साहसांच्या जगात 💜
'काही काळापूर्वी 'गौरी कानेटकर'लिखित 'मृत्यू पाहिलेली माणसं'हे अप्रतिम असं एक पुस्तकं वाचलं होतं नि ते मनाला खूप भावून गेलं होतं.'त्या पुस्तकांत 'मौत को छु कर'परत येणाऱ्या अश्या नऊ साहसी माणसांच्या रोमहर्षक कथा दिल्या होत्या.'ज्या वाचून माणसाला खुप काही शिकायला मिळतं.'हरु नकोस,हा शेवट नाही'असं सांगून जाणाऱ्या या कहाण्या वाचून मी पुन्हा या धाटणीतलं काही वाचायला मिळतं का शोधत होतो.
अशातच काही दिवसांपूर्वी 'विजय देवधर'यांनी अनुवादित केलेलं 'साहसांच्या जगात'हे पुस्तकं माझ्या नजरेत पडलं नि ज्याच्या शोधातं मी होतो ते मला गवसलं.'सेम त्याच धाटणीतलं नि त्या पुस्तकाच्या कितीतरी वर्षाआधीच प्रकाशित झालेलं हे पुस्तकं मला अनपेक्षितपणे येऊन मिळालं व माझा शोध पूर्ण झाला.
आता काही म्हणा पण 'विजय देवधर' हे नाव ऐकता/ वाचताच एक वेगळीच भावना मनात येऊन जाते.'विजय देवधर नि उत्कृष्ट अनुवाद असं जणू समीकरणचं झालेलं आहे.'रहस्यकथा, गूढकथांचे लेखन करण्यात भन्नाट हातखंडा असलेले आणि इंग्रजीतील उत्तमोत्तम कादंबऱ्यांना आपल्या सारख्या मराठी वाचकांपर्यंत पोहोचवणारे विजय सर मला फार जवळचे वाटतात.त्यांच्या लेखणीत वाचकांना खिळवून ठेवण्याची कमालीची ताकद आहे.' सरांचं सर्व साहित्य मला आवर्जून वाचून काढायचं आहे.'ते जरी 2012 ला आपल्याला सोडून गेले असले, तरीही त्यांच्या साहित्यातून वाचकांच्या हृदयात ते कायमस्वरूपी जिवंत राहतील.'
सरांना अभिवादन..🖤
'साहसांच्या जगात'या अप्रतिम पुस्तकात एकूण 16 सत्य-साहसी कथा आहेत,ज्या खूप वाचणीय आहेत.'यातील कथा वाचताना यातील संपूर्ण कथानक आपल्या डोळ्यासमोर घडल्याचा भास आपल्याला होतो.'एकंदरीत हे पुस्तकं जगून आल्याचा फिल आपल्याला होतो.'यातील प्रत्येक कथा वाचकाला खिळवून ठेऊन'अफाट साहसाचे दर्शन करून आणते नि खूप काही शिकवून जाते.'
हे पुस्तकं वाचताना आपण पूर्णपणे यामध्ये हरवून जातो.'एकदा हातात घेतल्यावर शेवटपर्यंत खाली ठेऊच शकतं नाही असं हे एक भन्नाट पुस्तकं आहे.'माणूस जेव्हा अकल्पितपणे एखाद्या विलक्षण संकटात सापडतो. जीव धोक्यात येतो, आणि मृत्यू आ वासून समोर उभा राहतो, तेव्हा त्याची जगण्याची इच्छा विलक्षण प्रबल बनते. त्याच्यातील साहसप्रवृत्तीच त्याला संकटावर मात करण्याची शक्ती देते.
या पुस्तकातील सर्व सत्यकथांमधील संकटात सापडलेल्या माणसांनी धैर्य आणि इच्छाशक्ती यांच्या बळावरच संकटावर मात केली आहे.
'किलर शार्कच्या जबड्यात'या कथेपासून सुरुवात होऊन 'बेचाळीस तासांची मरणप्राय ड्युटी'या कथेला जाऊन हे 180 पृष्ठसंख्या असलेलं पुस्तकं समाप्त होतं नि एक रोमहर्षक असा अनुभव आपल्याला देऊन जातं.!
आता या कथा कोणत्या अन् या कथेत कोणती साहसे आपल्याला वाचायला मिळतात ?
तर या कथेत आहे.'समुद्रात शार्कच्या जबड्यात सापडलेला व झुंज देऊन वाचलेला 'पाणबुड्या',
आपल्या 'स्लीपिंग बॅग' मध्ये तब्बल 12 तास एका विषारी सापासोबत घालवणारा 'अँल्',
शहरात स्फोट होऊन जीवितहानी होऊ नये म्हणून 'अँसिटोन'हा अतिशय ज्वालाग्राही द्रव्याने भरलेला नि पेटलेला टँकर स्वतः चालवून गावाच्या बाहेर नेणारा 'हॅन्स ह्यागरं',एका अफाट बलूनमधून 'जर्मन सैनिकांची नजर चुकवून नि कमालीचं धोका पत्करून सरहद्दपार करणारे दोन मित्र तर 42 तास मरणप्राय आपली ड्युटी निभावणारे ग्रहम रॉबन नि इतर 2 पोलिस कर्मचारी.'व असेच इतर 12 जणांच्या वेगवेगळ्या साहसी सत्य-कथा वाचायला मिळतात.'♥️
नक्कीच वाचा ...
खूप काही शिकायला अन् अनुभवायला मिळेल.🖤
©️Moin Humanist ✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा