मी माझ्या शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ कशाप्रकारे मिळवले ? 🌼



कॉलेजमध्ये निवड झाल्यानंतर जशा प्रत्येक ध्येयाच्या वाटेवर नेहमीच काही अडचणी येतात.तशाच माझ्या ध्येयाच्या वाटेवरही मोठी आर्थिक अडचण आली होती. 90% शिष्यवृत्ती मिळूनही दोन वर्षांचा खर्च तब्बल 6,89,000 रुपये येणार होता, ज्यातील 1 लाख रुपये एका आठवड्याच्या आत भरून ऍडमिशन कन्फर्म करायचे होते. हे सर्व माझ्या आवाक्याबाहेर होते.

काहीही झाले तरी ऍडमिशन तर घ्यायचं होतं, पण फीचा प्रश्न डोंगरासारखा समोर उभा होता. काय करावे, हेच सुचत नव्हते. Education Loan साठी अर्ज केला होता, पण ते वेळेवर मिळणार नव्हते आणि मला एका आठवड्याच्या आत 1 लाख रुपये लागणार होते. त्या क्षणी काळजीने मनात घर केले होते.

मग एक कल्पना सुचली, ती म्हणजे माझ्या संपर्कातील We Read नि पुस्तकामुळे नाळ जुडलेल्या काही निवडक व्यक्तीकडे मदत मागायची. 'पब्लिक फंडिंग' वगैरे न करता फक्त विश्वासू लोकांकडून मदत मागायची ठरवली. यासाठी 50 लोकांची यादी तयार केली आणि एक विस्तृत पोस्ट लिहिली, ज्यामध्ये एकूण सर्वकाही डिटेल्स शेअर केल्या. पहिल्यांदा 35 लोकांना मेसेज केला, त्यापैकी 32 लोकांनी लगेच पैसे पाठवले. दोन दिवसांनी शाळेतील शिक्षकांनी 45,000 रुपये दिले. अशाप्रकारे चार दिवसांत, मी 3,50,000 रुपये जमा केले.

त्या क्षणी, जसे मरणाच्या दारातून परत आल्यासारखे वाटले. मी 1,33,600 रुपये भरून Admission कन्फर्म केले. आता 5,55,400 रुपये बाकी होते. यावर्षी 2,78,000 रुपये भरायचे होते तर पुढच्या वर्षी 2,77,400 रुपये.

3,50,000 रुपये जमा झालेल्या रक्कमेतून 1,33,600 रुपये भरल्यानंतर 2,16,400 रुपये शिल्लक होते. मला 61,600 रुपयांची गरज होती. काही दिवसांनी एका सरांनी 45,000 रुपये लॅपटॉपसाठी दिले आणि वडिलांनी 40,000 रुपये दिले. त्यामुळे मला लॅपटॉप घेता आला.

मागच्या महिन्यात 2,78,000 रुपये भरायचे असल्याने उरलेल्या 15 जणांना मेसेज केला. त्यापैकी 12 जणांनी 48,000 रुपये पाठवले आणि एकूण रक्कम 2,64,400 रुपये झाली. बाकीचे पैसे वडिलांकडून घेतले.

अशा प्रकारे, सर्वांच्या सहाय्याने मी ऍडमिशन फी गोळा केली आणि पुढच्या वर्षीच्या फी साठी Education Loan साठी अर्ज केला. माझ्या कठीण काळात मदत करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार..या माणसांची हक्काची साथ नसती, तर माझे स्वप्न अपूर्णच राहिले असते. आपुलकीच्या या मदतीने माझे आयुष्य नव्याने घडवण्याची संधी मला मिळाली नि या संधीचे सोन केल्याशिवाय मी शांत बसणार नाही एवढं नक्की..

शब्द अपुरे आहेत.♥️🌼✨

खर्च तपशील खालीलप्रमाणे :-

Food And Accommodation Fee

1)Academic Fee With 90% Scholarship :- 133,600₹
2)Meal Plan :- 156000₹
3)Accommodation :- 2,00,000 x 2 वर्ष = ₹4,00,000 

©️Moin Humanist ✨🌼

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼