एका महिन्याचा प्रवास 🌼❤️
आज मला 'कौटिल्य स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी' मध्ये येऊन एक महिना पूर्ण झाला आहे. या एका महिन्यात खूप काही शिकायला मिळालं. सुरुवातीचे काही दिवस थोडे अवघड गेले कारण सगळं नवीन होतं—भाषा, वातावरण, माणसं, अभ्यास नि शिकवण्याची पद्धत. पहिल्या आठवड्यात तर खूप गोंधळून गेलो होतो. इंग्रजी बोलण्याचा थोडा त्रास जाणवत होता, ज्यामुळे मनावर दडपण आलं होतं. आजूबाजूला फक्त इंग्रजीचं वातावरण ऐकून थोडं अस्वस्थ वाटतं होतं.
सुदैवाने, ओरीएंटेशन नि टीम बिल्डिंग अॅक्टिव्हिटीजमुळे माझी नवीन मित्रांशी ओळख झाली, ज्यामुळे मनातील गोंधळ कमी झाला. हळूहळू मी स्वतःला या नव्या वातावरणात एडजस्ट करू लागलो. जसजसा वेळ जात होता, तसतसं या नव्या परिस्थितीत रुळत गेलो. आता समजलं की हीच ती संधी आहे, जी मला स्वतःला पुढे नेण्याची नि नवीन कौशल्यं आत्मसात करण्याची संधी देणार आहे.
या एका महिन्यात मी विविध लोकांशी संवाद साधला, त्यांच्या अनुभवांतून खूप काही शिकायला मिळालं. अभ्यास नि चर्चांमधून अनेक नवीन गोष्टी उलगडत गेल्या. आता स्वतःवर जास्त आत्मविश्वास वाटतोय नि या प्रवासाचा पुढचा टप्पा मी एका आव्हानासारखा स्वीकारतोय.
दररोज सकाळी 9 वाजता सुरू होणारे क्लासेस संध्याकाळी 5-6 वाजता संपतात. अभ्यासक्रमात सध्या खालील विषयांचा समावेश आहे:
- Microeconomics for Public Policy
- Statistics for Public Policy
- Foundation of Academic Writing
-Business, Government, and Society
-Constitution: The Supreme Document for Public Policy
- Media, Communication, and Policy
या महिन्यात विविध प्रतिष्ठित व्यक्तींच्या guest lectures ला उपस्थित राहण्याचा योग आला नि त्यांना विविध प्रश्न विचारायची संधी मिळाली. या सगळ्या अनुभवांनी मला आणखी समृद्ध केलं आहे.
हा एक महिना माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला आहे. मला जेव्हा हा प्रवास सुरू केला तेव्हा काही गोष्टी कठीण वाटल्या होत्या पण आता वाटतं नाही. इथे मी माझं एक नवीन आयुष्य उभं करणार आहे. इथं शिकलेल्या गोष्टी, अनुभवलेले प्रसंग मला अधिक सक्षम नि ठाम बनवतील.
You are amazing
उत्तर द्याहटवा