मनाने अफाट श्रीमंत असलेला माझा मामा ✨♥️



माझ्या आयुष्यात नातेवाईकांना विशेष काही महत्व नाही.कारण त्यांनी कधी नातेवाईक असण्याचं कर्तव्य निभावल्याचं मला आठवत नाही.मायेने जवळ घेऊन कधी आपलेपणाची जाणीव आजपर्यंत विशेष अशी कोणीही करून दिलेली नाही.माझ्या 'सुखा-दुःखात',अडीअडचणीत कधीही नातेवाईकांचा विशेष रोल राहिलेला नाही.म्हणायला बरेच नातेवाईक असून सुद्धा विशेष जवळचा म्हणण्यासारखा मला सुरुवातीपासून एकही वाटतं नाही.अपवाद माझी दिवंगत 'नानी माँ' नि माझा मामा.

(आजी आजोबांना[वडिलांचे आई-वडील]तर
 मी बघूच शकलो नाही.)

आजी (नानी)आज हयात नाही ती 2021 मध्येच वारली.पण तिने दिलेला प्रेम कायम आठवणीत राहणार माझ्या.तर मामाने सुद्धा आम्हाला आजीच्या प्रेमाची कमी मात्र आजपर्यंत पडू दिली नाही.✨

माझ्या सुखात दुःखात मामा नेहमीच हजर राहिलेला आहे.त्याची हालाखीची परिस्थिती असताना सुद्धा तो त्याचा प्रेम नि काळजी कमी पडू देत नाही.वेळोवेळी विचारपूस करणे,कोठेही गेलो तर सतत कॉल करून काळजी घेणे नि काहीही झालं तर एका कॉलवर हजर असणे ही मामाची फार जमेची बाजू आहे.वेळोवेळी मामाने आम्हाला खूप साथ दिली आहे नि देत असतो.म्हणूनच मामा मला फार जवळचा वाटतो कायम नि त्याच्यासाठी मला भविष्यात खूप काही चांगलं करायचं आहे नि मी ते करणार आहेच.

तीन मामांपैकी हयात असलेला हा एकमेव,इतर दोन्हीं मामा आता हयात नाही.वडिलांचे छत्र फार कमी वयात हरवल्यामुळे Itself शिक्षण सोडावं लागलं नि काम धरावं लागलं.वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी पासूनच मामा कामाला लागलं ते आजपर्यंत.संसाराचा गाढा ओढण्याची जबाबदारी त्याच्यावर फारच कमी वयात येऊन पडली असल्याने मामाला बालपण विसरावं लागलं.मोटार मेकॅनिक नि ग्रीसींग वगैरेचा काम मामा करत असतो,यातूनच त्यांचा उदरनिर्वाह होतं असतो.मामाची आर्थिक परिस्थिती ही फार बिकट आहे व त्याच्यासाठी मला नेहमीच वाईट वाटतं,तर त्याच्याकडून मेहनत करत राहण्याची प्रेरणा सुद्धा मिळत असते.मामाच लग्न झालेलं असून एक मुलगा नि मुलगी असा एकूण चार जणांचा त्यांचा छोटा नि सुखी कुटूंब आहे नि माझ्या आयुष्यात या कुटुंबाला एक विशेष स्थान आहे हे वेगळं सांगायला नको.✨

वरी लिहिल्याप्रमाणे मामाची परिस्थिती जरी गरीब असली तरी त्याच्या मनाची श्रीमंती फार मोठी आहे नि ती वेळोवेळी त्याने त्याच्या कृतीने दाखवून दिली आहे.कालच्या एका प्रसंगाने या गोष्टीवर अजून शिक्कामोर्तब केलं नि माझ्या नजरेत मामाप्रति असलेली इज्जत पुन्हा वाढवण्याचं काम केलं व तोच प्रसंग मला आपल्यासोबत शेअर करावासा वाटलं.

आजोबाच्या (आईचे वडील)नावांवर एक जुनी दुकान होती.ती 'नानी माँ'हयात असतानाच दिवगंत मोठ्या मामाच्या पत्नीने विकायला लावली होती. त्या जागेचे एकूण 8 लाख रु मिळाले होते.यामध्ये माझ्या आईचा सुद्धा हिस्सा होता पण तो आईने घेतला नाही.त्यामुळे मोठी मामी नि मामा या दोघांना समान वाटप करून 4-4 लाख रु मिळाले होते.मामाने त्या 4 लाख रुपयांचा एक प्लॉट घेऊन ठेवला.जेणेकरून भविष्यात त्यांच्या मुला/मुलीच्या शिक्षणासाठी तो कामी येईल.

या गोष्टीला आता 2-3 वर्ष लोटून गेले आहेत..!

सर्वांना माहिती असल्याप्रमाणे माझी इकडे ' कौटिल्य स्कुल ऑफ पब्लिक पॉलिसी'हैदराबाद या कॉलेज मध्ये मास्टर्स साठी निवड झाली. तब्बल 90% Scholarship मिळून सुद्धा मला तब्बल 7 लाख रु खर्च येतोय.यासाठी मी फक्त काही निवडक जणांकडून मदत घ्यायची ठरवली नि कामाला लागलो.काही दिवसांत मी चार लाख जमा सुद्धा केले नि बाकीचे करतोय नि ते येत्या काही दिवसांत जमा होतील सुद्धा.

तर काल मामा घरी भेटायला आले होते.बरंच काही इकडंच तिकडचं बोलणं झाल्यावर त्यांनी Admission बद्दल विचारपूस केली.आतापर्यंत किती पैसे ऍडजस्ट झाले विचारलं.मी सर्वकाही सांगितलं.1 लाख 33 हजार भरून प्रवेश निश्चित केला असून बाकीचे लवकरच भरायचे हे सांगितले.त्यांनी अजून एकूण किती कमी आहेत ? हा प्रश्न केला.

मी सांगितले 250,000₹ ₹ ...!

हे ऐकताच त्यांनी एका कागदी पिशवीतून कागद काढून माझ्या हातात दिलं नि म्हणाले

 'तो आपण मागे घेतलेला प्लॉट विकून सर्व पैसे भरून टाक '...! 🥺✨

हे ऐकताच माझ्या डोळ्यांतून पाणी आलं,नेमकं काय बोलावे हेच सुचलं नाही.मी मामाला फक्त एक मिठी मारून फक्त Thank u म्हटलं..'तुम्ही एवढं बोलला हेच पुरेसे आहे. मी असं करू शकतं नाही.बाकीचे पैसे ऍडजस्ट होतील सांगितलं.ते ऐकत नव्हते.अडीअडचणीसाठी तो प्लॉट घेतला होता त्याचा वापर आता करणार नाही तर कधी करायचं असं ते सांगत होते.मी आईने त्यांना समजावून सांगितलं नि बस्स हा प्रेम कायम असाच राहुद्या बस्स एवढंच सांगितलं.♥️

आयुष्यात अशी प्रेम करणारी माणसे आहेत बस्स अजून काय हवं ? कोणतीही परिस्थिती कधीही सारखी राहत नाही.किती वाईट काळ असला तरीही तो आज ना उद्यात बदलतोच.पण या काळात साथ दिलेली व्यक्ती नि या काळात आपल्या एखाद्या शब्दाने उभारी देऊन जाणारी व्यक्ती कायम लक्षात राहून जाते...🌾🤗

©️Moin Humanist✨

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼