आणखी एक पलायन ❤️


'डेझर्टर' पासून सुरू झालेला प्रवास 'पॅपिलॉन,बँको सोबतच आता 'आणखी एक पलायन'पर्यत येऊन पोहोचला.'काही दिवसांपूर्वी 'I killed To Live'या पुस्तकाचा 'आणखी एक पलायन' नावाने झालेला मराठी अनुवाद'वाचून पूर्ण केला.जो 'डॉ.रविकांत पागनीस' यांनी केला आहे.

''वरील नमूद केलेल्या पुस्तकाच्या धाटणीतलं हे पुस्तकं सुद्धा फार आवडून नि भावून गेलं.

युद्धात ओढल्या गेलेल्या आणि सतत पलायनाचा प्रयत्न करीत पकडला जाणारा व्यायामपटू एरीक प्लेझंट याची ही कथा आहे.'डॉ.एरिकचा' जन्म इंग्लंडमधील नॉरविच या छोट्या गावात राहणाऱ्या सर्वसामान्य ब्रिटीश कुटुंबात झाला. लहानपणापासून व्यायामाची आवड असल्याने त्याचे शरीर पिळदार झालेले होते.कुस्ती, मुष्टियुद्ध हे त्याचे आवडते खेळ होते.तो आपल्या ताकदीचे जोरावर अनेक कामे करायला सुरुवात करतो.

घरातून बाहेर पडल्यावर विविध कामे करीत असताना त्याचा संबंध दुसऱ्या महायुद्धाशी येतो नि आयुष्य पूर्णपणे बदलून जातो.'त्याच्या जीवनात उलथापालथ होते.जर्मनीच्या सैन्याकडून त्याला अटक केल्या जाते.'सुटकेसाठी तो जर्मनीच्या एस.एस. ग्रुपमध्ये प्रचारकाचे काम करतो,पण जेव्हा जर्मनीचा पराभव होतो तेव्हा रशिया त्याला बंदी बनवून 25 वर्षांची शिक्षा देतो.

येथील तुरुंगात 'एरिकने' त्याच्या सुटकेपर्यतचे सारे
अनुभव या पुस्तकात नमूद केले आहेत.'जे वाचताना अक्षरशः अंगावर काटा येतो.त्या वेळच्या कुप्रसिद्ध संघटनांनी त्याच्या ताकदीचा फायदा उठविला. अपमान, शिक्षा, एकांतवास, अमानवी कृत्य असे जीवन जगात असताना शत्रूच्या तावडीतून पलायन करण्यासाठी त्याने काय दिव्य पार केली, हे सर्व या आत्मकथेतून आपल्याला अनुभवायला मिळते.'युद्धाने तेथील जनतेचे होणारे हाल नि युद्धाचे भयंकर रूप,कैद्यांचे विविध पद्धतीने होणारे छळ हे सर्व वाचताना डोळ्यांत अश्रू येतात.

'माणूस सुद्धा एवढं क्रूर वागू शकतो ?
हा प्रश्न मला हे पुस्तक वाचताना पडतं होता.

पत्नी अँनालिसा व आई-वडिलांच्या आठवणींनी त्याला आत्महत्येपासून बचावले नि जगण्यासाठी बळ देऊन गेले. या सर्व काळातील आठवणी, थरारक प्रसंग वाचताना एरिकच्या आत्मबळाला खरंच दाद द्यावीशी वाटते.'एरिक कडून हिंमत नि हार न मानण्याची शिकवण आपल्याला मिळते.'ज्याप्रमाणे त्याने सातत्य ठेवतं त्याच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना केला नि अमाप छळ सहन केलं हे वाचून आपल्या आयुष्यातील संकटे आपल्याला क्षुल्लक वाटू लागतात एवढं नक्की.🖤
©️Moin Humanist📚
मी वाचलेली पुस्तके

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼