पोस्ट्स

सप्टेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाचनाची भूक तळागाळापर्यंत पोहोचवायची आहे...🌼❤️

इमेज
समाजात वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. कुणी आरोग्यासाठी काम करतं, कुणी शिक्षणासाठी, कुणी पर्यावरणासाठी, कुणी महिला, बालकं, ग्रामीण समुदाय किंवा वंचित घटकांसाठी. या सगळ्या कामाची समाजाला गरज आहे. पण या सगळ्या प्रवासात एक गोष्ट मला सतत जाणवते, ती म्हणजे वाचन संस्कृती निर्माण करण्यासाठी, वाचनाची सवय रुजवण्यासाठी अन् पुस्तकं तळागाळातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी अजून खूप मोठ्या प्रमाणावर काम होण्याची गरज आहे. पुस्तक हातात देणं ही एक गोष्ट आहे, पण त्या पुस्तकाकडे ओढ निर्माण करणं, वाचण्यासाठी वेळ अन् जागा निर्माण करणं, वाचलेल्या गोष्टीवर विचार करायला शिकवणं अन् त्या विचाराला आपल्या जगण्याशी जोडणं ही त्याहून मोठी गोष्ट आहे. विशेषतः ग्रामीण भागात, आर्थिकदृष्ट्या मर्यादित कुटुंबांमध्ये किंवा जिथं घरात पुस्तकांचं वातावरणच नाही, तिथं एका पुस्तकाची किंमत फक्त त्याच्या छापील किमतीपुरती राहत नाही. ते पुस्तक एखाद्या मुलासाठी जगाकडे पाहण्याची पहिली खिडकी ठरू शकतं. याच जाणिवेतून We Read च्या माध्यमातून आपण 2020 पासून वाचनाशी संबंधित विविध उपक्रम करत आलो आहोत. पुस्तकांबद्दल लिहिणं...

भारतीय संविधान नेमकं कसं वाचावं? 🇮🇳📖

इमेज
अनेकदा अनेक लोकांच्या हातात भारतीय संविधानाची प्रत दिसते. ते पाहून आपल्यालाही वाटतं की आपण संविधान घ्यावं आणि वाचायला सुरुवात करावी. पण काही पाने वाचल्यानंतर प्रश्न पडतो, नेमकं काय वाचतोय? हे कसं समजून घ्यायचं? कारण संविधान हे कादंबरी, चरित्र किंवा सामान्य माहितीचं पुस्तक नाही. संविधानात भारताचा देश कसा चालतो, नागरिकांना कोणते अधिकार आहेत, सरकारने काय करावं, सरकारच्या अधिकारांना कोणत्या मर्यादा आहेत, न्यायालयाचं काम काय आहे, केंद्र नि राज्य यांचे संबंध कसे आहेत आणि आपल्या लोकशाहीची मूलभूत मूल्यं कोणती आहेत, हे सांगितलं आहे. त्यामुळे संविधान समजून घेण्यासाठी ते फक्त पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचण्यापेक्षा त्याची रचना, त्यामागचा विचार आणि वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. 🌸 संविधान वाचताना सुरुवात प्रस्तावनेपासून म्हणजे Preamble पासून करावी. पण प्रस्तावना फक्त पाठ करण्यासाठी वाचू नये. We, the People of India म्हणजे आम्ही भारताचे लोक या पहिल्याच शब्दांपासून विचार करायला सुरुवात करावी. संविधानाची ताकद कुठून आली? आम्ही भारताचे लो...