युवाल नोवा हरारी 💜



आपण दररोज वेगवेगळ्या पुस्तक आणि कादंबऱ्याबद्दल तर नेहमीच बोलतो,लिहितो,चर्चा करतो आणि वाचतो पण कधी तेवढं पुस्तक लिहणाऱ्या त्या लेखकांबद्दल लिहीत नाही किंवा जाणून घ्यायचं प्रयत्न करत नाही... पुस्तकांसोबत ते पुस्तक लिहणारा लेखक सुद्धा तेवढाच महत्वपूर्ण दुवा असतो कारण त्याने केलेला अभ्यास आणि अनुभवलेला अनुभव तर आपण वाचत असतो.त्यामुळे आपण वेगवेगळ्या पुस्तक, कादंबरी बद्दल जाणून घेत असतानाच मध्ये मध्ये काही वेगवेगळ्या नवीन लेखकांच्या बद्दल सुद्धा जाणून घेत जाऊ...तर चला सुरुवात करूया 

सेपियन्स, होमो डेअस आणि २१ व्या शतकासाठी २१ धडे इत्यादी आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलर पुस्तकांचे लेखक युवाल नोआ हरारी बद्दल..

जेव्हा पासून मी सेपियन्स हे पुस्तक वाचून समाप्त केलं तेव्हापासून या माणसाचं एकंदरीत मी फॅनच झालो आहे..तेव्हापासूनच या माणसाबद्दल माहिती मिळवायला सुरवात केली आणि जसं जसं यांच्या बद्दल वाचत गेलो तसतस या माणसाच्या ज्ञानाच्या प्रेमात पडत गेलो..
युवाल नोवा हरारी यांचा जन्म २४ फेब्रुवारी,१९७६ रोजी इजराईल या देशात एका यहुदी कुटुंबात झाला..युवाल हरारी हे समलैंगिक (Gay) असून ते त्यांच्या पती सोबत यरुशलम च्या बाहेर एका कृषि सहकारी संस्था मोघव मध्ये राहतात..युवाल यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठामधून त्यांची PHD पूर्ण केली असून सध्या ते एक प्रसिद्ध इतिहासकार असून युनिव्हर्सिटी ऑफ जेरुसलेम मध्ये एक प्राध्यापक आहेत..युवाल शुद्ध शाकाहारी असून ते नेहमी योगा/विपश्यना ला प्राधान्य देत असतात..यांनी अनेक पुस्तके लिहलेली असून त्यांची बरीच पुस्तके हे बेस्ट सेलर ठरलेली आहेत यामधूनच सेपियन्स हे एक बेस्ट सेलर पुस्तक..२०११ मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले असून आतापर्यत ४५ भाषांमध्ये हे पुस्तके छापण्यात आले आहे.

या पुस्तकांमध्ये त्यांनी संपूर्ण मानवजातीचा इतिहास उलगडून दिलेला आहे,आपण कोण होतो ??कुठून आलो ?? कसे आलो ?? आणि आता भविष्यात कोठे जाणार आहोत ??इत्यादी असंख्य प्रश्नांचे उत्तर त्यांनी या पुस्तकात दिलेले आहेत..या व्यक्तरीत त्यांनी Homo Deus: A Brief History of Tomorrow आणि 21 Lessons for the 21st Century हे दोन्ही बेस्ट सेलर पुस्तके लिहलेली आहे..
युवाल हरारी यांना सर्वात जास्त बुद्धिमान जीवित व्यक्ती म्हणून ओळखल्या जाते..त्यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या एका मुलाखतीत Covid19 या आजारावर आपले विचार व्यक्त करून संपूर्ण विश्वाला विचार करायला भाग पाडले..इंडिया टुडेशी झालेल्या संभाषणात ते म्हणाले की कोरोना नक्कीच एक मोठी साथीचा रोग आहे, परंतु त्याविरुद्ध लढा देणे सोपे आहे. ते म्हणाले की, या साथी ला लढा देण्यासाठी जगाला एकत्र यावे लागेल, पण सध्या दुर्दैवाने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत.असे सर्व द्वेष दूर करून सर्वांनी एकत्र येऊन या आव्हानावर मात करावी लागेल..

युवालला कोरोना साथीचा आणि जगातील पहिल्या महामारी याबद्दल विचारले असता ते म्हणाले की आपण कोरोनाबाबत अधिक चांगल्या स्थितीत आहोत. मध्ययुगीन काळातील काळ्या मृत्यूच्या पेक्षा हे साथीचे प्रमाण खूपच कमी आहे. आपल्याकडे हे साथीचे रोग समजून घेण्याचे तंत्र आहेत आणि त्यापासून बचाव करण्याचे वैज्ञानिक मार्ग आहेत. परंतु मध्ययुगाच्या ब्लॅक डेथबद्दल कोणालाही ते समजले नव्हते, लोक कसे मरत आहेत, ते कसे थांबवायचे, काही लोक त्यास देवाची शिक्षा मानत होते..लोकांना तेव्हा त्याबद्दल काहिही माहिती नव्हती..
त्यांचे वरील विचार बघून आपण त्यांच्या बुद्धिमतेच अंदाज लावू शकतो...त्यांची सम्पूर्ण मुलाखत तुम्ही इंडिया टुडेवर बघू शकता आणि त्यांचे पुस्तके वाचू शकता आणि नक्कीच वाचा...बाकी लिहायला खूप काही आहे पुढे लवकरच तुम्हाला सेपियन्स या पुस्तकाचा विस्तृत समीक्षण वाचायला मिळेल त्यामध्ये राहिलेले मुद्दे मी कव्हर करायचं प्रयत्न करतो या लेखात आपण फक्त लेखकाचं परिचय करून घेण्याचा प्रयत्न केलाय !!

©️Moin Humanist✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼