तर सर्वप्रथम We Read मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे....🌼❤️
तर सर्वप्रथम We Read मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे....🌼❤️
"पुस्तकं ही माणसाची खरी मित्र असतात," असं आपण नेहमीच ऐकत आलोय. पण ही मैत्री जपण्यासाठी नि टिकवण्यासाठी ही पुस्तकं सहज उपलब्ध होणं खूप गरजेचं आहे. हाच विचार डोळ्यांसमोर ठेवून आपण We Read ही वाचन चळवळ सुरू केली आहे.
मी Moin Humanist, बुलढाणा जिल्ह्यातील सुलतानपूर गावचा एक सामान्य वाचक जो वाचतो,वाचल्यानंतर पुस्तकाबद्दल लिहितो नि ती पुस्तके माझ्यासारख्या वाचकांपर्यंत सवलतीत घरपोच पोहोचवतो सुद्धा माझ्या वाचनप्रेमाला बघून शरद तांदळे सरांनी मला 2022 साली एका वाचकाला दिला जाणारा पहिला 'स्वप्नील कोलते साहित्य पुरस्कार' दिला आहे. लॉकडाऊनच्या काळात मी Study Bunker नावाचा एक छोटासा उपक्रम सुरू केला ही अशी एक जागा आहे जिथे कुणीही वाचक मोफत येऊन पुस्तके वाचू शकतो.याची दखल BBC मराठीने सुद्धा घेतली आहे जी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बघू शकता.
हळूहळू ही जागा वाचकांचं केंद्र बनत गेली. याच स्टडी बंकरमधून ‘We Read’ ही कल्पना आकारास आली.केवळ वाचनापुरती मर्यादित न ठेवता, वाचनसंस्कृती पोसणारी नि ती पुढे नेणारी चळवळ.
We Read मध्ये तुम्हाला मिळेल – 🌼
WhatsApp वर दररोज विविध पुस्तकांचे ओळखीपर लेख कोणतं पुस्तक का वाचावं, त्यातून काय मिळेल हे सहज समजेल.
दर्जेदार पुस्तकांची घरपोच सेवा – जे पुस्तक तुम्ही निवडाल, ते तुमच्याच दारात पोहोचवण्याची माझी जबाबदारी.We read मध्ये पुस्तकं मागवल्यानंतर ती काळजीपूर्वक पॅक करून पाठवली जातात. कोणतीही अडचण आल्यास वाचक थेट संपर्क साधू शकतात. फसवणूक, ब्लॉक करणं किंवा पैसे घेऊन गायब होणं अशा गोष्टी या चळवळीच्या मूल्यांशी सुसंगत नाहीत.
नवीन साहित्य, अनुवादित व दुर्लक्षित पुस्तकांचा परिचय वाचनाचा आवाका वाढवणं हाही आपला उद्देश आहे.
वाचकांसाठी खास शिफारसी, चर्चासत्रं नि गप्पा जेणेकरून आपलं वाचन समृद्ध व्हावं.
आज We Read च्या माध्यमातून अनेक स्तरांवरचे वाचक जोडले गेले आहेत. हातावर पोट असणाऱ्या कामगारांपासून अधिकाऱ्यांपर्यंत, रिक्षा चालकांपासून ते शिक्षकांपर्यंत आणि यामुळेच ही चळवळ आता केवळ पुस्तके पाठवण्याची सेवा न राहता एक सजीव वाचनसंवाद बनली आहे.
जर तुम्हालाही वाचनाची आवड असेल, किंवा दुसऱ्याला वाचनाकडे वळवायचं असेल तर We Read चा भाग व्हा. तुम्ही स्वतः पुस्तकं मागवू शकता, दुसऱ्याला भेट देऊ शकता, किंवा एखाद्या वाचकाला Study Bunker विषयी माहिती देऊ शकता. हीदेखील एक प्रकारची सामाजिक मदतच आहे.
We Read Team खालीलप्रमाणे…🩷
1) Vaishnavi - Wardha
2)Amol-Sultanpur
3)Swapnil -Veerpangra
4)Vinayak -Bada Mehra
5)Mahesh -Ch.Sambhajinagar
6)V ipul- Deulgaon kore
7)Diksha-Ch.Sambhajinagar
8)Faizan-Sultanpur
9)Shilratn-Nanded
10)Rushikesh -Pune
11)Ashwini-Sultanpur
12)gaurav -Yavatmal
And Me Moin… 🩷
आपलं काम मीडियामध्ये:
E-Sakal Article –
https://www.esakal.com/amp/maharashtra/national-youth-day-the-story-of-moin-kabra-from-buldhana-district-spv94
BBC Marathi डॉक्युमेंटरी –
https://youtu.be/7mx1W_gpbqY?si=zVXg1rUPqv982RxX
https://youtu.be/NpecM0-1Wy4?si=iiJUxGDPV8woT8cz
Facebook Link –
https://www.facebook.com/share/1ArnUAQM58/
We Read Whatsapp Group link -
https://chat.whatsapp.com/GflcupmFOtD5SExk8qsaU8
Instagram link :-
https://www.instagram.com/humanistmoin?igsh=MWhyNTMwNHNsM2M5Yw==
संपर्क क्रमांक -
We Read Official -9518398168
वाचन वाढवा… विचार समृद्ध करा…
Thank You ❤️
©️Moin Humanist 🌼
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा