एक होता कार्व्हर 💜
मी जेवढी प्रशंसा या पुस्तकाची ऐकली,वाचली असेल तेवढी कदाचितच कोणत्याही दुसऱ्या पुस्तकाची ऐकली नसेल..वीणा गवाणकर लिखित एक होता कार्व्हर हे पुस्तक वाचायलाच हव्या अश्या काही पुस्तकाच्या यादीत नेहमी अग्रणी असते..यामुळेच काही महिन्यांपूर्वी मी हे पुस्तक वाचून समाप्त केलं आणि जेवढं सुद्धा याबद्दल ऐकलं होतं तेवढं कमीच होत याची प्रचिती मला आली. एक होता कार्व्हरचा प्रवास हा खरंच खूपच प्रेरणादायी आणि खूप काही शिकवून जाणारा होता..आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देणाऱ्या या पुस्तकाबद्दल बोलावे,लिहावे तेवढे कमीच आहे..अनेक दिवसांपासून हे पुस्तक माझ्या संग्रही असून सुद्धा मी हे इतक्या उशिरा वाचलं याचं मला अक्षरशः दुःख झालं..
काही पुस्तके अशी असतात ना जी एकंदरीत आपल्या जीवनावर प्रभाव टाकून आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलत असतात तशाच एका पुस्तकापैकी एक हे पुस्तक...हे पुस्तक आपल्याला आपल्या आयुष्याकडे बघण्याचं एक नवीन दृष्टिकोन देऊन खूप काही नवीन शिकवून जाते जी शिकवण आपल्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावणारी असते..आपल्या आयुष्यातील समस्या,दुःख हे किती फुटकळ आहेत याची प्रचिती आपल्याला हे पुस्तक वाचून येते...हे पुस्तक आपल्याला झपाटून टाकते,आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगात कशाप्रकारे वाट काढायची हे आपल्याला शिकवते,प्रेरणा देते एकूणच जगायला शिकवते....
गरिबी कशाला म्हणतात ?? वर्णभेद म्हणजे काय ??
आई वडील नसण्याच दुःख काय असतो ??
आपल्या आयुष्यात शिक्षणाच महत्व किती आहे ??दुर्दम्य इच्छाशक्ती असणे म्हणजे नेमकी काय ?? आत्मविश्वास कसा असावा ??प्रचंड जिद्द म्हणजे काय ??मेहनत करणे म्हणजे काय ?? काटेकोर शिस्त कशी पाळावी ?? निसर्गप्रेम म्हणजे काय व निसर्गावर प्रेम कसा करावा ?? समाजसेवा करण्याची जिद्द कशी असावी ??खरंच बाह्य सौंदर्यच महत्वाचं असतो का ??आपल्या आयुष्यात आपली परिस्थिती अडथळे आणू शकते का ??इत्यादी असंख्य प्रश्नांची उत्तरे आपल्याला वीणा गवाणकर यांनी जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या महान व्यक्तिमत्वाच्या जीवनावर लिहलेले "एक होता कार्व्हर " हे जीवनचरित्र वाचत असताना मिळतात...
वीणा गवाणकर यांनी प्रचंड अभ्यास,मेहनत,संशोधन करून हे पुस्तक लिहलेले असून ते कोणत्याही इंग्रजी पुस्तकाचं अनुवाद नाही किंवा भाषांतर केलेलं पुस्तक नाही...कार्व्हर यांच्या बाबतीत इंग्रजी भाषेत प्रचंड लिखाण केलं गेलेलं पण मराठी मध्ये शून्य म्हणता येईल एवढंच...
अशातच वीणा ताईंनी #कार्व्हर या महान व्यक्तिमत्त्वाच्या जीवनचरित्रावर एवढं सुंदर/प्रेरणादायी व अगदी साध्या/सोप्या भाषेत पुस्तक लिहून आपल्याला जॉर्ज कार्व्हर या ध्येयवेड्या माणसाबद्दल माहिती दिल्याबद्दल आपण वीणा ताईंचे आभार मानायला हवे... पुस्तक लिहायला खूप मेहनत करावी लागते,कधी कधी रात्रभर जागून टिपा काढाव्या लागत असतात याचा आपण या पुस्तकाला अनुवादित पुस्तक म्हणता क्षणी विचार करायला हवा..हे पुस्तक अनुवादित नसून जॉर्ज कार्व्हर यांच्या जीवनचरित्रावर लिहलेलं मूळ मराठी जीवनचरित्र आहे....
🖋️ आता पुस्तक व कार्व्हर या अफलातून व्यक्तिमत्वावर बोलूया.............❤️
मला याबद्दल जास्त लिहायची तशी जास्त गरजच नाही कारण अनेकांनी हे पुस्तक वाचलेलं व याबद्दल भरपूर लिहलेलं सुद्धा आहेच पण तरीही याबद्दल २ शब्द लिहण्यावाचून मी स्वतःला रोखू शकलो नाही...
जॉर्ज कार्व्हर यांचा जन्म गुलामगिरीच्या काळात अमेरिकेतील डायमंड, मिसुरी येथे एका कृष्णवर्णीय (निग्रो) कुटुंबात झाला..जॉर्जची आई एका शेतकरी कुटुंबात (मोझेस बाबा व सुझानबाई) गुलाम होती..जॉर्ज फक्त २ महिन्याचा असताना एकेदिवशी काही वर्णदृष्ट्यांची नजर तिच्या व तिच्या एका लहान(काळ्या व कुपोषित) मुलावर पडली....मोझेसबाबांनी एका घोड्याच्या बदल्यात त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण वर्णदृष्ट्यांनी तिला परत न करता फक्त जॉर्ज या दमेकरी मुलालाच परत केले व तिला पळून आपल्यासोबत नेले येथूनच तो लहान बाळ दोन महिन्याचा असतानाच पोरका झाला होता..
जॉर्जची देखरेख आता कार्व्हर कुटुंब करू लागला व त्यांनीच त्याला कार्व्हर हे नाव सुद्धा दिले...कुपोषित व अशक्त असलेला हा मुलगा जगेल असा काही भरवसा नव्हता पण कार्व्हर कुटुंबानी त्याला जगवले व उभारी दिली...जॉर्ज लहानपणापासूनच मेहनत व कष्ट करणारा त्याला बागकामाची खूप आवड होती,निसर्गाच्या सोबत त्याची मैत्री होती,तो नेहमी निसर्गाच्या सानिध्यात राहत असे..त्याने शिक्षणासाठी अविरत कष्ट घेतले,मेहनत केली,प्रत्येक गोष्टीतून काही न काही शिकले..समोर येईल तो काम त्याने स्वीकारले घरकाम,बागकाम,धोबी,विणकाम अथवा इतर अनेक काम त्याने केले व आपले शिक्षण पूर्ण केले....या मध्ये त्याला खूप साऱ्या जनांनी मदत केली पण त्याने कोणाचेही फुकट उपकार कधीही घेतले नाही..कार्व्हर कुटुंबांनी त्याचे गुण ओळखून त्याला शिक्षणासाठी पाठवले आणि त्याने श्रमाने/अनेक समस्यांचा सामना करत आपले शिक्षण पूर्ण सुद्धा केले...त्याला अनेक अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले,त्याचा काळा रंग पिच्छा सोडत नव्हता त्याला यामुळे कॉलेजमध्ये प्रवेश सुद्धा नाकारला गेला...पण तरीही तो थांबला/घाबरला नाही किंवा मागे हटला नाही त्याने शिकणे व आपले काम सुरूच ठेवले...
अखेर अनेक समस्यांना तोंड देत त्याला #सिंप्सन कॉलेजात प्रवेश मिळाला..येथे त्याने चित्रकला आणि संगीत कलेत प्राविण्य मिळवले बागकामेत तर तो तबरेज होताच...सिंप्सन कॉलेज नंतर त्यांनी #एम्समधील वनस्पतीशास्त्र व कृषिरसायनशास्त्र या शाखांसाठी नाणावलेल्या #आयोवा स्टेट या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला...चित्रकला व संगीतामध्ये प्राविण्य मिळवून सुद्धा त्यांनी कृषिशास्त्र निवडले कारण #कृषिशास्त्र या विषयाचा अभ्यासच त्यांच्या बांधवांसाठी उपयोग होणारा होता....१८९४ मध्ये त्यांनी आयोवा स्टेट कॉलेजमधून विज्ञानशाखेची पदवी मिळवली आणि याच कॉलेजमध्ये त्यांची नियुक्ती वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापकापदी झाली आणि येथेच त्यांनी शिकवणे सुरू केले..दोन वर्षानंतर म्हणजेच १८९६ मध्ये त्यांनी Agricultural And Bacterial Botany या विषयाची उच्च पदवी M.S सुद्धा संपादन केली...आणि आपले कार्य अविरतपणे सुरूच ठेवले कृषिशास्त्रात अनेक नवीन प्रयोग करून आपली ख्याती जगभर पसरवली...
दक्षिण अमेरिकेतील डॉ.बुकर.टी. वॉशिंग्टन यांनी उत्तर अमेरिकेत राहणाऱ्या प्रा.कार्व्हर यांना पत्र लिहून मदतीची विनंती केली...पत्र मिळताच कार्व्हर सरांनी डॉ.वॉशिंग्टन यांची मदत करायचं ठरवलं आणि आपल्या कॉलेजमधील सर्व कामे आटोपून ते निघाले दक्षिण अमेरिकेतील टस्कीगी या शहरात...टस्कीगी येथे येऊन त्यांनी अल्प वेतनावर आपल्या निग्रो बांधवांच्यासाठी शेतीमध्ये अनेक नवीन प्रयोग केले,रताळ व भईमुगाच्या शेंगापासून अनेक नवीन पदार्थ बनवले,पहिल्या फिरत्या कृषी महाविद्यालयाचा शोध लावला,कृषी क्षेत्रात एकंदरीत क्रांती घडवून आणली,अनेक अनेक प्रदर्शने घेतली व आपल्या निग्रो बांधवांना शेतीमध्ये खूप खूप मदत केली.....आयुष्यभर साधी राहणी व उच्चविचारसरणी हा गुण जोपासत त्यांनी फक्त एका सूट/बुटावर आपला संपूर्ण आयुष्य फक्त आपल्या बांधवांच्या साठी अर्पण केले,कधीही कुणाचा द्वेष त्यांनी केला नाही, जगभर ख्याती मिळाली असताना सुद्धा त्यांना कृष्णवर्णीय लोकांचा द्वेष पत्करावा लागला अपमान सहन करावा लागला,अनेक जणांनी त्यांना भरघोस पैसा देऊ केला पण तरीही त्यांनी शेवटपर्यंत टस्कीगी शहर सोडला नाही,समाजसेवेने त्यांना एकंदरीत झपाटून टाकले होते,आपल्या आरोग्याची काळजी न करता त्यांनी दिवस रात्र कष्ट केले,व्याख्याने/प्रदर्शने घेतली आणि शेवटी आपल्या मातृभूमीतच अखेरचा श्वास घेतला...
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ यांच्या सारख्य जिद्दी व समाजसेवेबद्दल पेटून उठलेल्या,निसर्गप्रेमी मनुष्याबद्दल वाचत असताना आपण किती वेळा रडतो किती वेळा विचारात गुंतत जातो याचा आपल्याला भान राहत नाही...जॉर्ज कार्व्हर यांच्याबद्दल जेवढं लिहावे तेवढं कमीच आहे त्यांच्याबद्दल विस्तृत जाणून घ्यायचं असेल तर वीणा गवाणकर लिखित " एक होता कार्व्हर "हे अफलातून व जबरदस्त पुस्तक प्रत्येकांनी वाचायला हवे.....लेखिकेच्या भाषेत सांगायचं असल्यास :- अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे, एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे. आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच पर्याय उरलेले आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणा-या आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर हताशपणे वाटचालकरायची किंवा परत मागे फिरून काव्हरने दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण या शाश्वत कॄषिसंस्कॄतीचा स्वीकार करायचा. भावी पिढ्यांच्या
-समॄद्धीचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच हवे असे पुस्तक...💜💛🖤
©️ Moin Humanist✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा