पोस्ट्स

ऑगस्ट, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

टू किल अ मॉकिंगबर्ड 🕊️🌸

इमेज
तर नुकतीच मी हार्पर ली यांची ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचून पूर्ण केली. 1960 मध्ये प्रकाशित झालेल्या अन् पुलित्झर पुरस्कार प्राप्त या कादंबरीच्या जगभरात कोट्यवधी प्रती विकल्या गेल्या आहेत. पण ही कादंबरी हातातून खाली ठेवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, या कादंबरीची खरी ओळख त्याच्या प्रचंड खपात किंवा लोकप्रियतेत नाहीच , तर ते वाचताना नि वाचून झाल्यानंतरही आपल्या मनात जी एक तीव्र अस्वस्थता रेंगाळत राहते, त्यात आहे.☘️ वरवर पाहता, ही कथा अलाबामा राज्यातील 'मेयकॉम्ब' या एका लहानशा शांत शहरात राहणाऱ्या 'स्काउट' नावाच्या चिमुकल्या मुलीची, तिचा भाऊ जॅम आणि तिचे वकील वडील एटिकस फिंच यांची वाटते.  लहान मुलांचे खेळ, त्यांचे बालसुलभ कुतूहल नि आजूबाजूच्या जगाकडे पाहण्याचा त्यांचा निष्पाप दृष्टिकोन यातून कथेची सुरुवात होते. पण हळूहळू ही कथा आपल्याला एका अशा अंधाऱ्या वळणावर घेऊन जाते, जिथे अमेरिकेचा प्रदीर्घ नि कलंकित वर्णद्वेषाचा इतिहास जसाच्या तसा उघडा पडतो. यातील कथानकाचा मुख्य गाभा नेमकं काय आहे ? तर टॉम रॉबिन्सन या एका कृष्णवर्णीय तरुणावर एका गोऱ्या महिलेने केलेला बलात्कारा...

गंगथडी……❤️

इमेज
नारायण खानसोळे सर लिखित नुकतीचं आलेली नवी-कोरी 256 पृष्ठसंख्या असलेली कादंबरी वाचली नि भरून पावलो असं म्हणू शकतो कारण मी ही कादंबरी वाचली नाही तर अक्षरशः जगून आलोय. काही पुस्तकं वाचताना माणूस पानांमध्ये हरवत नाही तर तो मातीत हरवतो. गोदाकाठच्या त्या ओल्या मातीत, बाभुळबनाच्या दाटवाटात, पुराच्या दरडीखाली वसलेल्या वासरी गावाच्या गल्ल्यांमध्ये.  नारायण खानसोळे सरांची नवी कोरी कादंबरी गंगथडी वाचताना हेच होतं. ही एका गावाची कथा तर आहेच त्यासोबतच ही एका संपूर्ण कृषी संस्कृतीची जिवंत स्मृती सुद्धा आहे नि ती स्मृती इतकी खरी आहे, इतकी अस्सल आहे की वाचता वाचता आपल्याला आपल्या आजोळच्या रानाचा वास यावा, आजीच्या हातच्या भाकरीची आठवण यावी, गुरांच्या गळ्यातल्या घंटेचा आवाज कानात घुमावा. गंगथडी म्हणजे गोदाकाठची जीवनरीत. गोदावरी आईच्या काठावर, नांदेडच्या खालून, काळ्या मातीच्या वावरांमध्ये जगणाऱ्या माणसांची ही कथा आहे. पण लेखक फक्त माणसांबद्दल लिहित नाहीत ते त्या झाडांबद्दल लिहितात, त्या दरडींबद्दल लिहितात, त्या गंगेच्या पाण्याबद्दल लिहितात जी लेकरं, पाखरं, वासरं, किडे-मुंग्यांची माय आहे.  ...