पोस्ट्स

आस्तिकशिरोमणी चार्वाक ❤️🌼

इमेज
चार्वाक या तत्त्वज्ञानाबद्दल जेव्हा मला कोणी  विचारतो तेव्हा मी त्यांना नेहमी एकच पुस्तक सुचवतो डॉ. आ. ह. साळुंखे लिखित "आस्तिकशिरोमणी चार्वाक".  हे पुस्तक चार्वाक तत्त्वज्ञानाची सखोल नि नवी दृष्टी देणारं आहे. आपल्याकडे चार्वाक म्हटलं की लगेच ‘नास्तिक’, ‘भोगवादी’, ‘धर्मद्रोही’ अशा चुकीच्या संकल्पना पुढे येतात. पण या पुस्तकातून लेखकाने चार्वाक हा नास्तिक नाही, तर खऱ्या अर्थाने ‘आस्तिकशिरोमणी’ आहे असं ठामपणे सांगितलं आहे. कारण चार्वाक वेदांवर, देवावर, आत्म्यावर विश्वास न ठेवता मनुष्य, त्याचं शरीर, अनुभव, बुद्धी नि प्रत्यक्ष जीवन यावर आधार ठेवतो. तो परमेश्वर, आत्मा, पुनर्जन्म या गोष्टी नाकारतो पण माणसाचं सुखदुःख, न्याय-अन्याय, विवेक अन् समता यांवर विश्वास ठेवतो. हे पुस्तक एकूण आठ भागांमध्ये विभागलेलं असून चार्वाकांचे मूळ ग्रंथ कसे नष्ट झाले, तरी त्यांचे विचार कसे जिवंत राहिले, त्याचा इतिहास, तत्त्वज्ञान, सामाजिक दृष्टिकोन, स्त्री-पुरुष समानतेविषयीचे विचार, यज्ञ-धर्म-जातिव्यवस्थेविषयी त्यांचा विरोध नि माणसाच्या स्वातंत्र्याचा सन्मान या सर्व गोष्टी खूप समजूतदारपणे मांड...

भंगार...💔🌼

इमेज
एखादं पुस्तक असतं, जे वाचताना ते आपल्याला आपल्या जागेवर बसूनच हेलावून टाकतं. भंगार असंच एक पुस्तक आहे.मागे दलित साहित्यातील सर्वच आत्मचरित्र वाचल्यानंतर मी जेव्हा हे पुस्तक उघडलं नि वाचत गेलो नि हे वाचल्यानंतर लक्षात आलं की ही फक्त अशोक जाधव यांची गोष्ट नाही... ही त्या संपूर्ण गोसावी समाजाची वेदना, जगणं नि त्यातून वर यायचा संघर्ष आहे. अशोक जाधव नावाचा एक लहान मुलगा, उकिरड्यावर, कचऱ्यातून भंगार गोळा करत मोठा होतो. भीक मागणं, अपमान सहन करणं, भुकेलेपणावर झोपणं नि आईला रोज दारु पिऊन येणाऱ्या बापाकडून शिव्या-मार खाणं हे त्याचं बालपण असतं. त्या समाजात शिक्षण म्हणजे “बिगडणं” असं समजलं जातं. पण अशोकला शाळा बघून शिकायचं वेडच चढतं. अन् तिथून सुरू होतो त्याचा प्रवास अंधारातून प्रकाशाकडे. तो शाळेत जातो, चोरी करून का होईना पण पुस्तक मिळवतो नि बी.ए., बी.एड्. होतो. शिक्षक होतो. शिक्षक म्हणून काम करताना तो समाजाच्या खऱ्या प्रश्नांवर बोट ठेवतो, बोलतो, प्रश्न विचारतो. हेच त्याचं वेगळेपण ठरतं.त्याच्या समाजात जातपंचायत म्हणजे सर्वोच्च सत्ता. पण तिथे न्याय नाही, केवळ दहशत असते. महिलांना काहीच क...

माती, पंख आणि आकाश... 🌼❤️

इमेज
हे पुस्तक मी प्रथमच वाचलं ते 2021 च्या लॉकडाऊन काळात. त्या वेळी बाहेरचं सगळं बंद असताना माझ्या मनातल्या विचारांमध्ये फार काही सुरू होतं नि अशाच वेळी ‘माती, पंख आणि आकाश’ हे अप्रतिम पुस्तक माझ्या हातात आलं. अक्षरनामा पोर्टवरील एक लेख वाचून मी हे पुस्तक वाचायला घेतलं नि वाचतच सुटलो. मला आठवतं हे वाचल्यानंतर मी फार भारावून गेलं होतं.या पुस्तकातून मला सकारात्मक विचार, प्रेरणा नि आत्मविश्वास याचं एक वेगळंच बळ मिळालं होतं ज्याची त्याकाळी मला फार गरज होती. तेव्हा हे पुस्तक वाचल्यानंतर आपण भविष्यात या लेखकाला प्रत्यक्ष भेटु असं अजिबात विचार केलं नव्हतं.पण गेल्या वर्षी आमच्या कॉलेजमध्ये Colloquy या कार्यक्रमासाठी सर आले. त्यांची मुलाखत होती त्यावेळी मी आवर्जून त्यांना भेटलो.वेळेअभावी जरी फारसं बोलणं झालं नाही तरीही पुस्तकाबद्दल थोडंफार बोललो. तो क्षण आजही लक्षात आहे.तेव्हापासून मला दोन शब्द या पुस्तकाबद्दल लिहायचं होतं जेणेकरून इतरांना या पुस्तकाबद्दल माहिती होईल,पण हेक्टिकमुळे ते तेव्हा काही जमलं नाही पण आज अखेर माझा हा छोटासा अनुभव लिहितोय. हे पुस्तक वाचताना सतत असं वाटत की, एका स...

युगंधर...❤️ 🌼

इमेज
मी सर्वप्रथम कधी वाचली हे मला व्यवस्थित आठवतं नाही पण हि माझ्या वाचन प्रवासातील सर्वांत पहिली मोठी कादंबरी होती जी तब्बल 978 पेजेसची होती. जी मी वाचून पूर्ण केली होती नि वाचताना अक्षरशः हरवून गेलो होतो.या कादंबरीने मला श्रीकृष्णाची एक वेगळी ओळख करून दिली होती.इथपर्यंत श्रीकृष्ण हे माझ्यासाठी फक्त टीव्ही मालिकेतील एका पात्रापुरतेच मर्यादित होते.या कादंबरीत मी प्रथमच त्यांच्याबद्दल वाचत होतो जे मनाला फार आनंद देणारा अनुभव होता माझ्यासाठी. आपण सर्वच लहानपणापासून श्री कृष्णाच्या कथा ऐकत, वाचत नि बघत आलोय पण त्या सगळ्या कथा नेहमी एकाच चौकटीतल्या, चमत्कारी नि देवत्वाच्या रंगात रंगलेल्या असायच्या. पण युगंधर या कादंबरीने मात्र या चौकटीला छेद दिला नि यातून श्री कृष्णाला एका अत्यंत मानवी, भावुक नि संघर्षशील रूपात आपल्यासमोर उभं केलं आहे. ही कादंबरी वाचताना मला वाटलं, आपलं आयुष्यही कधीकधी असंच असतं बाहेरून सगळं ठिक असं वाटतं, पण आतून मात्र सतत संघर्ष, द्वंद्व, तडजोड नि काहीतरी शोध सुरूच असतो. शिवाजी सावंतांनी ‘युगंधर’ मध्ये श्री कृष्णाच्या जीवनातील अनेक पैलू उलगडले आहेत. कादंबरीची म...

द कृष्णा की ...🌼❤️

इमेज
हि कादंबरी म्हणजे इतिहास, पौराणिकता नि थरार यांचं एक भन्नाट मिश्रण आहे. अश्विन सांघी यांची लेखनशैली म्हणजे माहिती नि कल्पनेचं सुंदर कॉम्बिनेशन आहे. सुरुवातीला असं वाटतं की ही एक साधी गुन्हेगारी गोष्ट असेल, पण जसं-जसं आपण वाचत जातो, तसं आपण एका ऐतिहासिक शोधयात्रेत सामील होतो. कथा सुरू होते एका खुनापासून जेव्हा एका नामवंत इतिहासकाराचा खून होतो, तेव्हा त्याचा मित्र प्रोफेसर रवी मोहन सैनी याच्यावर संशय घेतला जातो. पुढे प्रोफेसर सैनी स्वतःच्या निर्दोषतेचा शोध घेत असतानाच तो एका मोठ्या गुपितात अडकतो “कृष्णा की” चं गुपित ही किल्ली केवळ पुराणांमधली कल्पना नाही, तर त्यामागे खूप सखोल संशोधन, ऐतिहासिक पुरावे नि धार्मिक सुत्रे जोडलेली आहेत. या कथेमध्ये लेखकाने श्री कृष्णाच्या जीवनातील अनेक प्रसंग वापरले आहेत पण ते केवळ आध्यात्मिक नसून, वैज्ञानिक, सामाजिक संदर्भात जोडले आहेत. पुस्तकात असे अनेक विविध  संदर्भ येतात . उदा. द्वारका शहराचं रहस्य, समशेरपूरचा खजिना, वेदांमधील संख्यांचं गणित, आर्यवंशाचा इतिहास जे वाचताना आपण भारावून जातो. भारतीय इतिहासाची नि पौराणिकतेची नवी ओळख करून देणं...

माझ्या लिखाणाची गोष्ट...❤️🌼

इमेज
आज मी माझ्या खूप आवडत्या लेखकांचं अनिल अवचट (बाबा) यांचं माझ्या लिखाणाची गोष्ट हे पुस्तक वाचून पूर्ण केलं... खरंतर हे पुस्तक एकदम आपलं वाटलं. अगदी जसं कुणी आपल्याला त्यांच्या मनातलं बोलून दाखवतंय तसं. बाबांचं लेखन हे खूप साधं, सरळ नि थेट असतं. त्यांनी डॉक्टर म्हणून काम करताना अनुभवलेली माणसांची दुःख, अडचणी, मानसिक जखमा हे सगळं त्यांना लिहायला भाग पाडत गेलं. त्यांना लवकरच जाणवलं की फक्त औषधं देऊन काही बदल होत नाही, माणसांच्या आयुष्यातल्या प्रश्नांवर खोलवर विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे. मग त्यांनी समाजातल्या अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, विषमता, शिक्षण, कारागृहातली माणसं, कामगार, शेतकरी, कलाकार, कार्यकर्ते या सगळ्या विषयांवर खूप लिहिलं. त्यांच्या लेखनात कुठेही अवाजवी शब्द नाहीत, भारी भाषेचा आव नाही पण तरी ते थेट मनाला भिडतं. या पुस्तकात त्यांनी अगदी सहजपणे सांगितलंय की त्यांना कोणकोणते प्रसंग भिडले, कोणत्या व्यक्तींच्या बोलण्याने अंतर्मन हललं, कोणत्या ठिकाणी फिरताना काही वेगळी जाणीव झाली नि त्यातून ते लिहायला लागले. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या लेखनप्रवासाची गोष्ट त्यांनी का अन् क...

खऱ्या शिक्षणाच्या शोधात ❤️🌼

इमेज
आपल्याला लहानपणापासून शिकवले जातं की अभ्यास करा, परीक्षेत चांगले गुण मिळवा नि पुढे जाऊन चांगली नोकरी मिळवा. पण शिक्षण म्हणजे नुसतं हेच का ? मुलांना शाळेत खरोखर माणूस म्हणून घडवलं जातं का? त्यांच्या जिज्ञासेला, कल्पनाशक्तीला, आत्मभानाला पोसण्याचं काम शाळा करतं का? याच विचारांनी झपाटलेला शिक्षक डेव्हिड ग्रिबल सरांनी "खऱ्या शिक्षणाच्या शोधात" हे पुस्तक लिहिलं आहे. लेखक स्वतः पारंपरिक शिक्षणव्यवस्थेतील शिक्षक होते. डार्टिंग्टन हॉल स्कूलमध्ये शिकवताना त्यांनी अनुभवलं की शाळा ही फक्त शिकवण्याची जागा नसून एक प्रयोगशाळा असते जिथे विचार, स्वातंत्र्य, सहभाग अन् आनंद असायला हवा. जेव्हा ही शाळा बंद झाली, तेव्हा त्यांनी सँड्स स्कूल सुरू केली जी अधिक खुले, स्वायत्त नि मुलांना केंद्रस्थानी ठेवणारी शाळा होती. या पुस्तकात त्यांनी जगभरातील 14 वेगवेगळ्या शाळांची सफर घडवून आणली आहे. या शाळा इंग्लंड, अमेरिका, भारत, जपान, इस्रायल, इक्वाडोर, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड या देशांमध्ये आहेत. प्रत्येक शाळेची पद्धत, मूलभूत तत्त्वं, मुलांसोबतचा संवाद नि शिकवण्याची शैली वेगळी आहे पण एक समान धागा...