साहसांच्या जगात 💜
'काही काळापूर्वी 'गौरी कानेटकर'लिखित 'मृत्यू पाहिलेली माणसं'हे अप्रतिम असं एक पुस्तकं वाचलं होतं नि ते मनाला खूप भावून गेलं होतं.'त्या पुस्तकांत 'मौत को छु कर'परत येणाऱ्या अश्या नऊ साहसी माणसांच्या रोमहर्षक कथा दिल्या होत्या.'ज्या वाचून माणसाला खुप काही शिकायला मिळतं.'हरु नकोस,हा शेवट नाही'असं सांगून जाणाऱ्या या कहाण्या वाचून मी पुन्हा या धाटणीतलं काही वाचायला मिळतं का शोधत होतो. अशातच काही दिवसांपूर्वी 'विजय देवधर'यांनी अनुवादित केलेलं 'साहसांच्या जगात'हे पुस्तकं माझ्या नजरेत पडलं नि ज्याच्या शोधातं मी होतो ते मला गवसलं.'सेम त्याच धाटणीतलं नि त्या पुस्तकाच्या कितीतरी वर्षाआधीच प्रकाशित झालेलं हे पुस्तकं मला अनपेक्षितपणे येऊन मिळालं व माझा शोध पूर्ण झाला. आता काही म्हणा पण 'विजय देवधर' हे नाव ऐकता/ वाचताच एक वेगळीच भावना मनात येऊन जाते.'विजय देवधर नि उत्कृष्ट अनुवाद असं जणू समीकरणचं झालेलं आहे.'रहस्यकथा, गूढकथांचे लेखन करण्यात भन्नाट हातखंडा असलेले आणि इंग्रजीतील उत्तमोत्तम कादंबऱ्यांना आपल्य...