डॉ.बाबासाहेब आंबेडकर 💜



डॉ.बाबासाहेब आंबेडकर २००० साली प्रदर्शित झालेला जब्बार पटेल दिगदर्शीत व दक्षिण अभिनेता मामुट्टी अभिनित हा चित्रपट माझा सर्वांत आवडता चित्रपट असून माझ्या आयुष्यात एक मैलाचा दगड ठरलेला आहे..या चित्रपटपासूनच मला पुढे शिक्षण कायम ठेवण्याची प्रेरणा मिळाली.सातवीत असताना सर्वप्रथम दूरदर्शन चॅनेलवर मी हा चित्रपट बघितला होता आणि तेव्हापासून आजपर्यंत किती वेळा बघितला असेल याचा नेम नाही.मला आवडलेल्या बायोपिक चित्रपटात हा चित्रपट सर्वात वरच्या स्थानावर येतो.बाबासाहेबांच्या आयुष्यावर तसे तर अनेक चित्रपट आणि मालिका निघालेल्या आहेत पण या चित्रपटाची काही बातच वेगळी आहे.मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या चित्रपटाचे अनेक भाषेत डबिंग झालेले आहेत ..(इंग्रजी व हिंदी व्यक्तिक्त मराठी, तमिळ, तेलुगू, पंजाबी, बंगाली, उडिया व गुजरात )
या चित्रपटासाठी सामाजिक न्याय मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी ८.९५ कोटी रुपये अर्थसहाय्य दिले होते.२००२ साली या चित्रपटाला ३ राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले होते  Best feature film in English,Best Actor - Mammootty,Best Art Direction - Nitin Chandrakant Desai..

डॉ बाबासाहेबांचा एकंदरीत जीवनच प्रेरणादायी व संघर्षमय होता.त्यांनी केलेले महान कार्य व यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत व कष्टाला तोडच नाही.बाबासाहेब आंबेडकरांचा सम्पूर्ण आयुष्य हा फक्त समाजासाठी/दिंदुबळ्यांच्या हक्कासाठी लढण्यातचं गेलं.त्यांचे शिक्षण,वाचनावरील प्रेम बघून मन प्रफुल्लित होते व आपल्याला सुद्धा एक जबरदस्त प्रेरणा मिळते,समाजाच्या हक्कासाठी लढण्याचं बळ आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रातून मिळते.कोणतीही गोष्ट अशक्य नाहीच याची प्रचिती आपल्याला त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंगावरून येते.दुःख, कष्ट,वेदना,संघर्ष कशाला म्हणतात या गोष्टी आपल्याला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाकडे बघून समजते. त्याकाळी शिक्षणाचा अधिकार सुद्धा नसलेल्या,काही समाज कंठकानी अशपुष्य ठरवलेल्या समाजातून येऊन उच्च शिक्षण घेऊन शिक्षणाच्या सर्वोच्च पदावर जाणारे एकमेव व्यक्ती म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर.

डॉ.बाबासाहेबांचे जीवनचरित्र वाचून डोळ्यात पाणी येणार नाही व प्रेरणेने पेटून उठणार नाही असा एकही मनुष्य सापडणार नाही एवढं नक्कीच आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा जिद्दी व प्रबळ इच्छाशक्ती असणारा व्यक्तिमत्त्व शोधून सापडणार नाही कारण काही धर्माच्या ठेकेदारांनी ज्या गोष्टी करण्याचा अधिकार त्यांना दिला नव्हता त्यांनी त्याच गोष्टी समाजाच्या नाकावर टिच्चून केल्या यातच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे महान व्यक्तिमत्त्व आपल्याला समजते..आता अश्या महान व्यक्तिमत्वाच्या आयुष्यावर जीवनपट बनवणे व तो सुद्धा ३ तासात प्रेक्षकांना दाखवणे ही गोष्ट एकंदरीत अशक्य असली तरीही डॉ.जब्बार पटेल सरांनी ही जबाबदारी उचलली व बऱ्याच प्रमाणात पेलली डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातुन..या चित्रपटात डॉ.बाबासाहेबांच्या बालपणापासून तर त्यांनी घेतलेल्या बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यापर्यत सर्व बाबी सुंदर पद्धतीने दाखवण्यात आलेल्या आहेत..शिक्षणाची आवड व प्रेम ,समाजातील भेदभाव,शिष्यवृत्तीवर विदेशात जाऊन शिक्षण,पुस्तकांवर प्रेम,शाहूमहाराजांची भेट,मूकनायकची सुरुवात,समाजात आलेले कडू अनुभव,महाड सत्याग्रह,रमाबाईंनी घेतलेले कष्ट, काळाराम मंदिर सत्याग्रह, गोलमेज परिषद,पुणे करार,इत्यादी काही बाबीं उत्तम पद्धतीने सादर करण्यात आल्या आहेत..मामुट्टी या गुणी अभिनेत्याने ज्याप्रकारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जिवंत केले त्याला खरंच तोड नाही.त्यांनी साकारलेली बाबासाहेबांची भूमिका विलोभनीय असून आपण त्यांच्या अभिनयाच्या प्रेमात पडतो..संवाद, देहबोली आणि चेहऱ्यावरील हावभाव यांनी उत्कृष्ट पद्धतीने साकारले आहेत.तरुण आंबेडकरांच्या पासून तर वृद्ध आंबेडकर पर्यत जे ट्रान्सफॉर्मशन यांनी केले होते ते खरंच उत्कृष्ट आहे..

"कबीरा कहे यह जग अंधा हा गीत हृदयात घर करून घेतो व काही कालावधी साठी आपल्या ओठांवर राहतो एवढं नक्की..सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत हा चित्रपट आपल्याला गुंतवून ठेवतो एवढं या चित्रपटाच्या पटकथेत दम आहे..कितीही वेळा आणि कधीही हा चित्रपट बघितला तरीही नवीन वाटतो इतकं सुंदर दिगदर्शन जब्बार सरांनी केलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार आणि डॉ.बाबासाहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ❤️

@Moin Humanist ✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼