गांधी का मरत नाही 💜
महात्मा गांधी म्हटल्यावर नजरेसमोर येतो तो एक वृद्ध गोल चष्मा घालून हसणारा म्हतारा ज्याची भेट रोज कोठे ना कोठे होत असते..कधी एखाद्या पुस्तकात तर कधी एकाद्या चौकाच्या पुतळ्यात बाकी चलनी नोटांवर तर रोज होतेच आणि आज तो त्या नोटांपर्यतच मर्यादित आहे की काय ??अशी एक शंका येते !!कारण गांधीजी बद्दल सध्या जो द्वेष/तिरस्कार वाढलेला आहे तो खरंच विचार करायला भाग पाडणारा आहे..गांधीजींचे जेवढे अनुयायी होते तेवढेच त्यांचे विरोधक सुद्धा आहे..कोणीही त्यांच्यावर काहीही बोलून /त्यांना शिव्या देऊन तोंडसुख घेऊ शकतो कारण या होणाऱ्या विरोधाच्या विरोधात बोलायला त्यांच्या मागे कोणताही एक विशेष समाज किंवा जात उभी राहत नाही.गांधी हे कोणत्याही समाज/जातीचे नसून ते पूर्ण देशाचे आहेत किंवा मग ते कोणाचेच नाही..
ज्या गांधीला संपूर्ण विश्व मानतो,ज्या व्यक्तीपासून अल्बर्ट आईन्स्टाईन,नेल्सन मंडेला,मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर,बराक ओबामा ,स्टिव्ह जॉब्स सारखे दिगग्ज प्रेरित होतात,
ज्याच्यावर सर्वात जास्त पुस्तके लिहली गेलेली असून अनेक देशात त्यांचे पुतळे उभारलेले आहेत त्यांच्या सन्मानार्थ टपालांची जेवढी तिकिटे निघाली आहेत ज्याची गणतीच नाही,ज्याच्यावर एक विदेशी माणूस भारतात येऊन चित्रपट काढतो व तो चित्रपट खूप गाजतो,भारताला आज सुद्धा गांधींच्या नावानेच जास्त करून ओळखले जाते म्हणूनच जेव्हा कोणत्याही देशाचा राष्ट्रपती, प्रधानमंत्री किंवा व्यवसायिक भारताला भेट देतो तो सर्वात आधी राजघाट ला भेट देऊन गांधीजींना अभिवादन करतो मग तो अमेरिकेचा राष्ट्रपती बराक ओबामा/डोनाल्ड ट्रम्प असो किंवा मग ऍमेझॉन चा संस्थापक जोसेफ असो किंवा मग इतर कोणीही असू द्या विदेशात गांधी शिवाय पर्याय नाहीच...
मग प्रश्न पडतो की ज्या गांधीला संपूर्ण विश्व मानतो मग त्याच व्यक्तीला त्याच्याच देशात काही जनांचा एवढ्या द्वेषाचा/तिरस्काराचा सामना का करावा लागतो ??द्वेषापायी ७२ वर्षाआधीच त्यांच्यावर गोळ्या घालून त्यांना ठार करण्यात आल्यानंतर सुद्धा आज का या वृद्धाचे पुतळे का तोडले जातात ??त्यांचा पुतळा बनवून त्यावर का गोळ्या चालवल्या जातात ??अहिंसेची शपथ घेतलेल्या निशस्त्र वृद्ध गांधींची ३ गोळ्या घालून निर्घृण हत्या करणाऱ्या त्या नथुरामला का आज देशभक्त म्हटल्या जाते त्याची पूजा का करण्यात येते ??त्याला हिरो बनवण्याचा प्रयत्न आज काही जनांच्याकडून का होतोय ??इत्यादी असंख्य प्रश्न आहेत जे खूप धक्कादायक आहेत...
आता गांधींचा एवढा विरोध का होतोय ??त्यांचा काही जणांच्या कडून द्वेष का केला जातो ?? तर याच कारण आहे :- गांधीजी बद्दल असलेले गैररसमज/चुकीच्या धारणा/जाणून बुजून पसरवलेल्या अफवा ,त्यांच्याबद्दल असलेल्या अभ्यासाची कमतरता व काही जणांचा वयक्तिक द्वेष कारण गांधींनी यांच्या मनसुब्यावर पाणी फेरल होत म्हणूनच यांना गांधी पटत नाही किंवा यांना खरा गांधी चालत नाही चालतो तो फक्त चलनी नोटेवर !! आता एक सोप्पा नियम आहे जेव्हा एखादी खोटी गोष्ट नेहमीच सारखी सातत्याने सांगितली जाते तेव्हा ती खोटी गोष्ट सुद्धा आपल्याला खरी वाटायला लागते असाच प्रकार गांधीजी बद्दल पसरलेला आहे...गांधीजींबद्दल एवढ्या खोट्या गोष्टी सातत्याने समाजात पसरवलेल्या आहेत की त्या खोट्या गोष्टी सुद्धा आता समाजाला खऱ्या वाटत आहे आणि जेव्हा पासून सोशल मीडिया आला तेव्हापासून तर हा प्रकार जास्तच वाढला आहे...व्हाट्सअप्प युनिव्हर्सिटी वर एवढ्या चुकीच्या/विचित्र अफवा गांधीजी बद्दल पसरवलेल्या आहेत की आजच्या सुशिक्षित तरुणांना सुद्धा त्या खऱ्या वाटत आहेत आणि ते गांधीला सोडून नथुराम ला हिरो मानू लागले आहेत आणि यामध्येच या कट्टरवाद्यांची/गांधीच्या मारेकऱ्यांच्या औलादीची जीत आहे जे गांधीला ७२ वर्षानंतर सुद्धा जाम घाबरतात म्हणूनच गांधी हत्येला गांधीवध म्हणून "मी नथुराम गोडसे बोलतोय " सारख्या नाटकातून गांधीहत्या कशी बरोबर होती हा दाखवण्याचा प्रयत्न करतात..कारण यांना ठाऊक आहे यांनी कितीही प्रयत्न केले तरीही गांधी शरीराने मेला आहे पण त्याचे विचार आज सुद्धा भारताच्या मातीत व गांधीजींना मानणाऱ्या प्रत्येक भारतीयांच्या हृदयात जिवंत आहेत आणि नेहमी राहणार..यांनी कितीही खोट्या अफवा पसरवल्या तरीही सत्य काय ते लोकांना माहिती होईलच..
आता या अशाच सर्व अफवांना/आक्षेपांना सत्य पुरावे देत खोट्या अफवा परवणाऱ्यांच्या कानशिलात मारून उत्तर द्यायचं काम केलंय सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत वानखेडे Chandrakant Wankhade
सरांनी आपल्या " गांधी_का_मरत_नाही "या १६५ पृष्ठ संख्या असलेल्या पुस्तकातून..एकूण १५ लेखातून सरांनी खूपच उत्तमरीत्या/अगदीच सोप्या भाषेत वाचकांना गांधीजींचे खरे व शुद्ध रूप दाखवून दिले आहे !!
गांधी भारतात येण्यापूर्वीचा भारत कसा होता ??
मोहनदास गांधी ते महात्मा गांधी पर्यतचा प्रवास कसा होता ??
गांधी मुस्लिम धार्जिणे होते का ??
गांधी जातीयवादी होते का ??
गांधी यांनी पाकिस्तानला ५५ कोटी द्यायला लावले ??
गांधी कट्टर हिंदू धर्म मानणारे होते का ??
गांधी वर्णभेद मानत होते का ??
गांधीजींच्या मुळेच देशाची फाळणी झाली ??
गांधीजी विरुद्ध डॉ.बाबासाहेब आंबेडकर ??
गांधीजी विरुद्ध सुभाषचंद्र बोस ??
गांधीजींनी भगत सिंह,सुखदेव,राजगुरू यांची फाशी रोखण्यासाठी काहीच केले नाही ??
गांधीजी लष्कराच्या विरोधात होते का ??
गांधीजी हिंदूविरोधी होते ??
गांधी नायक होते की खलनायक ??
इत्यादी असंख्य प्रश्नांची उत्तरे योग्य दाखले व गांधीजींच्या आयुष्यातील काही प्रसंग देत खूपच उत्कृष्ट पद्धतीने लेखकांनी दिलेली आहे.. मनोविकास प्रकाशन तर्फे प्रकाशित या पुस्तकात एकूण १५ लेखात लेखकांनी गांधीजींबद्दल पसरलेल्या खूप साऱ्या अफवांना तडा दिली आहे...याबद्दल लेखकांचे मनस्वी धन्यवाद कारण याविषयावर लिखाण होणे आज जरुरीचे होते....
दक्षिण आफ्रिकेतून गांधीजी भारतात आले व त्यांच्या येण्याने कशाप्रकारे भारतातील स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळेच वळण मिळाले होते..फक्त आणि फक्त आपल्या स्वार्थासाठी स्वातंत्र्य मिळवण्याचा स्वप्न पाहणाऱ्या काही जणांच्या आशेवर गांधींनी कशाप्रकारे पाणी फेरले होते हे लेखकांनी उत्कृष्ट पणे आपल्याला पटवून दिले आहेच ..गांधीजींची ताकद वाढत होती,पण आपण कमजोर होत आहोत.गांधींच्या बाजूनेही जायचे नाही व त्याला विरोध करायची ताकदही नाही यातून आलेली हताशा,निराशा गांधीजीच्या द्वेष,घृणा, तिरस्कारात रुपांतरीत होत गेली.गांधीजींच्या हत्येचे झालेले वारंवार अपयशी प्रयत्न व शेवटी त्याला आलेले यश या हत्येच्या प्रयत्नांना काही कारण तर द्यावी लागतील ??तशीच केविलवाणी कारण देण्याचा प्रयत्न झाला आणि सध्या सुद्धा सुरूच आहे...महात्मा गांधीनी नेहमी देशाचं व जनतेचा भला पाहिला त्यांनी जातीपाती/धर्माला बाजू ठेऊन सर्वांना समान नजरेने बघितले त्यांनी नेहमी शेवटच्या माणसाचं विचार केला.त्यांच्या आगमनापूर्वी भारतात बहुजनांच्या बाबतीत कधीही/कोणीही न केलेला विचार त्यांनी केला होता आणि हीच बाब काही जणांना मुळीच पटनारी नव्हती आणि आता सुद्धा नाही त्यांना भारत ही आपली जागीर वाटतो ज्याच्यावर फक्त यांचाच हक्क आहे..आपण झोपलेल्या लोकांना उठवू शकतो पण झोपेचा सोंग घेतलेल्या लोकांना नव्हे !! यांना तुम्ही कितीही माहिती द्या/पुरावे द्या यांच्या मेंदूत द्वेष एवढा भरलेला आहे की तो सहजच निघणार नाही हे सर्वांना माहिती..पण चंद्रकांत वानखेडे सरांनी ही घाण काढण्याचा प्रयत्न केला ही बाब खरंच खूप कौतुकास्पद आहे त्यामुळे प्रत्येकांनी हे पुस्तक नक्कीच वाचावे व इतरांना सुद्धा जरूर वाचायला सुचवावे..
टीप-फक्त आणि फक्त पुस्तकांबद्दल लिहावे आणि बोलावे..बाकी सर्व प्रश्न पुस्तकांत मिळतील.समीक्षणात दिलेले मत आणि उत्तरे ही लेखकांची आहेत माझी स्वतःचे नाहीत.✍️
©️ Moin Humanist ✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा