पोस्ट्स

आणखी एक पलायन ❤️

इमेज
'डेझर्टर' पासून सुरू झालेला प्रवास 'पॅपिलॉन,बँको सोबतच आता 'आणखी एक पलायन'पर्यत येऊन पोहोचला.'काही दिवसांपूर्वी 'I killed To Live'या पुस्तकाचा 'आणखी एक पलायन' नावाने झालेला मराठी अनुवाद'वाचून पूर्ण केला.जो 'डॉ.रविकांत पागनीस' यांनी केला आहे. ''वरील नमूद केलेल्या पुस्तकाच्या धाटणीतलं हे पुस्तकं सुद्धा फार आवडून नि भावून गेलं. युद्धात ओढल्या गेलेल्या आणि सतत पलायनाचा प्रयत्न करीत पकडला जाणारा व्यायामपटू एरीक प्लेझंट याची ही कथा आहे.'डॉ.एरिकचा' जन्म इंग्लंडमधील नॉरविच या छोट्या गावात राहणाऱ्या सर्वसामान्य ब्रिटीश कुटुंबात झाला. लहानपणापासून व्यायामाची आवड असल्याने त्याचे शरीर पिळदार झालेले होते.कुस्ती, मुष्टियुद्ध हे त्याचे आवडते खेळ होते.तो आपल्या ताकदीचे जोरावर अनेक कामे करायला सुरुवात करतो. घरातून बाहेर पडल्यावर विविध कामे करीत असताना त्याचा संबंध दुसऱ्या महायुद्धाशी येतो नि आयुष्य पूर्णपणे बदलून जातो.'त्याच्या जीवनात उलथापालथ होते.जर्मनीच्या सैन्याकडून त्याला अटक केल्या जाते.'सुटकेसाठी तो जर्मन...

We Read Sunday Special 💜 वाचनीय पुस्तकांची 13 वी यादी....♥️

इमेज
● कृपया संपूर्ण यादी पूर्ण वाचावी आणि नंतरच पुस्तके निवडावी.●🌿💜 __________________________________________ आजच्या यादीत विशेष...💜 ★व.पु काळे यांच्या 52 पुस्तकांचा सेट मुळ किंमत -8905₹ We Read -7225₹घरपोच (शिपिंग फ्री)★ ★अण्णाभाऊ साठे समग्र वाङमय एकूण 4 खंड मुळ किंमत - 3200₹ We read -2485₹घरपोच (शिपिंग फ्री)★ ★अंबालक्ष्मी+खंडोबा+सूर्याची सावली -नितीन थोरात एकूण 3 पुस्तके मुळ किंमत - 850₹ We Read -750₹घरपोच (शिपिंग फ्री) ~~~~~~~~~~~~~~~~~~~★★★~~~~~~~~~~~~~~~~~~ 1)पॅपिलॉन+बँको -हेन्री शरियर (रविंद्र गुर्जर) एकूण 2 पुस्तके We read - 495 ₹घरपोच(शिपिंग फ्री) आत्मविश्वास आणि धाडस, बळकट शरीराच्या जोरावर मनुष्य किती सामर्थ्य दाखवू शकतो, हे सांगणारी ही कादंबरी आहे. 2)गॉडफादर -मारियो पुझो We read - 325 ₹घरपोच(शिपिंग फ्री) विख्यात लेखक मरिओ पुझो यांच्या गॉडफादर या जगभर गाजलेल्या कादंबरीचा रविंद्र गुर्जर यांनी केलेला अनुवाद आहे. या कादंबरीवरून चित्रपटही निघाला होता. डॉन व्हिटो कॉलिऑन याच्या मुलीच्या कोनीच्या विवाहसमारंभाने या कादंबरीची सुरुवात होते. व्हिटोचा धाकटा मुलगा ...

साहसांच्या जगात 💜

इमेज
'काही काळापूर्वी 'गौरी कानेटकर'लिखित 'मृत्यू पाहिलेली माणसं'हे अप्रतिम असं एक पुस्तकं वाचलं होतं नि ते मनाला खूप भावून गेलं होतं.'त्या पुस्तकांत 'मौत को छु कर'परत येणाऱ्या अश्या नऊ साहसी  माणसांच्या रोमहर्षक कथा दिल्या होत्या.'ज्या वाचून माणसाला खुप काही शिकायला मिळतं.'हरु नकोस,हा शेवट नाही'असं सांगून जाणाऱ्या या कहाण्या वाचून मी पुन्हा या धाटणीतलं काही वाचायला मिळतं का शोधत होतो. अशातच काही दिवसांपूर्वी 'विजय देवधर'यांनी अनुवादित केलेलं 'साहसांच्या जगात'हे पुस्तकं माझ्या नजरेत पडलं नि ज्याच्या शोधातं मी होतो ते मला गवसलं.'सेम त्याच धाटणीतलं नि त्या पुस्तकाच्या कितीतरी वर्षाआधीच प्रकाशित झालेलं हे पुस्तकं मला अनपेक्षितपणे येऊन मिळालं व माझा शोध पूर्ण झाला. आता काही म्हणा पण 'विजय देवधर' हे नाव ऐकता/ वाचताच एक वेगळीच भावना मनात येऊन जाते.'विजय देवधर नि उत्कृष्ट अनुवाद असं जणू समीकरणचं झालेलं आहे.'रहस्यकथा, गूढकथांचे लेखन करण्यात भन्नाट हातखंडा असलेले आणि इंग्रजीतील उत्तमोत्तम कादंबऱ्यांना आपल्य...

डायरी वगैरे 🌿🖤

इमेज
1.आपल्या स्वार्थासाठी कोणासोबतही 'मैत्री' किंवा 'प्रेम' करू नका.आपल्या काम नि मतलबपूर्ती मैत्री किंवा प्रेम करायचं आणि मग त्या व्यक्तीला अर्ध्यात सोडून द्यायचं हे असलं अजिबात करू नका.सुरुवातीला प्रेमळ बाता मारून त्याला भुलवायचं, आपलं स्वार्थ पूर्ण करायचं आणि मग निघून जायचं हे फार वाईट आहे.कोणालाही कोणाच्याही भावनेसोबत खेळण्याचा अधिकार अजिबात नाही.तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीसोबत टाईमपास प्रेम/मैत्री करत असाल तर त्याला सरळ सरळ सांगून द्या.तेव्हा त्याला तेवढं दुःख होणार नाही जेवढं पुढे होईल.तुम्ही जरी त्या व्यक्तीला विशेष मानत नसाल पण तो मनापासून तुम्हाला आपला मानत असतो. तुमच्या आयुष्यात त्याला किंमत नसते पण त्याच्या आयुष्यात तुम्हाला खूप किंमत असते..कोणालाही स्वप्न दाखवू नका,एकट्याला तुमची सोबत देऊ नका आणि जर देत असाल तर कृपया करून त्याचा साथ शेवटपर्यंत सोडू नका.ती व्यक्ती तुमच्यासाठी टाईमपास असेल पण त्याच्या साठी तुम्ही टाईमपास नसता. एकवेळ आर्थिक लुबाडणूक करा पण भावनिक लुबाडणूक करू नका.हे त्याला सहन होणार नाही.तो/ती आतून तुटून जाईल.पुन्हा कोणावर विश्वास करायला तो 1000 व...

We Read ची 106 वाचनीय पुस्तकांची यादी....♥️

इमेज
● कृपया संपूर्ण यादी पूर्ण वाचावी आणि नंतरच पुस्तके निवडावी.●🌿💜 __________________________________________ 1)पुटिंग विमेन फर्स्ट : ग्रामीण भागातील स्त्रिया आणि त्यांचे आरोग्य – राणी बंग 495₹घरपोच (शिपिंग फ्री) हे पुस्तक आपल्याला ग्रामीण स्त्री-पुरुषांच्या कहाण्या सांगतं. हे स्त्री-पुरुष इतक्या वर्षांत बंगबार्इंच्या दवाखान्यात आलेले. त्यांनी त्यांचे प्रश्न कसे सोडवले, त्यांचे आपापसांतले नातेसंबंध कसे होते, त्यांवर कसा परिणाम झाला नि आजही होतो आहे हे आपल्याला यात वाचायला मिळतं. आणि या कहाण्या वाचत असताना एक सत्य उमगतं की, माणसांचा भूगोल, संस्कृती, वर्ण आणि वर्ग वेगवेगळे असले तरी बऱ्याच समस्या या वैश्विक असतात. 2)द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज(मराठी) -अरुंधती रॉय 375₹घरपोच (शिपिंग फ्री) कादंबरीच्या पहील्या पानापासून ते अखेरच्या शब्दापर्यंत दुःख आपला पाठलाग करत रहातं, प्रचंड अस्वस्थ करतं. अगदी आनंदाच्या प्रसंगांचं वर्णन करतानाही लेखिकेनं हे दुःखाचं भान हरवू दिलेलं नाही. ईस्था आणि राहेल - दोन जुळी भावंड. त्यांची आई... त्यांचं आयुष्य... त्यांचं भावविश्व.... आणि ’डिंग’! निव्वळ मुर्तिमंत नैर...