चांगुलपणा ♥️🌼
मला अजिबात आठवत नाही की प्रत्यक्षात नि सोशल मीडियावर सुद्धा मी कोणासोबत कुठल्याही प्रकारचा वाद केला असेल, कोणाला चुकीचं बोललो असेल, धमकी किंवा शिव्या वगैरे दिल्या असतील. कोणासोबतही थोडं सुद्धा काहीही वाकडं नाही. आजपर्यंत भांडण-तंटे वगैरे पासून कायम चार हात लांबच राहिलोय. कोणासोबत मनभेद वगैरे सुद्धा केलेले नाही. एखाद्याला गैरसमज झाले असतील किंवा कोणाला आपल्या काही गोष्टी आवडत नसल्या किंवा आपल्याला त्याच्या आवडल्या नाहीत, तर मी नेहमीच काही न बोलता, न दुखवता त्या व्यक्तीपासून लांब झालोय, मनात कुठलीही चुकीची भावना ठेवता. कोणासोबतही कुठल्याही प्रकारचा वैर नाही. कोणाला कधी काही चुकीचं बोललो असेल तर लगेच माफी मागितली आहे, कारण कोणाला दुखवण्याचा अजिबात हेतू नसतो. 🌸 एवढं चांगलं वागून, कोणाला त्रास न देता जगलो तरीही काही जण न कारणाने जेव्हा तुमचा छुपा द्वेष करतात, तुमच्याबद्दल चुकीच्या भावना मनात ठेवून वाईट बोलत असतात तेव्हा थोडं दुःख स्वाभाविक असतो. कोणाला त्रास न देता, शांतपणे नि कोणाशी कुठलाही वाद न करता जीवन जगणे मला जास्त आवडते.कुठलीही कारणे नसताना असे वागणारे लोक प्रत्येकाच्या ...