पोस्ट्स

आणखी एक पलायन पुस्तकं अनुभव 😇 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आणखी एक पलायन ❤️

इमेज
'डेझर्टर' पासून सुरू झालेला प्रवास 'पॅपिलॉन,बँको सोबतच आता 'आणखी एक पलायन'पर्यत येऊन पोहोचला.'काही दिवसांपूर्वी 'I killed To Live'या पुस्तकाचा 'आणखी एक पलायन' नावाने झालेला मराठी अनुवाद'वाचून पूर्ण केला.जो 'डॉ.रविकांत पागनीस' यांनी केला आहे. ''वरील नमूद केलेल्या पुस्तकाच्या धाटणीतलं हे पुस्तकं सुद्धा फार आवडून नि भावून गेलं. युद्धात ओढल्या गेलेल्या आणि सतत पलायनाचा प्रयत्न करीत पकडला जाणारा व्यायामपटू एरीक प्लेझंट याची ही कथा आहे.'डॉ.एरिकचा' जन्म इंग्लंडमधील नॉरविच या छोट्या गावात राहणाऱ्या सर्वसामान्य ब्रिटीश कुटुंबात झाला. लहानपणापासून व्यायामाची आवड असल्याने त्याचे शरीर पिळदार झालेले होते.कुस्ती, मुष्टियुद्ध हे त्याचे आवडते खेळ होते.तो आपल्या ताकदीचे जोरावर अनेक कामे करायला सुरुवात करतो. घरातून बाहेर पडल्यावर विविध कामे करीत असताना त्याचा संबंध दुसऱ्या महायुद्धाशी येतो नि आयुष्य पूर्णपणे बदलून जातो.'त्याच्या जीवनात उलथापालथ होते.जर्मनीच्या सैन्याकडून त्याला अटक केल्या जाते.'सुटकेसाठी तो जर्मन...