यशवंतराव ते कौटिल्य ♥️

बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन या वर्षी आयुष्यात प्रथमच दोन वर्षासाठी घराच्या बाहेर उच्चशिक्षणासाठी पहिला पाऊल टाकतोय. 

काल रात्री कॉलेजचा Mail आला.22 जुलै पासून अकॅडेमिक लाईफ सुरू होईल.

21 जुलैला हैदराबादला जायचं आहे नि पुढे दोन वर्षे तेथे राहून खूप शिकायचं आहे.🥰

आतापर्यंत कधीही एक आठवड्यापेक्षा जास्त आईवडिल अन् घरापासून दूर राहिलेलो नाही.पहिली ते पदवीपर्यंतच शिक्षण गावातूनच पूर्ण केलं असल्याने बाहेर जायची गरजचं पडली नव्हती.

अजून 2 महिने वेळ जरी असला तरीही मनात संमिश्र भावना दाटून आल्या नि येत आहे.नवीन प्रवासासाठी फार Excited आहे तर घरापासून प्रथमच दूर जातोय याचं दुःख सुद्धा होतोय.पण काहीतरी नवीन मिळवण्यासाठी काहीतरी सोडावं लागतोच.

Kautilya school Of Public policy,Hyderabad येथे 'Masters in Public policy'या कोर्स साठी निवड होणे ही कोणासाठी मोठी गोष्ट नसली तरीही माझ्यासारख्या मुक्त विद्यापीठातुन बी.ए पदवी घेतलेल्या नि बारावी नंतर कॉलेजचं चेहरा न बघितलेल्या विद्यार्थ्यांसाठी फार मोठी बाब आहे.

मुक्त विद्यापीठात जेव्हा ' बी.ए' ला प्रवेश घेतला होता तेव्हा पुढे मला एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकायला मिळेल याबद्दल मी कधी विचार सुद्धा केला नव्हता.🥰

आता ही दोन वर्षे खूप खूप शिकायचं आहे,या मिळालेल्या संधीच सोन करायचं आहे.आरोग्याकडे दुर्लक्ष न करता खूप अभ्यास करायचा आहे.वेगवेगळे अनुभव घेऊन त्यातून सुद्धा फार काही नवीन शिकायचं आहे.✨

पाठीशी शुभेच्छा असू द्या..
खऱ्या अर्थाने सुरुवात आता झाली आहे...♥️✨

जय भीम 🙏✨

#सफर
#शिक्षण
#स्वातंत्र्य

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼