भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म …🩷
सध्या परत एकदा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचतोय नव्हे तर मन लावून अभ्यासतोय. 🌿
हे पुस्तक म्हणजे केवळ धर्माचा इतिहास नाही तर मानवी विचारांना दिशा देणारं, अंधश्रद्धा नि द्वेष यांच्या बेड्यांतून मुक्त करणारं असं ग्रंथरत्न आहे. बाबासाहेबांनी स्वतःच्या अनुभवातून नि अभ्यासातून लिहिलेलं हे लेखन वाचताना असं वाटतं की जणू आपण बुद्धांच्या विचारांचं थेट मूळ गाठतोय.
आतापर्यंतच्या एकंदरीत वाचन-अभ्यासाने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे.द्वेष व नफरत कुणाचंही भलं करू शकत नाहीत. याने होतो तो फक्त नि फक्त नुकसानच. गौतम बुद्ध या बाबतीत सदैव आदर्श ठरतात. त्यांनी द्वेषापासून शंभर फूट लांब राहण्याचा मार्ग दाखवला. धर्म, पंथ, समाज किंवा व्यक्ती कोणाचाही द्वेष करणे म्हणजे आपण स्वतःलाच फसवणं. द्वेष हा माणसाच्या नि देशाच्या प्रगतीचा सर्वात मोठा अडथळा आहे. प्रेमाने जे काम सहज पूर्ण होतात ते द्वेषाने कधीच होत नाहीत.
माणूस जसा वाचतो, शिकतो, तसतशी त्याची परिपक्वता वाढत जाते नि ती वाढायलाच हवी. पूर्वी योग्य वाटणाऱ्या गोष्टी नंतर चुकीच्या वाटू लागतात, आपल्या चुका उमगतात अन् आपण त्या स्वीकारतो. मग त्या चुकीचं ओझं दुसऱ्यांवर ढकलत नाही तर जे झालं ते स्वीकारून पुढच्या मार्गावर पाऊल टाकतो. भूतकाळाला धरून बसत नाही, तर वर्तमानावर लक्ष केंद्रित करतो.
पूर्वी ज्या गोष्टींना आपण खूप महत्त्व द्यायचो, त्या आता क्षुल्लक वाटू लागतात. एखाद्या चुकीच्या निवडीचा किंवा चुकीच्या व्यक्तीचा अनुभव आपल्याला परिपक्वतेचा धडा शिकवतो. आपण चुका सुधारायला प्राधान्य देतो, भूतकाळातील वेदना सोडून देतो नि आज काय करता येईल यावर फोकस ठेवतो.
भगवान बुद्ध नि त्यांचा धम्म हे पुस्तक वाचताना मनात एकच भावना सतत ठसते माणुसकीच सर्वोच्च. ❤️
© Moin Humanist 🌿❤️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा