पोस्ट्स

पार्टनर 🌼🌾❤️

इमेज
व.पु.काळेंचं साहित्य माझ्यासाठी नेहमीच खास नि स्पेशल राहिलं आहे. त्यांच्या लेखनात एक वेगळाच जिव्हाळा नि जीवनाकडे पाहण्याची एक समजूतदार दृष्टी असते. मी आधी वाचलेली त्यांची अनेक पुस्तकं वपुर्झा,तू भ्रमत आहासी वाया,आपण सारे अर्जुन, दोस्त, पाणपोई, तप्तपदी इत्यादी. प्रत्येक वेळी मला वेगळ्या कोनातून विचार करायला लावतात. त्यातलंच एक खास पुस्तक म्हणजे "पार्टनर." या कादंबरीने मला केवळ कहाणी नाही दिली, तर एक खोल भावनिक नि मानसिक प्रवास दिला. मी ही कादंबरी आधी एकदा वाचली होती. तेव्हा ती एक प्रेमकथा वाटली होती. श्री, किरण, अरविंद यांची गोष्ट. पण आता, मागे पुन्हा एकदा प्रेमात पडल्यावर पुन्हा जेव्हा वाचली, तेव्हा तिचं वेगळंच रूप उघडं पडलं. वपु कधीच सरळ कथा सांगत नाहीत. ते पात्रांमधून, प्रसंगांमधून नि खूप साध्या शब्दांतून मोठ्या प्रश्नांची उत्तरं देतात. या कादंबरीतलं सर्वात विशेष पात्र म्हणजे "पार्टनर." त्याचं नाव कधी येत नाही, पण त्याचं अस्तित्व पूर्ण कथेत जाणवत राहतं. तो श्रीच्या आयुष्यात येतो, त्याला ऐकतो, समजतो नि मग हळूच निघूनही जातो. पण श्रीला त्याचा खरा अर्थ कळा...

सर्वोत्तम भूमिपुत्र: गोतम बुद्ध ❤️🌼

इमेज
हे डॉ. आ. ह. साळुंखे लिखित पुस्तक मी आजपर्यंत दोन वेळा वाचले आहे.हे वाचताना मला बुद्धाच्या विचारांची अधिक गहिराईने जाणीव झाली. बुद्ध ही केवळ ऐतिहासिक व्यक्तिरेखा नसून, ते सामाजिक क्रांती नि वैचारिक परिवर्तनाचे आधारस्तंभ होते, हे पुस्तक ते अधिक स्पष्ट करतं. या पुस्तकात साळुंखे बुद्धाचा परिचय 'भूमिपुत्र' या शब्दातून करतात. यामागचा अर्थ अत्यंत सूक्ष्म आहे गोतम बुद्धांना भूमीशी, सामान्य जनतेशी जोडणारे मानले जाते. त्यांचा धम्म हा ईश्वरावर आधारित नसून, मानवकेंद्री आहे. म्हणूनच तात्या त्यांना ‘सर्वोत्तम भूमिपुत्र’ म्हणतात. हे दुसऱ्या वाचनात नीट लक्षात आलं. पुस्तकात बुद्धांच्या जीवनातील अनेक महत्त्वाचे टप्पे उलगडले गेले आहेत त्यांच्या राजवाड्याच्या आयुष्यातून बाहेर पडणं, दुःखाचं कारण शोधणं, ज्ञानप्राप्तीसाठीचा प्रयत्न नि अखेर आत्मप्रबोधन. बुद्धाचं “चार आर्यसत्य” (दुःख, दुःखाचा कारण, दुःखाचं निवारण नि निवारणाचा मार्ग) हे केवळ धार्मिक तत्वज्ञान नव्हे, तर एक मानसशास्त्रीय विश्लेषण सुद्धा आहे जे मानवी आयुष्याच्या समस्यांवर भाष्य करतं. याची मला दुसऱ्या वाचनात खोल समज मिळाली. तात...

फेलानी 💜🌼

इमेज
मागे फेब्रुवारी मध्ये हि कादंबरी वाचली नि विचारात पडलो,अस्वस्थ झालो तेव्हापासून बऱ्याच जणांना या कादंबरीबद्दल सांगितलं.कॉलेजमध्ये आसाम येथील एका मित्रांसोबत सुद्धा चर्चा करून नेमकी परिस्थिती त्याच्याकडून जाणून घ्यायचं प्रयत्न सुद्धा केलं नि आज याबद्दल दोन ओळी लिहितोय.🌼 अरूपा पटनिया कलिता यांची आसामी भाषेतली हि कादंबरी असून या कादंबरीचा मराठीत अनुवाद मेघना ढोके यांनी केला आहे. फेलानी ही केवळ एक पात्र नाही, तर ती एका संपूर्ण वर्गाची, संपूर्ण जमातीची प्रतिनिधी आहे ज्या लोकांना सतत परके ठरवले जाते, हुसकावून लावले जाते नि विसरले जाते. फेलानी या मुलीची कथा एका दलदलीतून सुरू होते, जिथे तिच्या आईने तिला फेकून दिलं तिला वाचवण्यासाठी. ही सुरुवातच आपल्याला अस्वस्थ करते. फेलानी जिवंत राहते, पण तिच्या आयुष्याचा प्रवास कठीण असतो. ती एकटीच नाही, तिच्यासारखे अनेक लोक आसाममध्ये विस्थापित झाले आहेत कारण त्यांच्यावर ‘बांगलादेशी घुसखोर’ असा शिक्का मारण्यात आला आहे.या कादंबरीच्या पार्श्वभूमीला आसाममधील 1979 ते 1990 दरम्यानचे सामाजिक नि राजकीय संघर्ष आहेत. त्या काळात मोठ्या प्रमाणावर दंगली, आंद...

रविंद्रनाथाच्या सहवासात❤️🌼

इमेज
मैत्रेयी देवी यांनी लिहलेले हे पुस्तक वाचताना मला जणू काही एका वेगळ्या जगात प्रवेश केल्यासारखे वाटले. हे पुस्तक म्हणजे केवळ आठवणींचा संग्रह नाही, तर एका थोर साहित्यिकाच्या, विचारवंताच्या नि माणसाच्या अंतरंगात डोकावण्याची एक सुंदर संधी आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्यासोबत मैत्रेयी देवी यांनी 1934 साली मोंगपु येथे घालवलेला काळ, त्यावेळचे संवाद, त्यांची दैनंदिनी, त्यांच्या मनाच्या गूढ कप्प्यात डोकावण्याचा अनुभव, हे सगळं पुस्तकात इतकं हळुवारपणे नि प्रामाणिकपणे उतरवलं आहे की वाचक म्हणून मीही त्या सहवासाचा एक भाग झाल्यासारखं वाटलं. टागोर हे केवळ एक महान कवी किंवा नोबेल पुरस्कार विजेते लेखक नव्हते, तर ते एक अत्यंत संवेदनशील, प्रेमळ नि सगळ्यांना आपलंसं करणारे व्यक्तिमत्त्व होते, हे प्रत्येक पानावर जाणवत राहते. पुस्तकाची भाषा अतिशय साधी, ओघवती नि भावस्पर्शी आहे व तेवढाच सुंदर अनुवाद विलास गीते सरांनी केलं आहे. मैत्रेयी देवी यांनी आपल्या अनुभवांना कुठेही अतिरंजित किंवा अलंकारिक न करता, अत्यंत नैसर्गिक अन् आपुलकीने शब्दबद्ध केलं आहे. त्यामुळे वाचकाला त्या काळात, त्या वातावरणात, शांतिनिक...

Into the Wild 🌼❤️

इमेज
हा चित्रपट मी अनेकवेळा बघितला नि बघत असतो.तो बघितल्यावर नेहमीच वेगळीच शांतता मनात पसरते. ख्रिस्टोफर मॅकँडलिस नावाचा एक तरुण, जो सर्व काही सोडून, कॉलेज, घर, नाव, पैसा, कार्ड सगळं सोडून जंगलात, निसर्गात, एकटं जगायला निघतो. हे सगळं वाचताना किंवा पाहताना खूप विचित्र वाटतं, पण त्याचे कारण समजलं की आपणही विचार करायला लागतो आपण खरंच काय शोधतोय? आपण खरंच जिवंत आहोत का? चित्रपट खूप हळूगतीने उलगडतो, पण प्रत्येक दृश्यामध्ये काहीतरी सांगायचं असतं. ख्रिस्टोफरला आपण समाजात बघतो तसं काहीच नको असतं. त्याला वाटतं की आपण जिथं वाढलो, शिकलो, ते सगळं खोटं आहे. आई-बाबा भांडणं करतात, प्रेम दाखवतात पण खरी माया कुठेच नाही. कॉलेजचं शिक्षण झालं, पण पुढचं आयुष्य म्हणजे नोकरी, लग्न, कर्ज नि समाजाने ठरवून दिलेला एक मार्ग. पण ख्रिस्टोफर वेगळ्या वाटेवर निघतो. तो म्हणतो –  “Truth is, I don't need money. It makes people cautious.” त्याचा विश्वास फक्त निसर्गावर, स्वतःवर नि अनुभवांवर असतो. प्रत्येक प्रवासात तो वेगवेगळ्या लोकांना भेटतो. कुणी त्याला अन्न देतो, कुणी काम, कुणी प्रेम. पण कुणीच त्या...

फँड्री 💔🖤

इमेज
हा चित्रपट माझ्या मनात खोलवर रुतलेला आहे. 2014 साली नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट माझ्यासाठी फक्त एक चित्रपट नसून तर आपल्या समाजाचं कटू सत्य दाखवणारा आरसा आहे.आतापर्यंत किती वेळा बघितलं असेल हे सांगू शकतं नसलो तरीही जेव्हा सुद्धा बघतो तेव्हा हा नव्याने उमजतो. हि गोष्ट आहे जब्या नावाच्या सातवीत शिकणाऱ्या मुलाची जो एका जातीयव्यवस्थेने निर्माण केलेल्या दलित कुटुंबातून आहे. त्याचं कुटुंब गावात मिळेल ते काम करत असतो, तर कधी डुक्कर पकडण्याचं काम करतं, त्यामुळे गावकरी त्यांना ‘फँड्री’ म्हणून हिणवतात. जब्याला शाळेतल्या जातीयव्यवस्थेने ठरवलेल्या उच्च जातीच्या शालूवर प्रेम आहे, पण जातीभेद नि गरिबी त्याच्या प्रेमाला नि मुळात स्वप्नांना बेड्या घालते यामुळेच त्याचं प्रेम हे स्वप्नच राहतं.त्याला शालूचं लक्ष वेधण्यासाठी काळ्या चिमणीचा वशीकरणाचा उपाय करायचा आहे व यामुळे तो काळ्या चिमणीच्या शोधात असतो. हा चित्रपट जब्याच्या निरागस प्रेमकथेपासून सुरू होतो, पण हळूहळू जातीभेद, सामाजिक विषमता अन् मानवी क्रूरतेचं विदारक वास्तव उलगडतो. मला वाटतं, हा चित्रपट प्रत्येक ...

72 मैल एक प्रवास 🌼🖤

इमेज
काही दिवसांपूर्वी मी '72 मैल एक प्रवास’ हा मराठी चित्रपट पुन्हा एकदा बघितलं नि खरंच, मन फार भरून आलं. हा 2013 साली आलेला चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो.🌼एका तेरा वर्षांच्या मुलाची, अशोक व्हटकरची ही कथा आहे. तो साताऱ्याच्या वसतिगृहातून पळून आपल्या कोल्हापूरच्या गावी निघतो. त्याचा हा प्रवास 72 मैलांचा आहे, पण त्या प्रवासात त्याला इतके अनुभव येतात की त्याचं आयुष्यच बदलून जातं. मला खूप आवडलं की ही गोष्ट खूप साधी आहे, पण तरीही मनाला फार भिडते. अशोक रस्त्यात वेगवेगळ्या लोकांना भेटतो काही त्याला मदत करतात, तर काही त्याला त्रास देतात. विशेषतः त्याला त्याच्या जातीमुळे अपमान सहन करावे लागतात, जे पाहून खूप वाईट वाटतं. पण त्यातच राधाक्का नावाच्या एका दयाळू बाई सोबत त्याची भेट होते. ती आपल्या आजारी मुलाला घेऊन सांगलीच्या शिगावला निघाली आहे. ही भेट अशोकसाठी खूप खास ठरते नि आपल्यालाही ती खूप भावते.चित्रपटातलं गावं, शेतं, रस्ते सगळं इतकं सुंदर दाखवलंय की आपण त्या काळातच गेल्यासारखं वाटतं. हा चित्रपट पाहताना आपल्याला आपलं गाव, परिसर आठवतो. प्रत्येक सीन इतका खरा वाटतो की जणू...