बुद्ध चरित्र…🩷



हे पुस्तक धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेलं आहे. यात गौतम बुद्ध यांचं जीवन अगदी सोप्या नि समजण्यास सोप्या भाषेत सांगितलंय. बुद्धांचा जन्म राजघराण्यात झाला पण त्यांना लहानपणापासूनच जगातील दुःख नि वेदना समजायला लागल्या. त्यांनी सुखी आयुष्य सोडून सत्याचा शोध घेतला.

धूप, उपवास, कठोर तपश्चर्या करूनही त्यांना समाधान मिळालं नाही. शेवटी त्यांनी एका झाडाखाली ध्यान करून जीवनातलं खऱं ज्ञान मिळवलं, ज्यामुळे त्या वेदना दूर होतील, हा मार्ग समजला. बुद्धांनी लोकांना अहिंसा, करुणा नि समतेचा संदेश दिला. त्यांनी सांगितलं की माणसाला स्वतःच्या मनाला समजून घेतलं पाहिजे व इतरांशी प्रेमाने वागलं पाहिजे.

हे पुस्तक केवळ इतिहास सांगत नाही तर आपल्या जीवनासाठीही खूप महत्त्वाचं आहे. आपण सुखी होण्यासाठी बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून न राहता, मन शांत ठेवावं, साधं जगावं अन् चांगुलपणा जगात पसरवावा असं हे पुस्तक शिकवतं. 

या पुस्तकामुळे वाचकाला स्वतःच्या आयुष्याबद्दल खोल विचार करता येतो नि जगण्याचा अधिक अर्थ समजतो. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकाने नक्की वाचावं.💙

©️Moin's Shelf🌿🩵

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

We Read आयोजित पत्रलेखन स्पर्धेचा निकाल..🌼

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼