पोस्ट्स

महामाया निळावंती…🌸❤️

या कादंबरीचं केंद्रस्थान आहे ‘निळावंती’ची ती प्राचीन आख्यायिका. असं म्हणतात की, निळावंती हा असा एक ग्रंथ आहे जो वाचणाऱ्याला निसर्गाची भाषा समजते, प्राण्यांशी संवाद साधता येतो, पण तो ग्रंथ वाचणारा एकतर वेडा होतो किंवा त्याचा अंत होतो.  या आख्यायिकेभोवती सुमेध दादा यांनी विणलेलं जाळं थक्क करणारं आहे.  कथानकात येतो तो विक्रम विभूते एक वैज्ञानिक, ज्याचा तर्कशास्त्रावर विश्वास आहे. पण जेव्हा त्याच्या आयुष्यात एक न भरून येणारं दुःख येतं, जेव्हा तो आपल्या मृत मुलाला पुन्हा जिवंत करण्यासाठी धडपडू लागतो, तेव्हा विज्ञानाची चौकट मोडली जाते. विज्ञानाने नाकारलेल्या गोष्टी जेव्हा मानवी भावनेच्या नि हट्टाच्या जोरावर शोधल्या जातात, तेव्हा काय होतं याचा थरार म्हणजेचं ही कादंबरी. यातलं बाजिंदा हे पात्र नि त्याचा या प्रवासाशी असलेला संबंध काळजाचा ठोका चुकवणारा आहे. सह्याद्रीच्या दुर्गम भागात दडलेली ती रहस्यं, प्राचीन विद्या नि एका पित्याची आपल्या मुलाला परत मिळवण्यासाठी चाललेली धडपड… हे सगळं वाचताना मन सुन्न होतं.  लेखकांनी फक्त सस्पेन्स निर्माण केला नाही तर त्यांनी ‘मेटाफिक्शन’चा इतका सुंद...

रारंग ढांग ❤️💙

इमेज
“जब आदमी मर जाता है, तो उसका क्या रह जाता है?” हे वाक्य वाचलं अन् काही क्षण पुस्तक बंद करून शांत बसलो. प्रश्न साधा वाटतो, पण उत्तर मात्र तितकं सोपं नाही. कदाचित म्हणूनच हे पुस्तक संपलं तरी तो प्रश्न अजूनही मनात फिरत राहतो. प्रभाकर पेंढारकर यांनी 1981 साली लिहिलेली ‘रारंग ढांग’ ही केवळ 168 पानांची कादंबरी आहे. पण या 168 पानांमध्ये त्यांनी हिमालयाचा जो अनुभव उभा केला आहे, तो निव्वळ अविस्मरणीय आहे. पुस्तक वाचताना हिमालय फक्त डोळ्यांसमोर उभा राहत नाही, तर त्याची थंडी, त्याचं वैभव, त्याची भीती नि त्याचं एकाकीपण सुद्धा जाणवू लागतं. कादंबरीचा नायक विश्वनाथ मेहेंदळे. मुंबईतील सुरक्षित नि चांगल्या पगाराची नोकरी सोडून तो हिमालयातील दुर्गम भागात जातो. जिथे Border Roads Organisation उभ्या कड्यांमध्ये रस्ते खोदत असते. जिथे अनेक फूट बर्फ पडतो, ऑक्सिजन कमी असतो नि प्रत्येक दिवस हा जगण्यासाठीचा संघर्ष असतो. पण प्रश्न पडतो एखादा माणूस एवढं सगळं सोडून अशा ठिकाणी का जातो? नि त्या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण नकळत या कादंबरीच्या प्रेमात पडतो. माझ्या मते ही कादंबरी तीन वेगवेगळ्या लढायांची गोष्ट ...

द सेव्हन्थ सिक्रेट 🖤

इमेज
हिटलर खरंच मेला होता का? 30 एप्रिल 1945 - दुसऱ्या महायुद्धाचा शेवट जवळ आला होता. बर्लिनवर सोव्हिएत सैन्याचा ताबा मिळत होता. इतिहास सांगतो की त्या दिवशी Führerbunker मध्ये अॅडॉल्फ हिटलर नि त्याची पत्नी इव्हा ब्राऊन यांनी आत्महत्या केली. त्यांचे मृतदेह जाळण्यात आले नि त्यासोबत नाझी जर्मनीचाही अंत झाला. पण इतिहासात काही प्रश्न असे असतात की त्यांची उत्तरं मिळाली तरी शंका संपत नाही. जर त्या बंकरमध्ये मृत्यू पावलेली व्यक्ती हिटलरच नव्हती तर? जर हिटलरने स्वतःसारखे दिसणारे body doubles वापरले असतील तर? अन् जर जगाला माहिती नसलेल्या एखाद्या गुप्त बंकरमध्ये तो जिवंत राहिला असेल तर? याच कल्पनेवर आधारित आहे आयर्विंग वॅलेस यांची अफलातून थ्रिलर कादंबरी  द सेव्हन्थ सिक्रेट.🌸 कथेची सुरुवात होते ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध इतिहासकार हॅरिसन अशक्रॉफ्ट यांच्यापासून. ते हिटलरचं अंतिम नि सर्वसमावेशक चरित्र लिहित असतात. त्याच वेळी त्यांना एका जर्मन दंतवैद्याकडून एक रहस्यमय पत्र मिळतं. त्या पत्रात असा दावा केलेला असतो की जगाला सांगितलेली हिटलरच्या मृत्यूची कथा पूर्ण सत्य नाही. या धाग्याचा ...

युगंधर...❤️ 🌼

इमेज
मी सर्वप्रथम कधी वाचली हे मला व्यवस्थित आठवतं नाही पण हि माझ्या वाचन प्रवासातील सर्वांत पहिली मोठी कादंबरी होती जी तब्बल 978 पेजेसची होती. जी मी वाचून पूर्ण केली होती नि वाचताना अक्षरशः हरवून गेलो होतो.या कादंबरीने मला श्रीकृष्णाची एक वेगळी ओळख करून दिली होती.इथपर्यंत श्रीकृष्ण हे माझ्यासाठी फक्त टीव्ही मालिकेतील एका पात्रापुरतेच मर्यादित होते.या कादंबरीत मी प्रथमच त्यांच्याबद्दल वाचत होतो जे मनाला फार आनंद देणारा अनुभव होता माझ्यासाठी. आपण सर्वच लहानपणापासून श्री कृष्णाच्या कथा ऐकत, वाचत नि बघत आलोय पण त्या सगळ्या कथा नेहमी एकाच चौकटीतल्या, चमत्कारी नि देवत्वाच्या रंगात रंगलेल्या असायच्या. पण युगंधर या कादंबरीने मात्र या चौकटीला छेद दिला नि यातून श्री कृष्णाला एका अत्यंत मानवी, भावुक नि संघर्षशील रूपात आपल्यासमोर उभं केलं आहे. ही कादंबरी वाचताना मला वाटलं, आपलं आयुष्यही कधीकधी असंच असतं बाहेरून सगळं ठिक असं वाटतं, पण आतून मात्र सतत संघर्ष, द्वंद्व, तडजोड नि काहीतरी शोध सुरूच असतो. शिवाजी सावंतांनी ‘युगंधर’ मध्ये श्री कृष्णाच्या जीवनातील अनेक पैलू उलगडले आहेत. कादंबरीची मां...

वाचन प्रवास....🌼❤️

इमेज
माझ्या आयुष्याचा खरा अभ्यासाचा प्रवास हा 7 वीच्या दुसऱ्या सत्रापासून सुरू झाला. त्याआधीपर्यंत माझं आयुष्य खरं सांगायचं तर काळोखात हरवल्यासारखं होतं. शाळेचं नाव जरी काढलं तरी माझ्या अंगावर काटा यायचा. अभ्यास करणं, पुस्तक वाचणं हा तर अगदी लांबचा विषय होता. पाचवीपासून जवळपास अडीच वर्षं मी अक्षरशः न्यूनगंडात अडकलो होतो. त्या काळात मी फक्त वेळ वाया घालवला जुगार खेळणं, गावच्या नदीवर किंवा शेतात दिवसभर बसणं, निरर्थक फिरणं. माझ्या आयुष्याची गाडी अक्षरशः रुळावरून घसरलेलीच होती. पण प्रत्येकाच्या आयुष्यात जसा एखादा लाईफ-चेंजिंग प्रसंग येतो तसाच माझ्याही आयुष्यात आला. तो म्हणजे दिवाळीच्या सुट्टीत मी जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट माझं आयुष्य बदलून गेला. त्या आधीपर्यंत माझ्या गावात, समाजात ऐकून माझ्या मनात बाबासाहेब म्हणजे फक्त बुद्ध धर्माचे नेते, “जय भीम” म्हणणाऱ्यांपुरते मर्यादित व्यक्ती असं एक गैरसमजाचं चित्र होतं. पण जेव्हा मी हा चित्रपट पाहिला तेव्हा पहिल्यांदा मला बाबासाहेबांचं खरं अफाट व्यक्तिमत्त्व दिसलं. त्यांचा संघर्ष, त्यांचं कष्टाळ...

या जागा राखीव आहेत...🌸❤️

इमेज
आज कॉलेजमध्ये Parliamentarians’ Club ने Does Reservation weaken or redefine merit? या विषयावर चर्चा घडवून आणली.  विद्यार्थ्यांनी आपापली मतं मांडली, वाद–प्रतिवाद झाले. मी माझा एक छोटासा view मांडला नि त्यासाठी मी नेहमी सोबत ठेवत असलेल्या अभिनव चंद्रचूड यांच्या “या जागा राखीव आहेत” या पुस्तकाचा आधार घेतला नि इतराना आवर्जून वाचायचं सुद्धा सांगितलं…❤️ हल्ली मी याबद्दल बऱ्याचदा वाचतोय, म्हणूनच मला हे पुस्तक सुचवावसं वाटतं. या पुस्तकात स्पष्ट सांगितलं आहे की merit म्हणजे फक्त marks किंवा exams नाहीत माणसाला आयुष्यात संधी मिळाल्या का नाहीत, हेही merit चाच भाग आहे. सुरुवातीलाच line unequal असेल, तर Result सारखे कसे असतील? आरक्षण म्हणजे कुणाला gift देणं नाही तर समान पातळीवर आणणं आहे. त्यामुळे reservation weaken करत नाही उलट redefine करतं हा मुद्दा समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचायला हवं..❤️

प्रथम अर्थात् अंतिम मुक्ति…..❤️

इमेज
ओशो यांना वाचल्यानंतर काही दिवसांपुर्वी जे. कृष्णमूर्ती यांच्याकडे वळलोय.आधी यूट्यूब नि गुगल वर काही बघून ,वाचून त्यांच्या ‘The First And Last Freedom’या पुस्तकाचा मराठी अनुवाद , ‘प्रथम अर्थात् अंतिम मुक्ति’ हे वाचायला घेतलं नि कधी वाचून पूर्ण केलं समजलं सुद्धा नाही .🌱 हे पुस्तक वाचताना मला कायम जाणवत राहिलं की आयुष्यात खरी मोकळीक, मनःशांती नि आनंद मिळवण्यासाठी कोणत्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून राहणं चुकीचं आहे. कृष्णमूर्ती खूप स्पष्टपणे सांगतात, की आपली सुख-दुःख, समस्या, गोंधळ हे सगळं बाहेरच्या गोष्टींमुळे किंवा नियतीमुळे घडत नसतं तर ते आपल्याच मनाच्या विचाराच्या अन् जुन्या सवयींच्या साखळीत अडकलेलं असतं. हे पुस्तक वाचताना प्रकर्षानं जाणवतं की खरी “मुक्ती” म्हणजे स्वातंत्र्य, ही धर्म, प्रथा, शिकवणी किंवा कुठल्या आदर्शाच्या मागे धावून मिळत नाही तर ती आपल्याला स्वत:च्या मनाचा, विचारांचा नि कृतींचा तल्लखपणे शोध घ्यावा लागतो असे कृष्णमूर्ती यात समजावतात. या पुस्तकात सुरुवातीला कृष्णमूर्तींनी अनेक दैनंदिन प्रश्न कंटाळा, भीती, दुःख, ईश्वर, आत्मज्ञान अगदी सरळ भाषेत सांगितले आहेत. ...