनईटर्स ऑफ कुमाऊँ. कुठलीही पूर्वकल्पना न ठेवता, एक दिवस अचानक वाचायला सुरुवात केली नि थेट एका दमात संपवलं. जसं जसं पुढं जात गेलो, तसं तसं एक वेगळंच नातं जिम कॉर्बेटशी जोडत गेलं. या पुस्तकात कुठल्याही मोठ्या भाषाशैलीचा फाजील थाट नाही, कुठलाही गाजावाजा नाही. पण ज्या पद्धतीने जिम सर आपले अनुभव सांगतात , त्यामधून एक अतूट प्रामाणिकपणा, धैर्य नि माणुसकी जाणवत राहते. नरभक्षक वाघ अन् बिबटे यांचं भयावह वास्तव समजून घेताना आपल्यालाही वाटतं की हे फक्त शिकाऱ्याचं काम नाही तर ही गावांचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे. जिम स्वतः शिकारी होते , पण त्यांना शिकारीत फारसं गर्व नव्हता. ते केवळ त्या प्राण्याला मारत होते जो माणसांसाठी धोका निर्माण करत होता . या कथांमध्ये अनेक वेळा मृत्यू समोर उभा राहतो पण तरीही त्याची भीती न वाटता जिमचा शांत नि संयमित दृष्टिकोन अधिक जाणवत राहतो. एकेका घटनेच्या वर्णनात m ते केवळ थरारक प्रसंग...

फकिरा....❤️🌼

इमेज
काही दिवसांपूर्वी 'अण्णाभाऊ साठे' यांच्या अजरामर लेखणीतून निर्माण झालेली 'फकिरा' ही कादंबरी चौथ्यांदा वाचून पूर्ण केली नि त्या कादंबरीचाच एक भाग झालो. ही कादंबरी मी वाचली नाही तर अक्षरशः जगून नि अनुभवून आलो. अण्णाभाऊ नि त्यांच्या लिखाणाला खरंच तोड नाही. "वाचावं नि फक्त वाचतच जावं" असं अफाट साहित्य त्यांनी मराठी साहित्याला दिलं आहे, जे वर्षानुवर्षे वाचकांच्या हृदयात फिट्ट असेल. 35 कादंबऱ्या, 13 कथासंग्रह, 8 पटकथा, 1 प्रवासवर्णन, 3 नाटके, 10 पोवाडे, 14 लोकनाट्ये नि 12 उपहासात्मक लेख एवढं भरमसाठ दर्जेदार लिखाण करून आपल्या समाजाला आरसा दाखवण्याचं काम त्यांनी केलं आहे. आपल्या साहित्यातून त्यांनी उपेक्षित समाजाचं संघर्षमय जीवन वाचकांसमोर मांडलं असून, पावलोपावली शोषणाविरुद्ध आवाज उठवला आहे. 'फकिरा' ही अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली अप्रतिम कादंबरी आहे. 1959 साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीला 1961 मध्ये 'महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार' मिळाला असून अण्णाभाऊंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीस ही कादंबरी अर्पण केली आहे. वि. स. खां...

We Read आयोजित पत्रलेखन स्पर्धेचा निकाल..🌼

इमेज
We Read आयोजित केलेल्या स्पर्धेला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार…🩵 या स्पर्धेत आम्हाला एकूण 300 पत्रं प्राप्त झाली. यात 8 वर्षांच्या बालकांपासून ते 78 वयवर्ष असलेल्या ज्येष्ठांपर्यंत सहभागींचा समावेश होता. प्रत्येक पत्रातून उमटलेली भावना, कल्पकता आणि संवेदनशीलता खरोखरच स्पर्धेचं सार्थक ठरली. मूळ नियोजनाप्रमाणे,आलेल्या पत्रांपैकी 3 सर्वोत्कृष्ट पत्रं निवडायची होती. मात्र, लहान वयाच्या मुलांचाही सहभाग लक्षणीय असल्यामुळे त्यांची पत्रं प्रौढांच्या पत्रांप्रमाणे एकत्रितपणे निकालात समाविष्ट करणे योग्य ठरणार नाही, असे आम्हाला वाटले. त्यामुळे आम्ही स्पर्धेत दोन गट तयार करण्याचा निर्णय घेतला. •18 वर्षांखालील गट •18वर्षांवरील गट 18 वर्षांखालील गटात एकूण 100 पत्रं, तर 18 वर्षांवरील गटात जवळपास 200 पत्रं होती. या विभागणीप्रमाणे प्रत्येक गटातून 3-3 विजेते निवडण्याचे ठरवले गेले. पत्रांचे परीक्षण करताना आमच्या We Read Team ने सर्व पत्रं वाचून प्राथमिक चर्चा केली नि त्यातून 18 वर्षांवरील गटातील 21 पत्रं व 18 वर्षांखालील गटातील 14 पत्रं पुढील फेरीसाठी निवडली. ह...