स्वाभिमान ♥️🌼
एखाद्या मोठ्या 'राजवाड्याच्या' राजाची हुकूमत, मी माझ्या छोट्याशा 'झोपड्यात' कदापी अजिबात चालू देणार नाही.
कारण येथे माझ्या छोट्या 'झोपडीचा' बादशाह मी आहे..🌼
तू खूप मोठा राजा असशील, शक्तिशाली असशील, पण त्यांच्या समोर जी तुझी चापलुसी करतात, तुझ्या समोर झुकतात आणि तुझ्या महालातील विविध पंचपकवानांची ज्यांना लालसा आहे.
आपल्या कष्टाने आपल्या झोपड्यात स्वाभिमानाने 'शिळी भाकरी' खाणाऱ्यापुढे तुझं काही एक चालणार नाही. तुझं मोठेपण जे तुला मोठे मानतात फक्त त्यांच्याच पुढे. मला माझ्या झोपडीतच समाधान आहे, कारण इथे मी माझ्या स्वातंत्र्याने जगतो नि ही Liberty माझ्यासाठी फार मोलाची आहे.
तुझं ऐश्वर्य हे तुझ्या महालातच शोभतं. माझ्या साध्या जीवनात मला फक्त माझ्या मेहनतीची कदर आहे. त्यामुळे माझ्या झोपडीत मीच राजा, आणि इथे फक्त माझं राज्य चालेल.
माझ्या 'शिळ्या भाकरीत' मला जे समाधान मिळतं, ते तुझ्या पंचपकवानात सापडणं कठीण आहे. कारण माझ्या मेहनतीत, माझ्या स्वाभिमानात मला माझं खरं सुख मिळतं. तुला माझी झोपडी लहान वाटत असेल, पण इथे माझं मन तुझ्या अपेक्षेपेक्षा विशाल आहे. ♥️🌼🥰
©️Moin humanist✨
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा