अजित डोवाल 💜
आज अविनाश थोरात लिखित #अजित_डोवाल हे १२० पृष्ठसंख्या असलेले हे पुस्तक एकाच बैठकीत वाचून काढले..सध्या देशाचे "राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार" असलेले #अजित_डोवाल यांनी देशासाठी बजावलेल्या कामगिरीचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे.अजित सरांचा
आयपीएस अधिकारी,गुप्तहेर आणि त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनण्यापर्यतचा प्रवास प्रेरणादायी व रोचक आहे..पुस्तक वाचल्यावर आपल्याला आपल्या देशांतर्गत चालत असलेल्या अनेक गोष्टींची माहिती मिळते जी वाचून आपण थक्क होतो.पुस्तकात त्यांचा जीवनचरित्र दिलेला नसून त्यांच्या महत्वपूर्ण कामगिरीवरच प्रकाश टाकलेला आहे कारण अजित डोवाल यांच्या बद्दल खूपच कमी जणांना माहिती आहे..उरी चित्रपटात अजित डोवाल यांची भूमिका परेश रावल यांनी निभावली होती तेव्हापासूनच सामान्य माणसांना यांच्याबद्दल थोडी माहिती व्हायला सुरुवात झाली..उरी चा बदला घेण्यासाठी केलेली सर्जिकल स्ट्राईक असो किंवा पुलवामाचा बदला घेण्यासाठी करण्यात आलेली एयर स्ट्राईक असो या मागे अजित डोवाल यांचा महत्वपूर्ण योगदान होता..पण अजित डोवाल फक्त सर्जिकल व एअर स्ट्राईक पुरतेचं मर्यादित नसून त्यांनी अनेक जागी महत्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे आणि या पुस्तकात काही अशाच न माहिती असलेल्या कामगिरीवर प्रकाश लेखकांनी टाकलेला आहे..लेखकांनी अजित डोवाल यांच्या कामगिरीबद्दल माहितीच्या सोबतच आपल्या देशातील इतर काही महत्वपूर्ण गोष्टीबद्दल सुद्धा उत्कृष्ट माहिती दिली आहे !! उदाहरण :-आयबी,रॉ,काश्मीर समस्या,भारत-पाकिस्तान संबंध,ऑपरेशन ब्लु स्टार,इत्यादी....
उत्तराखंड राज्यातील पौरीगढवाल येथे एका लष्करी अधिकाऱ्याचा कुटुंबात जन्म..अजमेर येथील लष्करी शाळेत शालेय शिक्षण पूर्ण करून आग्रा विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर व त्यानंतर १९६८ साली यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी पदी निवड व येथून सरळ आयबीत(IB) रुजु...आयबीत रुजू होऊन गुप्तहेर बनून पाकिस्तानात ७ वर्षे वास्तव्य असो किंवा मिझोराम येथील बंडखोरांचा बिमोड,कंदाहार विमान अपहरण प्रकरण,इशरत जहान प्रकरण,ऑपरेशन ब्लु स्टार नंतर ऑपरेशन ब्लॅक थंडर मध्ये महत्वपूर्ण भूमिका असो किंवा मग राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर असताना डोकलाम,काश्मीर,बालाकोट,पुलवामा मध्ये केलेली महत्वपूर्ण कामगिरी असो सर्वच बाबतीत अजित डोवाल यांची भूमिका कौतुकास्पद व महत्वाची होती आणि आहे...
🖋️✍️पुस्तकाची अनुक्रमणिका खालीलप्रमाणे जी तुम्हाला पुस्तक वाचायला नक्कीच मजबूर करेल....❤️
१)दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी डिफेन्सिव्ह ऑफेन्स
२) पोलीस अधिकारी ते हेरगिरी
३) मिझो बंडखोरीचा बीमोड
४) पाकिस्तानमध्ये सात वर्षे
५)ऑपरेशन ब्लॅक थंडर
६)दहशतवाद्यांचे आत्मसमर्पण
७) कंदाहार विमान अपहरण प्रकरण
८) कारगिलमधील गुप्तचरांचे अपयश
९)ऑपरेशन दाऊद इब्राहिम
१०)इशरत जहान प्रकरण
११) भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरुद्ध लढाई
१२) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदाची जबाबदारी
१३)मॅन इन अॅक्शन
१४) पठाणकोट हल्ल्याचा धडा
१५)उरी हल्ला : सर्जिकल स्ट्राईकने बदला
१६)डोकलाम संघर्ष : चीनसमोर ताठ भूमिका
१७) नागा बंडखोरांवर सर्जिकल स्ट्राईक
१८)ऑपरेशन बालाकोट
१९)काश्मीर - प्रश्नासंदर्भात डोवालांची भुमिका
वरील प्रत्येक प्रकरणामध्ये अजित डोवाल यांच्या जबरदस्त कामगिरीची प्रचिती आपल्याला येते..आणि आपण एकंदरीत सुन्न होतो !!
नक्कीच वाचा आणि इतरांना सुद्धा सुचवा
©️Moin Humanist ✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा