रावण -राजा राक्षसांचा 💜
शरद तांदळे सर लिखित #रावण_राजा_राक्षसांचा ही कादंबरीचे वाचन तीन दिवसांपूर्वी संपले...या कादंबरीत मी एवढा गुंतलो होतो की त्याचा Hangover अजूनही जरासा सुद्धा उतरलेला नाही...मी रावणाच्या त्या काळात जगतोय अस मला वाटत आहे आणि याचं कारण लेखकाचं एकदम सोप्या आणि स्पष्ट भाषेत केलेलं उत्कृष्ट लिखाण जो वाचल्यावर आपण या कादंबरीत हरवुन गेल्या शिवाय राहत नाही...म्हणूनच मी आज ३ दिवसानंतर या कादंबरीबद्दल माझा अनुभव लिहितोय त्यामुळे नक्कीच वाचा !!
प्रकाश सरांच्या #प्रतिपश्चंद्र या जबरदस्त कादंबरीच्या नंतर मी पुन्हा एक भन्नाट/जबरदस्त कादंबरीच्या शोधात होतो एवढ्यातच मला या कादंबरीची आठवण झाली जी मला अनेक दिवसांपासून वाचायची होतीच म्हणून लगेच ऑर्डर केली आणि मिळताच लगेच वाचायला सुरुवात केली...कारण काही महिन्यांपूर्वी वाल्मिकी रामायण वाचल्यापासून मला श्रीराम व रावणाच्या बाबतीत जाणून घ्यायची इच्छा होती आणि यामुळेच मी श्री रामचंद्रांच्या बाबतीत बऱ्याच पैकी माहिती घेतली सुद्धा..श्री रामाच्या बद्दल सार लिखाण झालेलं आहे,चित्रपट व टीव्ही सिरीज मधून सुद्धा त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे...आणि यातूनच "आज जो श्रीरामांच्या नावावर द्वेषाचा राजकारण होतोय ते श्रीराम हे नव्हे मुळीच नव्हे मी वाचलेले श्रीराम हे मर्यादापुरुषोत्तम राम होते..असा माझा वयक्तिक मत श्रीरामाच्या बाबतीत झाला होता आणि आहे..
श्रीराम वाचल्यानंतर आता मला रावणाच्या बाबतीत माहिती हवी होती पण रावणाच्या बाबतीत हवी तेवढी माहिती उपलब्ध नव्हती..रावण फक्त रामायणापूर्तच मर्यादित होता पण मला लंकेशच्या वयक्तिक आयुष्यावर जास्त माहिती हवी होती.. अशातच मला इंद्रायणी सावकार लिखित #रावनायन हे पुस्तक मिळाले पण वेळे अभावी त्यावेळी ते वाचता आले नाही म्हणून काही दिवसांपूर्वीच वाचायचे नक्कीच केले पण पुन्हा अशातच मला #प्रतिपश्चंद्र ही कादंबरी मिळाली म्हणून #रावनायन सोडून मी ही कादंबरी वाचुन पूर्ण केली आणि आता रावण ही कादंबरी वाचून #रावनायन व #असुर ह्या कादंबऱ्या वाचून पूर्ण करतो कारण आता रावणाच्या बाबतीत जाणून घेण्याची उठकंठा खूप खूप वाढलेली आहे...
रावण हे नाव ऐकता,वाचताच नजरेसमोर येतो तो एक क्रूर/भयानक/खलनायक १० तोंडे असलेला राक्षस...कारण रावणाची प्रतिमाच अशी आजपर्यंत आपल्यासमोर रंगवली गेलेली आहे..चित्रपट,टीव्ही मालिका,पुस्तके/पोथी/पुराणे व ऐतिहासिक कादंबऱ्यातून रावण आपल्या मनात असाच बिंबवण्यात आला आहे आणि आपण सुद्धा जास्त काही विचार न करता तो स्वीकारला आहेच म्हणा...आपल्याला रावणाची नेहमी एकच वाईट बाजू ऐकवण्यात व दाखवण्यात आलेली आहे त्याची दुसरी बाजू कधी आपल्याला कोणी दाखवली नाही अथवा आपणसुद्धा ती बाजू जाणून/माहिती करून घेण्याचं प्रयत्न केलेला नाही ही गोष्ट सुद्धा आहेच....रावणाला फक्त आणि श्रीरामाच्या विरोधात व रामायणापूर्तच मर्यादित करून ठेवलेलं आहे त्याच्या वयक्तिक आयुष्याबद्दल कोणी कधी जाणून घेण्याचा व इतरांना माहिती करून देण्याचा प्रयत्न केलेला नाही असे आपण म्हणू शकत होतो पण आता तरी नाही याच कारण........
१) रावण खरंच क्रूर होता का ??
२)दशग्रीव पासून राक्षसांचा राजा बनण्यापर्यत त्याचा प्रवास कसा होता ??
३)रावण हा नाव त्याला कोणी दिलं ??
४)रावणाला खरंच १० मस्तके होती का ??
५)रावण अमर होता का ??
६)रावण आर्य होता की अनार्य ??
७)रावणाचे आईवडील कोण ??
८)रावणा जवळ खरंच पुष्पक विमान होता का ??
९)रावण नायक की खलनायक ??
इत्यादी असंख्य प्रश्नांची विज्ञाननिष्ठ उत्तरे देऊन रावणाच्या दुसऱ्या सकारत्मक बाजूवर विचार करून आपल्या आयुष्यातील महत्वपूर्ण ५ वर्षे मेहनत/संशोधन/प्रचंड अभ्यास करून रावणाची न माहिती असलेली दुसरी बाजू व त्याच्या वयक्तिक आयुष्यावर प्रकाश टाकण्याचा कार्य केलं आहे शरद तांदळे या लेखकांनी आपल्या #रावण राजा या अफलातून कादंबरीतुन.........
लेखकांनी रावणाची दुसरी बाजू आपल्यासमोर ठेऊन रावणाच्या चरित्राला योग्य न्याय दिलेला आहे यात काही वादच नाही.पण यासोबतच त्यांनी श्रीरामांना सुद्धा कोठेही कमी लेखून त्यांचा अपमान वगैरे केलेला नाही हे विशेष... लेखकांनी रावणाच्या दृष्टिकोनातून ही कादंबरी लिहलेली आहे जी वाचत असताना रावण आपल्याला त्याच्या आयुष्याची कहाणी सांगत असतो आणि त्यासोबत आपण सुद्धा त्याकाळात एकंदरीत हरवून जातो प्रत्येक घटना जणू आपल्या डोळ्यासमोर समोर घडत आहे असे आपल्याला वाटायला लागते....इतिहासात ज्ञात/अज्ञात असलेले व माहिती नसलेले अनेक पात्र आपल्याला त्यांच्या मोहात/प्रेमात पाडतात..सुमाली,पौलसत्य, कैकसा,दशग्रीव,मंदोदरी,कुंभकर्ण,विभीषण,प्रहस्त,महापार्श्व,महोदर,शूर्पणखा इत्यादी.....
आपल्या आई/मावश्यावर झालेल्या अत्याचाराचा सूड घेणारा रावण,महादेवाचा सर्वात मोठा भक्त असणारा रावण,आई/आजोबा/भावंड/बायको,संस्कृती व प्रजेवर प्रचंड प्रेम करणारा रावण,दैत्य,दानव,असुर अशा भटक्या जमातींना एकत्र करून सोन्याची लंका निर्मिती करणारा रावण,आपल्या राज्यातील प्रजेला सुद्धा सोन्याच्या घरात ठेवणारा रावण,जुनी संस्कृती सोडून नवीन राक्षस संस्कृतीची स्थापना करणारा रावण,बुद्धिबळ/रुद्रवीणा/रावणसंहीता,कुमारतंत्र,सांमवेदाची ऋचा, शिवतांडव स्तोत्रची निर्मिती करणारा रावण,आयुर्वेदाचा गाढा अभ्यासक रावण,शिक्षणासाठी गुरुकुल बनवणारा रावण,गणित व संगीताचा जाणकार रावण इत्यादी असंख्य रावणाच्या सकारात्मक पैलूवर लेखकांनी या कादंबरीत भाष्य केलं आहे....
एकूण २९ प्रकरणातून ही कादंबरी पुढे जात असते...1)मी 2) पौलस्त्य: जीवनाचा प्रकाश 3) इतिहास 4)नर्मदा परिक्रमा 5) ज्ञानार्जन 6)ब्रम्हदेव 7)बंडखोर 8)आई 9) मी मरणार नाही 10) क्रुरता 11) दक्षिणेकडे 12) राजा राक्षसांचा 13) शुक्राचार्य 14) लंका 15) विवाह 16) प्रतिशोधाचा शेवट 17) रावण 18) आर्यावर्त 19) यम आणि वरूण 20) मातृहत्या 21) लंकानिर्मिती 22) इंद्रजित 23) शूर्पणखा 24) सीता 25) स्त्री मन 26) वाली हत्या 27) लंकादहन 28) युद्ध प्रारंभ 29) संपलो
वरील प्रत्येक प्रकरणातून काहीतरी सुंदर वाचलं याची प्रचिती येते....कुंभकर्णाची सहा महिन्यांची झोप,लक्ष्मणरेषा, इत्यादी गोष्टी लेखकांनी टाळल्या आहेत.पुष्पक विमान ,विष्णूचे अस्तित्व, दहा मस्तकांचा रावण ,वेदनिर्मिती, अमृतमंथन, मारीच आणि सुवर्णमृग,रावणाची दहा तोंडे ,जटायु पक्षी, हनुमान आणि त्यांची शेपूट,यमाचा दरबार व रेडा इत्यादी काल्पनिक व पुराणातील गोष्टींना लेखकांनी वैज्ञानिक उत्तर सुंदरपणे दिले आहे...बालपण,सुमाली आजोबांची भेट,वडीलांचे आईवर केलेले अत्याचार व एकंदरीत आईवर केलेल्या बलात्कारातून झालेल्या जन्माची जाण,आपण आर्य नसून असुर आहोत याची जाण,आत्महत्या करण्याचा प्रयत्न,आई व मावश्यावर झालेल्या अन्ययाचा सूड घेण्याचा प्रण,पौलसत्य आजोबांची भेट ,ब्रह्मदेव यांच्या आश्रमात शिक्षण,कुबेर/इंद्र/यम/वरूणाचा पराभव,महादेवाची भेट होऊन रावण हे नावग्रहण,विवाह,पुत्रप्राप्ती,वाली सोबत भेट,लंकानिर्माण,आजोबा व आईचा मृत्यू,मेघनादाचा लग्न,सिताहरण,लंकादहन,बिभीषण व माली पुत्रांचा राजद्रोह,युद्ध व शेवट इत्यादी गोष्टी वाचत असताना मन सुन्न होऊन जाते..छोटछोट्या गोष्टींना बारीक पद्धतीने लेखक टिपण्यात लेखक कमालीचे यशस्वी झाले आहे...
टीप:-लिहायला खूप काही आहे मी या कादंबरीवर खूप काही लिहू शकलो असतो रावणाच्या बद्दल माहिती दिली असते पण त्यातून एवढं फरक पडणार जेवढं कादंबरी वाचून पडेल..त्यामुळे नक्कीच वाचा व इतरांना सुद्धा सुचवा...💐💐😊
©️Moin Humanist ✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा