करबला 💜
मराठी साहित्यात अण्णाभाऊ साठे तर हिंदी साहित्यात मुंशी प्रेमचंद हे माझे खुप खूप आवडते व्यक्तिमत्त्व...मला यांनी लिहलेलं सर्वकाही वाचायचं आहे..आजपर्यंत जेवढं सुद्धा वाचलं असून ते तेवढं यांच्या प्रेमात पडत गेलो..आज मी या लेखात मुंशी प्रेमचंद लिखित करबला या पुस्तकाचं परिचय करून देत आहे जे तुम्ही नक्कीच वाचायला हवे..😊
करबला हे पुस्तक हजरत इमाम हुसैन व त्यांच्या ७२ सहकाऱ्यांच्या करबला (इराक)येथे झालेल्या युद्ध/ शहादतीवर आधारित आहे..मुंशी प्रेमचंद यांच्या लिखाण,साहित्याबद्दल लिहायचं काही कामच नाही कारण ते शानदार जबरदस्त जिंदाबादच आहे...या १५८ पृष्ठसंख्या असलेल्या पुस्तकांत लेखकांनी खूपच सुंदररीत्या करबला येथे घडलेला रोमांचकारी व दुःखद इतिहास मांडलेला आहे..एकदा हे पुस्तक वाचायला घेतल तर वाचून पूर्ण केल्या शिवाय मात्र खाली ठेवल्या जात नाही एवढं मात्र नक्की...हजरत इमाम हुसैन यांचा दुःखद,रक्तरंजीत प्रवास,त्यांना त्यांच्या सहकार्यांनीच दिलेला धोका,त्यांची यजीदापुढे न झुकण्याची जिद्द व शेवटी २ दिवस तहानेने व्याकुळ झालेले हजरत इमाम हुसेन व त्यांचे सहकारी व अशातच युद्ध आणि शहिदी....एकूणच पुस्तक वाचत असताना प्रत्येक पात्र हा चक्क डोळ्यासमोर उभा राहतो व आपल्या अंगावर शहारे येतात...लेखकांनी ही कहाणी एकदम एखाद्या चित्रपटांसारखी गुंफली आहे त्यामुळे पुस्तकातील प्रत्येक पात्रांशी आपण जोडल्या जातो..जेव्हा पुस्तक समाप्त होते तेव्हा काही दिवस तरी ही दुःखद कहाणी आपल्या डोक्यातून जाता जात नाही....
कथा सुरू होते जेव्हा जबरण इस्लामचा खलिफा बनलेला यजीद हा ( हजरत इमाम हुसैन )यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात करतो व त्यांना आपले अधिपत्य मानण्यासाठी प्रवृत्त करण्यास प्रयत्न करतो..पण इमाम हजरत हुसैन मात्र त्याच्या कोणत्याही दबावाखाली येत नाही व त्याचे सर्व हुकूम व त्याला खलिफा मानण्यास साफ नकार देतात .. कारण इस्लामचे खलिफा बनण्याचं अधिकार हे फक्त हजरत हुसैन यांचाच असतो व तेथील जनता सुद्धा त्यांनाच खलिफा मानत असते..यजीद त्या पदासाठी अजिबात लायकीचा नसतो तो एक स्त्रीलंपट,मद्यपान करणारा व्यक्ती असतो...तो हजरत हुसैन यांना बंदी बनवून ठार मारण्यासाठी प्रयत्न करतो व २-३ वेळा आपले काही सैनिक त्यांच्यामागे पाठवतो पण हजरत हुसैन त्याच्या हाती मात्र लागत नाही..
या व इतर धोक्यामुळे काही सहकाऱ्यांच्या सांगण्यावरून हजरत हुसैन आपल्या कुटुंबासह मदिना येथून #मक्का येथे जाऊन वास्तव्य करतात ही गोष्ट यजीदला कळते व यजीद इकडे मदिना येथील जनतेवर खूप अन्याय, अत्याचार करतो तो साध्या चुकीवर लोकांचे कत्तल करण्यास सुरुवात करतो.यामुळे जनता एकंदरीत खूप परेशान झालेली असते..कुफा येथील काही जण हजारो सैनिक जमवून इमाम हुसैन यांना पत्र लिहून यजीदकडून जनतेवर होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत कळवतात व ते त्यांच्या कडून लढण्यास तयार आहेत व त्यांना मदिना येथे परत येण्याची विनंती करतात..हे पत्र मिळताच इमाम हुसैन परत मदिना येथे येण्यासाठी तयार होतात पण त्यांना पत्रावर थोडी शंका होते त्यामुळे ते #हजरत_मुस्लिम या एका सहकार्याला पुढे सत्यता तपासण्यासाठी कुफा येथे पाठवतात ..यजीदला याबद्दल माहिती मिळताच तो सुद्धा एक सहकारी हजरत मुस्लिम यांना पकडण्यासाठी कुफा येथे पाठवतो.. इकडे हजरत मुस्लिम कुफा येथे येऊन पत्र पाठवलेल्या व्यक्तींची भेट घेतात व विश्वास झाल्यावर हजरत हुसैन यांना मदिना येथे येण्यासाठी पत्र पाठवून देतात पत्र मिळताच हजरत हुसैन मदिना येण्यासाठी आपल्या ७२ सहकाऱ्यांसह मक्का येथून निघतात ..इकडे हजरत मुस्लिम काही जणांच्या दगामुळे यजीदच्या सैन्याच्या हाती लागतात व यजीदकडून त्यांचे कत्तल केले जाते.. ही गोष्ट इमाम हुसैन यांना माहिती होते तेव्हा ते इराक येथील एका #करबला नामक मैदानावर येऊन पोहचलेले असतात इकडे यजीदला माहिती होताच ते आपल्या एका #साद नामक सहकार्याला हजारों सैनिकांच्या तुकडी सोबत हजरत इमाम हुसैन यांच्यासोबत युद्ध करण्यासाठी पाठवतो..इमाम हुसैन यांना युद्ध नको असते ते त्यांना शांती संधीसाठी पत्र लिहितात पण यजीद त्यांना फक्त स्वतःच्या नावावर बैयत घेण्यासाठी प्रवृत्त करत असतो व ही अट इमाम हुसैन मात्र धुडकावून लावतात..
यजीद इमाम हुसैन यांना नदीतून पाणी घेण्यास बंदी आणतो नदीवर ६००० सैनिक तैनात करतो..शेवटच्या रात्री इमाम हुसैन आपल्या सहकाऱ्यांना परत जाण्यासाठी सांगतात पण परत कोणीही मात्र जात नाही...इकडे भारतातून इमाम हुसैन आणि त्यांचे सहकारी पाण्याविना व्याकुळ होतात लहान मुले पाण्याविना तरफडतात पण यजीदचे सैन्य त्यांना काही पाणी घेऊ देत नाही व असे करत करत इमाम हुसैन यांचे ७२ सहकारी तहानेने व्याकुळ झालेले असताना युद्धात लढतात पण हार मात्र मानत नाही व शहीद होतात आणि शेवटी इमाम हुसैन यांची युद्धभूमीवर नमाज पठण करत असताना गर्दन धडा वेगळी केली जाते व अश्या प्रकारे इमाम हजरत हुसैन शहीद होतात....आणि येथे पुस्तकाची कथा समाप्त होते जी आपल्याला रडवून जाते व विचार करायला भाग पाडते त्यामुळे एकदा धर्माला बाजूला ठेऊन नक्की वाचा...✍️🙏
📙 टीप-लेखात पुस्तकामध्ये दिलेलीच माहिती दिलेली आहे..त्यामुळे काही चूक अथवा एखादा मुद्दा सुटला असेल तर कळवावे... लेख धार्मिक दृष्टिकोनातून लिहिला गेला नसून फक्त पुस्तकाचं परिचय इतरांना व्हावा म्हणून हा प्रपंच.पुस्तकातील कथेबद्दल थोडक्यात लिहले असून.. अनेक प्रसंग लेखांमध्ये जोडलेले नाहीत ते तुम्ही पुस्तकातच वाचा...❤️
©️ Moin Humanist ✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा