अर्थसाक्षर व्हा’, म्युच्युअल फंड विषयी बोलू काही’नि‘पैशाविषयी बोलू काही’..❤️🌼
अर्थसाक्षर व्हा’, म्युच्युअल फंड विषयी बोलू काही’नि‘पैशाविषयी बोलू काही’ ही तीन पुस्तकं मी आवर्जून कॉलेजला सोबत घेऊन आलोय. वेळ मिळेल तेव्हा वर्गात असो, कँटीनमध्ये किंवा लायब्ररीत निवांत क्षण असो… मी ही पुस्तकं चाळत राहतो,नोट्स काढतो. सुरुवातीला अर्थकारणाच्या भाषा कळतच नव्हत्या SIP म्हणजे काय, Compound Interest म्हणजे काय, Mutual Fund चा फायदा काय ? … हे सगळं धूसर होतं. पण या पुस्तकांमुळे माझी पैशांकडे बघण्याची नजर फार बदलून गेली आहे.
‘अर्थसाक्षर व्हा’ हे पुस्तक माझ्यासाठी एक मार्गदर्शक ठरलं आहे . सीए अभिजीत कोळपकर सरांनी अतिशय सोप्या भाषेत पैशाचं नियोजन, कर्ज नि विमा व्यवस्थापन, गुंतवणुकीचे तत्त्व सांगितले आहेत. आज मी काही ठरवून वागतो पैसे खर्च करताना थांबतो, बचतीचं मूल्य समजतो याचं श्रेय या पुस्तकाला जातो . त्याचवेळी, ‘म्युच्युअल फंड विषयी बोलू काही’ वाचताना मी पहिल्यांदा गुंतवणुकीला गांभीर्याने पाहिलं. मोनिका मॅम यांची लेखनशैली खूप आपुलकीची वाटते जसं एखादी मोठी बहीण आपल्याला सांगतेय, की “हे कर… पण असंही बघ…💖
त्यासोबतच खोलवर जाऊन परिणाम केला तो ‘पैशाविषयी बोलू काही’ या पुस्तकाने. हे पुस्तक नुसत गुंतवणूक किंवा पैशाचं व्यवस्थापन शिकवत नाही तर आपल्या गरजा, इच्छा, नि ध्येयं यांचं समतोल समजावून सांगतं. यातून मी शिकलो की पैसा म्हणजे केवळ नोटा नव्हे तो आपल्या स्वप्नांची साधनं आहेत. नि त्या स्वप्नांसाठी शिस्तबद्ध नियोजन हवं.
आज मी कोणताही आर्थिक निर्णय घेतो तेव्हा या पुस्तकांतील काहीतरी आठवतं. investment plan करतो तेव्हा SIP च्या तत्त्वांची आठवण होते. नि सर्वात महत्त्वाचं माझ्या पिढीत पैशाबद्दल बोलणं लाजिरवाणं वाटतं पण या पुस्तकांनी मला शिकवलं की पैशावर बोलणं म्हणजे समजूतदार होणं.
जमल्यास ही पुस्तकं जरूर वाचा, समजून घ्या नि स्वतःच्या आर्थिक आयुष्याचा पाया मजबूत करा. तुम्ही किती कमावता यापेक्षा तुम्ही कमावलेलं किती जपता हे आयुष्य ठरवतं नि मी यातून हेच शिकलोय …💖
© Moin Humanist 🌱
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा