मी सरासरी किती रुपयांची आणि कशाप्रकारे पुस्तके खरेदी करतो ??💜


आजकाल पुस्तके ही खूप महाग झालेली आहे,चांगली पुस्तके वाचायची असल्यास चांगली रक्कम मोजावी लागते.पण मला नेहमी स्वतःच्या मालकीचीच पुस्तके वाचावीसी वाटते आणि एकदा वाचलेले पुस्तक स्वतःपासून दूर करावेसे वाटत नाही यामुळे मी शक्यतोर पुस्तके विकत घेऊनच वाचतो.आता विद्यार्थी दशेत असल्याने पैशासाठी सध्यातरी वडिलांवरच मी अवलंबून आहे.मला कोणतेही पुस्तक विकत घेण्यासाठी ते कधीही मनाई करत नाही ते जरी अशिक्षित असले तरीही त्यांना वाचनाची किंमत चांगल्याप्रकारे ठाऊक आहे.मी काही महिन्यांपूर्वी सरळ सरळ पुस्तकांच्यासाठी वडिलांना पैसे मागायचो आणि एकंदरीत ४-५ हजार रुपयांची पुस्तके खरेदी करायचो.असे करत करतच माझ्याजवळ एक मोठा पुस्तकांचा संग्रह /खजिना जमा झाला आणि माझं वाचन वाढतच गेलं..काही दिवसांनी मी आता वडिलांच्या कडून पुस्तकांच्या साठी पैसे  घेणे बंद केले आणि स्वतःचा वयक्तिक खर्च कमी करून पुस्तकासाठी पैशाची सेविंग करायला सुरुवात केली.यासाठी मी एक वेगळं गुल्लक बनवलं आणि २,५,१० -५० जे मिळेल ते जमा करायला सुरुवात केली.

रोज मला वडिलांच्या कडून खर्च साठी १०० रु मिळत असतात मी यामधूनच २५ रु रोज जमा करायला सुरुवात केली.७ फेब्रुवारी २०२० पासून सुरुवात करून मी २९ जून पर्यत ९९९० रु जमा केले तर १ जुलै ते १ ऑगस्ट पर्यत मी ३६७० रु जमा केले आणि या सर्व पैशातून ऍमेझॉन (४०००) व काल (६५००रु) परभणी येथून पुस्तके खरेदी केली..तसे तर मी कधीही पुस्तकांची किंमत वगैरे बघत किंवा इतरांना सांगत नाही कारण पुस्तके ही अमूल्य असतात त्यांचा कधीही मोल होऊच शकत नाही पण फक्त इतरांना काहीतरी शिकायला मिळावे म्हणून येथे किंमत मेंशन केली.सो अशा प्रकारे आपला वयक्तिक खर्च कमी करत तुम्ही पैसे सेविंग करून आपल्या आवडीची पुस्तके खरेदी करू शकता...व डॉ बाबासाहेबांचा "तुमच्याकडे जर दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक.कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसे जगायचं ते शिकवेल.हा विचार जोपासू शकता..❤️

 खाली दिलेल्या फोटोत :-माझे आदर्श बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती ,गुल्लक,जमा केलेले पैसे आणि त्यातून खरेदी केलेली पुस्तके...
©️ Moin Humanist ✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼