द लिजेंड ऑफ थोरो 💜

थोरो हा नाव मी पूर्वी कोठेतरी वाचलं आणि ऐकलं होतं. तेव्हापासूनच मला त्यांच्या बाबतीत वाचायचं होत आणि खूप खूप जाणून घ्यायचं होत..मी त्यांच्या साहित्याचा शोध घ्यायला सुरुवात केली पण त्यांच सर्व साहित्य हा इंग्रजी भाषेत उपलब्ध असल्याने मी निराश झालो होतो कारण मला विशेष हे मराठीत हवे होते.अशातच मला १९६५ साली त्यांच्या ‘वॉल्डन’ या पुस्तकाचा दुर्गा भागवत मॅम यांनी केलेल्या ‘वॉल्डनकाठी विचारविहार’ या नावाच्या अनुवादाबद्दल माहिती मिळाली.मी हे पुस्तक खूप शोधलं पण कोठेही मिळालं नाही..यामुळे मी काही इंटरनेट वर उपलब्ध असणारे काही आर्टिकल्स वाचले तर युट्युबर उपलब्ध असलेले काही व्हिडिओस बघितले पण हवी तेवढी माहिती मला काही मिळाली नाही.अशातच मागच्या वर्षी जुलै महिन्यात फेसबुकवर Vishal दादाची थोरोबद्दल एक अप्रतिम आणि शानदार पोस्ट बघितली.त्या पोस्टमध्ये थोरोचे एकंदरीत जे विचार ऍड केले होते ते वाचून तर मी कमालीचा आनंदीत झालो मी ती पोस्ट सेव सुद्धा करून ठेवली.आणि येथूनच काही काळासाठी तरी माझ्या डोक्यातून Exit केलेल्या थोरोने माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा शानदार Entry केली.मी पुन्हा दुर्गा भागवत यांच्या पुस्...