पोस्ट्स

एका महिन्याचा प्रवास 🌼❤️

इमेज
आज मला 'कौटिल्य स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी' मध्ये येऊन एक महिना पूर्ण झाला आहे. या एका महिन्यात खूप काही शिकायला मिळालं. सुरुवातीचे काही दिवस थोडे अवघड गेले कारण सगळं नवीन होतं—भाषा, वातावरण, माणसं, अभ्यास नि शिकवण्याची पद्धत. पहिल्या आठवड्यात तर खूप गोंधळून गेलो होतो. इंग्रजी बोलण्याचा थोडा त्रास जाणवत होता, ज्यामुळे मनावर दडपण आलं होतं. आजूबाजूला फक्त इंग्रजीचं वातावरण ऐकून थोडं अस्वस्थ वाटतं होतं.  सुदैवाने, ओरीएंटेशन नि टीम बिल्डिंग अ‍ॅक्टिव्हिटीजमुळे माझी नवीन मित्रांशी ओळख झाली, ज्यामुळे मनातील गोंधळ कमी झाला. हळूहळू मी स्वतःला या नव्या वातावरणात एडजस्ट करू लागलो. जसजसा वेळ जात होता, तसतसं या नव्या परिस्थितीत रुळत गेलो. आता समजलं की हीच ती संधी आहे, जी मला स्वतःला पुढे नेण्याची नि नवीन कौशल्यं आत्मसात करण्याची संधी देणार आहे. या एका महिन्यात मी विविध लोकांशी संवाद साधला, त्यांच्या अनुभवांतून खूप काही शिकायला मिळालं. अभ्यास नि चर्चांमधून अनेक नवीन गोष्टी उलगडत गेल्या. आता स्वतःवर जास्त आत्मविश्वास वाटतोय नि या प्रवासाचा पुढचा टप्पा मी एका आव्हानासारखा स...

चांगुलपणा ♥️🌼

इमेज
मला अजिबात आठवत नाही की प्रत्यक्षात नि सोशल मीडियावर सुद्धा मी कोणासोबत कुठल्याही प्रकारचा वाद केला असेल, कोणाला चुकीचं बोललो असेल, धमकी किंवा शिव्या वगैरे दिल्या असतील.  कोणासोबतही थोडं सुद्धा काहीही वाकडं नाही. आजपर्यंत भांडण-तंटे वगैरे पासून कायम चार हात लांबच राहिलोय. कोणासोबत मनभेद वगैरे सुद्धा केलेले नाही. एखाद्याला गैरसमज झाले असतील किंवा कोणाला आपल्या काही गोष्टी आवडत नसल्या किंवा आपल्याला त्याच्या आवडल्या नाहीत, तर मी नेहमीच काही न बोलता, न दुखवता त्या व्यक्तीपासून लांब झालोय, मनात कुठलीही चुकीची भावना ठेवता. कोणासोबतही कुठल्याही प्रकारचा वैर नाही. कोणाला कधी काही चुकीचं बोललो असेल तर लगेच माफी मागितली आहे, कारण कोणाला दुखवण्याचा अजिबात हेतू नसतो. 🌸 एवढं चांगलं वागून, कोणाला त्रास न देता जगलो तरीही काही जण न कारणाने जेव्हा तुमचा छुपा द्वेष करतात, तुमच्याबद्दल चुकीच्या भावना मनात ठेवून वाईट बोलत असतात तेव्हा थोडं दुःख स्वाभाविक असतो.  कोणाला त्रास न देता, शांतपणे नि कोणाशी कुठलाही वाद न करता जीवन जगणे मला जास्त आवडते.कुठलीही कारणे नसताना असे वागणारे लोक प्रत्येकाच्या ...

मी माझ्या शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ कशाप्रकारे मिळवले ? 🌼

इमेज
कॉलेजमध्ये निवड झाल्यानंतर जशा प्रत्येक ध्येयाच्या वाटेवर नेहमीच काही अडचणी येतात.तशाच माझ्या ध्येयाच्या वाटेवरही मोठी आर्थिक अडचण आली होती. 90% शिष्यवृत्ती मिळूनही दोन वर्षांचा खर्च तब्बल 6,89,000 रुपये येणार होता, ज्यातील 1 लाख रुपये एका आठवड्याच्या आत भरून ऍडमिशन कन्फर्म करायचे होते. हे सर्व माझ्या आवाक्याबाहेर होते. काहीही झाले तरी ऍडमिशन तर घ्यायचं होतं, पण फीचा प्रश्न डोंगरासारखा समोर उभा होता. काय करावे, हेच सुचत नव्हते. Education Loan साठी अर्ज केला होता, पण ते वेळेवर मिळणार नव्हते आणि मला एका आठवड्याच्या आत 1 लाख रुपये लागणार होते. त्या क्षणी काळजीने मनात घर केले होते. मग एक कल्पना सुचली, ती म्हणजे माझ्या संपर्कातील We Read नि पुस्तकामुळे नाळ जुडलेल्या काही निवडक व्यक्तीकडे मदत मागायची. 'पब्लिक फंडिंग' वगैरे न करता फक्त विश्वासू लोकांकडून मदत मागायची ठरवली. यासाठी 50 लोकांची यादी तयार केली आणि एक विस्तृत पोस्ट लिहिली, ज्यामध्ये एकूण सर्वकाही डिटेल्स शेअर केल्या. पहिल्यांदा 35 लोकांना मेसेज केला, त्यापैकी 32 लोकांनी लगेच पैसे पाठवले. दोन दिवसांनी शाळेतील शिक...

स्वाभिमान ♥️🌼

इमेज
एखाद्या मोठ्या 'राजवाड्याच्या' राजाची हुकूमत, मी माझ्या छोट्याशा 'झोपड्यात' कदापी अजिबात चालू देणार नाही. कारण येथे माझ्या छोट्या 'झोपडीचा' बादशाह मी आहे..🌼 तू खूप मोठा राजा असशील, शक्तिशाली असशील, पण त्यांच्या समोर जी तुझी चापलुसी करतात, तुझ्या समोर झुकतात आणि तुझ्या महालातील विविध पंचपकवानांची ज्यांना लालसा आहे. आपल्या कष्टाने आपल्या झोपड्यात स्वाभिमानाने 'शिळी भाकरी' खाणाऱ्यापुढे तुझं काही एक चालणार नाही. तुझं मोठेपण जे तुला मोठे मानतात फक्त त्यांच्याच पुढे. मला माझ्या झोपडीतच समाधान आहे, कारण इथे मी माझ्या स्वातंत्र्याने जगतो नि ही Liberty माझ्यासाठी फार मोलाची आहे. तुझं ऐश्वर्य हे तुझ्या महालातच शोभतं. माझ्या साध्या जीवनात मला फक्त माझ्या मेहनतीची कदर आहे. त्यामुळे माझ्या झोपडीत मीच राजा, आणि इथे फक्त माझं राज्य चालेल. माझ्या 'शिळ्या भाकरीत' मला जे समाधान मिळतं, ते तुझ्या पंचपकवानात सापडणं कठीण आहे. कारण माझ्या मेहनतीत, माझ्या स्वाभिमानात मला माझं खरं सुख मिळतं. तुला माझी झोपडी लहान वाटत असेल, पण इथे माझं मन तुझ्या अपेक्षेपेक्षा...

यशवंतराव ते कौटिल्य ♥️

इमेज
बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन या वर्षी आयुष्यात प्रथमच दोन वर्षासाठी घराच्या बाहेर उच्चशिक्षणासाठी पहिला पाऊल टाकतोय.  काल रात्री कॉलेजचा Mail आला.22 जुलै पासून अकॅडेमिक लाईफ सुरू होईल. 21 जुलैला हैदराबादला जायचं आहे नि पुढे दोन वर्षे तेथे राहून खूप शिकायचं आहे.🥰 आतापर्यंत कधीही एक आठवड्यापेक्षा जास्त आईवडिल अन् घरापासून दूर राहिलेलो नाही.पहिली ते पदवीपर्यंतच शिक्षण गावातूनच पूर्ण केलं असल्याने बाहेर जायची गरजचं पडली नव्हती. अजून 2 महिने वेळ जरी असला तरीही मनात संमिश्र भावना दाटून आल्या नि येत आहे.नवीन प्रवासासाठी फार Excited आहे तर घरापासून प्रथमच दूर जातोय याचं दुःख सुद्धा होतोय.पण काहीतरी नवीन मिळवण्यासाठी काहीतरी सोडावं लागतोच. Kautilya school Of Public policy,Hyderabad येथे 'Masters in Public policy'या कोर्स साठी निवड होणे ही कोणासाठी मोठी गोष्ट नसली तरीही माझ्यासारख्या मुक्त विद्यापीठातुन बी.ए पदवी घेतलेल्या नि बारावी नंतर कॉलेजचं चेहरा न बघितलेल्या विद्यार्थ्यांसाठी फार मोठी बाब आहे. मुक्त विद्यापीठात जेव्हा ' बी.ए' ला प्रवेश घेतला होता तेव्हा पुढ...

True love is when you love someone until your last breath ! 🌾🌿♥️

इमेज
आईची मामी काही महिन्यापासून आजारी होती.वृद्ध झाल्याने शरीराने साथ सोडायला सुरुवात केली होती.कितीतरी वेळा आजीची तब्येत गंभीर झाली होती.अनेक वेळा नातेवाईक येऊन भेटून सुद्धा गेले.कधी काय होईल ते अजिबात सांगता येतं नव्हतं.डॉक्टरांनी काही वेळा काही दिवसांची वेळ दिली होती. पण तिने काही जीव सोडला नव्हता. इकडे आईचे मामा हे काही दिवसापर्यंत एकदम ठीक होते.वृद्ध असून सुद्धा ते आपल्या पत्नीची व्यवस्थित काळजी घेतच होते.तिला कधी काय होईल हे सांगता येत नसल्याने ते तिच्याजवळ बसून राहायचे.काही वेळा जेव्हा भेटायला जायचो तेव्हा ते प्रेमाने भेटायचे, विचारपूस करायचे.आपल्या हाताने फळे कापून खायला द्यायचे. मागच्या काही दिवसांत त्यांची सुद्धा थोडी तब्येत बिघडली.हॉस्पिटल दाखवलं.डॉक्टरांनी गोळ्या वगैरे दिल्या पण काही विशेष फरक पडला नाही नि इथे दोघांची विशेष काळजी घ्यायला कोणी नसल्याने  त्यांच्या एका मुलाने मागच्या आठवड्यात त्यांना अकोल्याला नेलं.'आपल्या त्या अवस्थेत असलेल्या पत्नीला सोडून ते जायला काही तयार होतं नव्हते.पण त्यांची समजूत घालून त्यांना फक्त 2-4 दिवसांसाठी नेलं.अकोला येथे येऊन त्यां...

मनाने अफाट श्रीमंत असलेला माझा मामा ✨♥️

इमेज
माझ्या आयुष्यात नातेवाईकांना विशेष काही महत्व नाही.कारण त्यांनी कधी नातेवाईक असण्याचं कर्तव्य निभावल्याचं मला आठवत नाही.मायेने जवळ घेऊन कधी आपलेपणाची जाणीव आजपर्यंत विशेष अशी कोणीही करून दिलेली नाही.माझ्या 'सुखा-दुःखात',अडीअडचणीत कधीही नातेवाईकांचा विशेष रोल राहिलेला नाही.म्हणायला बरेच नातेवाईक असून सुद्धा विशेष जवळचा म्हणण्यासारखा मला सुरुवातीपासून एकही वाटतं नाही.अपवाद माझी दिवंगत 'नानी माँ' नि माझा मामा. (आजी आजोबांना[वडिलांचे आई-वडील]तर  मी बघूच शकलो नाही.) आजी (नानी)आज हयात नाही ती 2021 मध्येच वारली.पण तिने दिलेला प्रेम कायम आठवणीत राहणार माझ्या.तर मामाने सुद्धा आम्हाला आजीच्या प्रेमाची कमी मात्र आजपर्यंत पडू दिली नाही.✨ माझ्या सुखात दुःखात मामा नेहमीच हजर राहिलेला आहे.त्याची हालाखीची परिस्थिती असताना सुद्धा तो त्याचा प्रेम नि काळजी कमी पडू देत नाही.वेळोवेळी विचारपूस करणे,कोठेही गेलो तर सतत कॉल करून काळजी घेणे नि काहीही झालं तर एका कॉलवर हजर असणे ही मामाची फार जमेची बाजू आहे.वेळोवेळी मामाने आम्हाला खूप साथ दिली आहे नि देत असतो.म्हणूनच मामा मला फार जवळचा...