We Read ची 106 वाचनीय पुस्तकांची यादी....♥️

● कृपया संपूर्ण यादी पूर्ण वाचावी आणि

नंतरच पुस्तके निवडावी.●🌿💜

__________________________________________

1)पुटिंग विमेन फर्स्ट : ग्रामीण भागातील स्त्रिया आणि त्यांचे आरोग्य – राणी बंग
495₹घरपोच (शिपिंग फ्री)

हे पुस्तक आपल्याला ग्रामीण स्त्री-पुरुषांच्या कहाण्या सांगतं. हे स्त्री-पुरुष इतक्या वर्षांत बंगबार्इंच्या दवाखान्यात आलेले. त्यांनी त्यांचे प्रश्न कसे सोडवले, त्यांचे आपापसांतले नातेसंबंध कसे होते, त्यांवर कसा परिणाम झाला नि आजही होतो आहे हे आपल्याला यात वाचायला मिळतं. आणि या कहाण्या वाचत असताना एक सत्य उमगतं की, माणसांचा भूगोल, संस्कृती, वर्ण आणि वर्ग वेगवेगळे असले तरी बऱ्याच समस्या या वैश्विक असतात.

2)द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज(मराठी) -अरुंधती रॉय
375₹घरपोच (शिपिंग फ्री)

कादंबरीच्या पहील्या पानापासून ते अखेरच्या शब्दापर्यंत दुःख आपला पाठलाग करत रहातं, प्रचंड अस्वस्थ करतं. अगदी आनंदाच्या प्रसंगांचं वर्णन करतानाही लेखिकेनं हे दुःखाचं भान हरवू दिलेलं नाही. ईस्था आणि राहेल - दोन जुळी भावंड. त्यांची आई... त्यांचं आयुष्य... त्यांचं भावविश्व.... आणि ’डिंग’! निव्वळ मुर्तिमंत नैराश्याची, माणसाच्या चिरकाळ निरंतर दुःखाची, आणि अस्तित्त्वाच्या अस्वस्थ करून सोडणार्‍या निरुत्तर प्रश्नांची गोष्ट आहे ’गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’.

3)रहस्य प्राचीन नटराजाचे -राधिका नाथन
We Read - 455₹घरपोच (शिपिंग फ्री)

अपंग असलेला टॉम पुरातत्त्व खात्याच्या एका लायब्ररीत मोठ्या पदावर काम करत असतो. नटराजाची एक चौलकालीन मूर्ती लिलावात विकत घेण्याची संधी टॉमला प्राप्त होणार असते; पण त्या मूर्तीच्या खरेपणाविषयी टॉमला शंका असते. म्हणून त्या मूर्तीचा खरे-खोटेपणा तपासण्यासाठी तो त्याच्या भावाला, जोशला भरीला घालतो आणि इथूनच एका नाट्याला सुरुवात होते. त्या शोधासाठी इंटरनेट हॅकर असलेला जोश भारतात येतो. इथे चेन्नईत त्याची भेट विद्याशी होते. विद्या आणि तो त्या नटराजाच्या मूर्तीचं रहस्य शोधायला लागतात. पुरातन वस्तू विकणाऱ्या एका छोट्या स्टोअरपासून सुरू झालेली ही शोधयात्रा एका मोठ्या स्टोअरपाशी येते, या स्टोअरच्या मालकाचं शंकास्पद वागणं गूढता निर्माण करतं. त्यातच विद्यावर पाळत ठेवली जात असते. लंडनमधून टॉम त्यांना आवश्यक ती माहिती पुरवत असतो. विद्याचे वडीलही त्यांना मदत करत असतात. ही शोधयात्रा एका छोट्या गावातील मूर्तिकारापाशी येऊन थांबते. या मूर्तिकाराद्वारे उलगडतं का त्या नटराजाच्या मूर्तीचं रहस्य?

4)काळ्यानिळ्या रेषा - राजू बाविस्कर
495₹घरपोच (शिपिंग फ्री)

‘काळ्यानिळ्या रेषा' हे केवळ एका चित्रकाराचे आत्मकथन नाही, तर हा समाजातील एका वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार आहे. राजू बाविस्करांनी आधी आपल्या अभिव्यक्तीसाठी रेषा वापरली, रंग वापरले आणि आता आपल्या अनुभवांना शब्दांमधून वाट करून दिली आहे. आपल्या वाट्याला आलेले गावकुसाबाहेरचे उपेक्षेचे जगणे आणि झगडणे समंजसपणे उलगडत ते वाचकांना आपल्या चित्रांच्या दुखऱ्या मुळांपर्यंत घेऊन जातात. एका सर्जनाची मुळे दुसऱ्या माध्यमातील सर्जनप्रक्रियेत गवसणे हा अत्यंत विरळा असा अनुभव त्यांना आला. व्यक्तिचित्रणाच्या अंगाने जाणाऱ्या या आत्मकथनातून आपल्यालाही त्यामुळे अंतर्मुख करणारा अस्सल वाचनानुभव मिळतो.

5)काजळमाया – जी. ए. कुलकर्णी
375₹घरपोच (शिपिंग फ्री)

कालाधिष्ठित कथावस्तू, कथानक विकासाचे निश्चित टप्पे, घटनाबहुलता आणि रहस्यप्रधानता ही वैशिष्ट्ये असूनही जीएंची कथा कथानकनिष्ठ कथा होत नाही याचेही अंतिम कारण त्यांच्या कथेचा प्रतीकात्मक धर्मच. दृष्टिमापाने किंवा श्रवणमापाने दीर्घ आणि सैल वाटणाऱ्या जीएंच्या कथा प्रतीतीच्या दृष्टीने अतिशय बांधेसूद, अतिशय गोळीबंद, अतिशय दाट, सूक्ष्म आणि घट्ट विणीच्या असतात, फार घाटदार असतात. भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेल्या ‘काजळमाया’ या संग्रहात वाचकांना भुरळ घालणाऱ्या ‘प्रदक्षिणा’, ‘अंजन’, ‘विदूषक’, ‘कळसूत्र’ अशा कथांचा समावेश आहे.

6)कोकणातील दलितांचे रीतिरिवाज आणि लोकगीते – उर्मिला पवार
We Read -285₹घरपोच (शिपिंग फ्री)

उर्मिला पवार यांचे कथावाङ्मय, त्यांचे आत्मकथन आणि वेळोवेळी त्यांनी दिलेली व्याख्याने यांचा मी चाहता आहे. ‘कोकणातील दलितांचे रीतिरिवाज आणि लोकगीते’ या ग्रंथाचे वैशिष्ट्य हे की त्यात त्यांनी निव्वळ संकलन न करता त्यात कोकणाचा इतिहास, भूगोल, जीवनपद्धती आणि भाषा या सर्वांशी असलेला दाखवून दिला आहे. समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र या सर्वच विद्याशाखेतील अभ्यासकांना या पुस्तकात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सापडतील. म्हणूनच या संशोधनपर लेखनाला त्यांच्या स्वतंत्र लेखनाइतकेच महत्त्व आहे.

7)गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी
We Read -425₹घरपोच (शिपिंग फ्री)

सावरकरांचे गांधीजी, काँग्रेस व नेहरूंचे सरकार यांच्याशी संबंध कसे होते? • शेवटच्या काळात गोडसे सावरकरांच्या विरोधी का झाला होता? • गांधीहत्येमुळे सावरकरवादावर होणाऱ्या विपरीत व आत्मघातक परिणामाचा विचार तरी सावरकरांनी केला असेल की नाही? - अशा सर्व प्रश्नांचा कायदा, वास्तव, तर्क व न्यायबुद्धी यांच्या आधारे अभ्यासपूर्ण चिकित्सा करणारा ग्रंथ. '

8)समग्र जयंत नारळीकर-डॉ. जयंत नारळीकर
We Read -705₹घरपोच (शिपिंग फ्री)

'आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या प्रतिभाविलासातून फुललेल्या पाच विज्ञान कादंबर्‍या ! विज्ञानाच्या वस्तुनिष्ठ भक्कम पायावर उभ्या असलेल्या – प्रागैतिहासिक काळापासून भविष्यातील सहस्रकापर्यंतच्या कल्पक कथासूत्रांमध्ये गुंफलेल्या – विश्वनिर्मितीपासून सर्वसंहारक अणुयुद्धापर्यंत अनेक रहस्यमय घटनांमध्ये गुरफटलेल्या – वरवर चकव्यासारख्या वाटणार्‍या, पण तर्कशुद्ध विचारांचा चकित करणारा वेध घेणार्‍या – या पाच कादंबर्‍या वाचकाला जणू कालयंत्रातून भूत-भविष्य-वर्तमानाची सफर घडवतात, भविष्यातील सावध हाका ऐकवतात अन् वर्तमानाबद्दल सजग, सुजाण अन् विचारी बनवतात !'

9)झांबळ -समीर गायकवाड
We Read - 255 घरपोच (शिपिंग फ्री)

भेटलेली माणसे घनदाट होती !
थेट पोचायास कोठे वाट होती ?
कवीश्रेष्ठ सुरेश भट यांच्या ह्या काव्यपंक्ती आहेत.
काळजाला हात घालण्याची ताकद या ओळींत
आहे. याच तोलामोलाची माणसं या कथांत
भेटतील, ही माणसं अनेकाथांनी घनदाट होती.
त्यांच्यातली माणुसकी ओतप्रोत होती, मानवी
जीवन मूल्यांवरचा त्यांचा विश्वास अफाट होता,
त्यांची नाती अतुट मायेची होती आणि मुख्य
म्हणजे अंधाराच्या उंबऱ्यावरच्या प्रकाशखुणा
त्यांच्या भाळी होत्या. ही माणसं आपल्या
अवतीभवतीच असतात तरीही त्यांच्यातल
वेगळेपण आपल्याला उशिराने जाणवतं.

10)झोंबी -आनंद यादव
WE Read :- 365₹घरपोच (शिपिंग फ्री)

आजच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत अस्वस्थ होऊन धुमसणे हाच ग्रामीण जीवनाचा स्थायीभाव आहे. त्या अस्वस्थपणाचा स्फोट मराठी साहित्यात सुरू झालाच आहे. हे व्हायला हेवेच होते. शिवाय, साऱ्या जगातलं साहित्य समृद्ध केलं आहे. ते या `झोंबी`सारख्या वाचकाला अस्वस्थ करणाऱ्या ग्रंथांनीच !

11)रारंग ढांग -प्रभाकर पेंढारकर
WE Read :- 200₹घरपोच (शिपिंग फ्री)

प्रभाकर पेंढारकर यांचं हे अतिशय गाजलेलं पुस्तक. पेंढारकर यांनी अत्यंत वेगळा विषय रोचक पद्धतीनं हाताळला आहे. हिमालयात रस्ते बांधणारी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, सैन्यदलातील इंजिनिअरिंग विभाग, बॉर्डर रोडचा प्रमुख, टास्क फोर्स कमांडर्स या वेगळ्याच जगाबरोबर माणसांना आणि यांत्रांनाही थकविणारी हिमालयाची उंची, विरळ ऑक्सिजन, लहरी हवा, विलक्षण थंडी, दरडी कोसळणं, रक्त गोठवणारा बर्फ अशा बेभरवशी निसर्गाचं दर्शन घडतं. दुसरीकडे वेगवेगळ्या स्वभावाची माणसंही भेटतात. माणसं आणि निसर्ग यांचं नातं गुंफणारं, संघर्ष दाखविणारं वेगळं कथानक आकाराला येतं. पेंढारकरांची शैली चित्रमय आहे. त्यामुळे प्रसंग हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहतात. वाचक त्यात गुंतून पडतो.

12)लैंगिकता शिक्षण -डॉ.विठ्ठल प्रभू
WE Read :- 225₹घरपोच (शिपिंग फ्री)

हा विषय तसा नाजूक आणि स्फोटकसुद्धा. तरीही, लैंगिकता हा तुम्हां-आम्हां सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य पैलू आहेच. त्यामुळेच लैंगिकता या विषयाबाबतचे संकोच, दडपणं, गाढ अज्ञान अन् गैरसमजही दूर व्हायला हवेत. म्हणून याबाबत ‘योग्य’ काय आणि ‘अयोग्य’ काय, हे सा-यांना समजेल, अशा वैज्ञानिक परिभाषेत लिहिलेलं, ‘वाचावंच’ असं, एका अधिकारी तज्ज्ञाचं पुस्तक.

13)आदिवासी बोधकथा -एक पुनकर्थन
We read  - 225₹ घरपोच.(शिपिंग फ्री)

हे पुस्तक खरंच खूप जबरदस्त आणि अप्रतिम आहे.यातील प्रत्येक कथा उत्कृष्ट असून यामध्ये दिलेली वारली चित्रं तर खूप भन्नाट आहेत..गोष्ट सांगण्यासाठी आदिवासी स्त्रिया वारली चित्र काढत असतं. या कथांमध्ये आदिवासींची सारी जीवनपध्दती चित्रित केलेली आढळते.जीवनाचा सह-आनंद लुटलेला दिसतो.आदिवासी समाजातून बहरलेलं तत्वज्ञान यामध्ये सापडतो,त्यांची निसर्गाप्रति असलेली कृतज्ञता आणि प्राणिमात्रांवरचं प्रेम यामध्ये आपल्याला दिसतो.

14)सलोख्याचे प्रदेश -सबा नक्वी
We read किंमत - 225₹घरपोच (शिपिंग फ्री)

भारतात अनेक जाती - धर्मांचे लोक राहतात. प्रत्येक समाजाच्या चालीरीती, रूढी परंपरा वेगळ्या असतात. तरी 'अनेकतात एकता' म्हणतो त्याप्रमाणे येथील प्रमुख हिंदू व मुस्लीमांच्या परंपरा, सण, उत्सव, एकत्र साजरे होतात.
अशा काही ठिकाणी भेट देऊन तेथील समजाचे चित्रण सवा नक्वी यांनी 'सलोख्याचे प्रदेश' मधून दाखविले आहे.

15)मोठी माणसं -नरेंद्र चपळगावकर
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)

पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य यांच्या संधिकाळात आपल्या समाजजीवनावर अनेक व्यक्तींनी प्रभाव टाकला, त्यातील काहींची ही व्यक्तिचित्रे . त्यांची कार्यक्षेत्रे, त्यांचे राजकीय विचार, त्यांच्या कार्यपद्वती आणि त्यांच्या जीवननिष्ठाही वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्यात एक समान सूत्र आहे. त्यांच्या जीवननिष्टेचा एक पदर स्वातंत्र्याच्या चळवळीशी, तर दुसरा समाजाच्या प्रबोधनाशी जोडला गेलेला आहे. या संगळ्या व्यक्तीनी काही शाश्वत मूल्ये आपल्या मनाशी घट्ट बाळगली होती, व्यक्तिगत जीवनातील इच्छा-आकांक्षा आणि गरजा यांना बांध घालून समाजाचे ऋण फेडण्यासाठी, त्याच्या वैचारिक उन्नयनासाठी त्यांनी आपले कष्ट आणि बुद्धी वापरली. अशी असंख्य माणसे त्या काळात होऊन गेली, या पुस्तकातील व्यक्तिचित्रांमध्ये त्या सर्वांचे स्मरण अंतर्भूत आहे. आपला देश स्वातंत्र्याची पंचाहत्तरी पूर्ण करत असताना या मोठ्या माणसांचे स्मरण नक्कीच प्रस्तूत ठरावे.

16)धग - उद्धव शेळके
We read- 285₹घरपोच(शिपिंग फ्री)

‘धग’ ही कादंबरी आहे एका सामान्य शिंपिणीची कहाणी. परिस्थितीविरुद्ध तिने दिलेल्या लढ्याची ही गाथा.
“कौतिक” ही एक सामान्य स्त्री, पण तिची झुंज असामान्य आहे. परिस्थितीपुढे ती वाकते आणि म्हणूनच कादंबरी मनाला अधिक जाऊन भिडते. कारण हा शेवट अपरिहार्य असतो. स्थितीचे अनुलंघ्य कवच फोडण्यासाठी करफोड करणारा माणूस, हाच ह्या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे.

17)छावा -शिवाजी सावंत
We read - 675₹घरपोच

आजतागायत संभाजीमहाराजांच्या पराक्रमाच्या वर्णनाची मोहिनी कायम राहिली आहे. संभाजीराजांचे तामसी, अविचारी रूप पुसून टाकून संवेदनशील, हळवं, करारी आणि देशप्रेमी रूप या चरित्रातून दृगोचर होतं. 'संभाजीराजे खरच व्यसनांध असते, तर शेवटच्या कठोर साजेच्या प्रसंगी पारच ढासळले असते. कारण ती साजाच तेवढी क्रूर आणि अमानवी होती, ' असं सावंत दाखवून देतात. शिवाजीराजांचे पुत्र त्यांना शोभणारे वीर, साहसी होते, यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. सावंत यांची रसाळ, ओघवती शैली ऐतिहासिक प्रसंग उभे करताना अधिकच खुलते. पानोपानी उत्कंठा वाढत जाते. वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकद कादंबरीचेही सामर्थ्य आहे.

18)डॉ.बाबासाहेब आंबेडकर – धनंजय कीर
We read - 785 ₹घरपोच(शिपिंग फ्री)

एवढी तेवढी प्रतिकूलता कोणाच्याही वाट्याला कधीमधी येते. पण जन्माबरोबरच प्रतिकूलता डोंगरासारखी पुढ्यात हजर असलेल्या माणसाने काय करावे? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात प्रतिकूलतेने जे तांडव घातले ते पचवून बाबासाहेब माणूस म्हणून प्रस्थापित झाले, चैतन्याने लक्षलक्ष उजळून निघाले. ती दीप्ती अशी अभिनव होती की तिने बाबासाहेबांच्या कोटीकोटी बांधवांना जागृत करून ‘मदायत्तं तु पौरुषं’चा मंत्र त्यांच्या प्राणांत भरला आणि त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवले. ती अद्भुत कहाणी प्रत्यक्षात कशी घडली याची रोमांचकारी हकीकत या महाचरित्रात संयमशील समरसतेने सांगितलेली आहे.

19)लोकांचे संविधान- रोहित डे
We read - 450 ₹घरपोच(शिपिंग फ्री)

रोहित डे यांचं हे पुस्तक संविधानाचा भारतीयांवरील प्रभाव अधोरेखित करणारं
आहे. जनसामान्यांच्या जीवनात संविधानाने घडवलेले बदल आणि त्याचे परिणाम
यांविषयी या पुस्तकात उदाहरणांनिशी केलेलं विवेचन आपल्या संविधानाचं सामर्थ्य
उलगडून दाखवणारं आहे.

20)रिबेल सुलतान -मनू एस. पिल्लई
We read - 350 ₹घरपोच(शिपिंग फ्री)

‘हेवा वाटावा अशा शैलीत सहजतेने केलेली दख्खनच्या इतिहासाची
पुनर्निर्मिती… हे फारच मोठे यश असून यामुळे विद्वत्तापूर्ण अभ्यासास
चालनाच मिळेल.’ – रुद्रांग्शु मुखर्जी
‘चमकदार कथनशैली… अस्सल सनसनाटी कथानक, शेवटचं
पान संपवल्याखेरीज पुस्तक खाली ठेववत नाही.’

21)महाभारत पहिला इतिहास - वि.ग. कानिटकर
We read - 455 ₹घरपोच(शिपिंग फ्री)

महाभारत इतिहास की महाकाव्य?" यावर जरी वादविवाद आहेत, तरी जगभराच्या वाचकांमध्ये महाभारताबद्दल प्रचंड आकर्षण आहे. धर्मशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, नीतिशास्त्र, साहित्य इत्यादी सर्वच या ग्रंथात समाविष्ट असले, तरी मानवी मनाचा तळ शोधण्याचे या प्रथा अलोकिकत्व केवळ वादातीत आहे. त्यामुळे अनेक प्रतिभावंत लेखकांना महाभारतकथा लिहिण्याचा मोह पुनः पुन्हा होतो. हे पुस्तक पहिला इतिहास म्हणून लिहिले गेले असले, तरी एखादा अभिजात कादंबरी इतकी त्याची वाचनीयता आहे.

22)वाट तुडवताना -ऊत्तम कांबळे
We Read - 225₹ घरपोच (शिपिंग फ्री)
वाट तुडवताना' हे रूढ अर्थाने आत्मकथन आहे; पण आत्मचरित्राची समग्रता त्यात नाही. अर्थात लेखकालाही ते अभिप्रेत नाही. श्री. उत्तम कांबळे यांच्या विद्याजीवनाची जडणघडण ज्यातून कळते, असे हे विशिष्ट क्षेत्रीय आत्मकथन आहे. .....

23)गढीवरून -राजा गायकवाड
We Read - 255₹ घरपोच (शिपिंग फ्री)

कृषी-परंपरेतल्या बहुजनांच्या आणि त्यातल्या जराश्या उच्च स्थानावर बसलेल्या किंवा फलाण्या जातीत जन्म घेतल्यामुळे आपण उच्च स्थानावरच आहोत, असं समजून वागणाऱ्या माणसांच्या आत असलेले मानसिक-सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय गंड यांना हात घालणाऱ्या कथा या संग्रहामध्ये बहुसंख्येने आहेत.

24)सती ते सरोगसी- मंगला गोडबोले
225₹घरपोच (शिपिंग फ्री)

कोर्टाची पायरी चढणं नको, असंच बहुसंख्य महिलांना वाटत असतं. पण आता काळ बदललाय. जिथं कधीकाळी सतीबंदीचा कायदाही बिचकत करावा लागला होता, तिथंच आज ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ला कायद्याची मान्यता द्या, असा दबाव येतोय. जिथं स्वत: जन्माला घातलेल्या मुलावरसुद्धा बाईचा कायदेशीर अधिकार नव्हता, तिथंच आज ‘सरोगसी’द्वारे मूल मिळवण्याचा अधिकार हवासा वाटतो आहे. स्त्रीचा, तिच्या आणि समाजाच्याही मानसिकतेचा हा लांबलचक प्रवास समजून घेण्यासाठी आणि कायद्याबद्दलची किमान साक्षरता मिळवण्यासाठी सर्व महिलांनी हे पुस्तक वाचायलाच हवं.

25)गोपाळ गणेश आगरकर : बुद्धिप्रामण्यवादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक – अरविंद गणाचारी
495₹घरपोच (शिपिंग फ्री)

गोपाळ गणेश आगरकरांच्या विचारांचा व एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील एकमेव बुद्धिप्रामाण्यवादी समाजसुधारक म्हणून त्यांच्या भूमिकेचा विस्तृत अभ्यास झाला नव्हता. अरविंद गणाचारी यांनी ही उणीव यशस्वीरीत्या भरून काढली आहे. आगरकरांचा काळ व त्यांचे कर्तृत्व यांचे वर्णन करताना छापील दुय्यम साधनांच्या वापराबरोबरच, डॉ. गणाचारींनी खाजगी कागदपत्रे, तत्कालीन मुंबई सरकारच्या आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीची कागदपत्रे यांमधून यापूर्वी प्रकाशित न झालेली अस्सल साधने शोधून काढली आहेत.

26)समांतर -सुहास शिरवळकर
240₹घरपोच (शिपिंग फ्री)

मुळात खरं तर माझी इथ येण्याची इच्छाच नव्हती. इथंच काय, या क्षणापर्यंत मी अशा कोणत्याच ठिकाणी कधी गेलो नव्हतो. वाफगावकरनं इतकी मनधरणी केली केली... त्याचं मन मोडायचं नाही, म्हणून केवळ मी आलो होतो' या वाक्यानं कादंबरीची सुरुवात होते आणि उत्सुकता चालवण्याचीही! सुहास शिरवळकर यांची ही आणखी एक कादंबरी एका वेगळ्या जगात नेऊन सोडते.

27)इन्कलाब विरुद्ध जिहाद - लक्ष्मीकांत देशमुख
670₹घरपोच (शिपिंग फ्री)

इन्किलाब विरुध्द जिहाद हि ख-या अर्थाने मराठीमधली एक महाकादंबरी आहे. जागतिक दर्जाची खरीखुरी आतंरराष्ट्रीय मराठी कादंबरी हा या कादंबरीचा युनिक पॉइंट आहे.

28)इस्राइल : युद्ध, युद्ध आणि युद्धच - वि.ग. कानिटकर
450₹घरपोच (शिपिंग फ्री)

वि. ग. कानिटकरांनी इस्त्रायल: युद्ध, युद्ध आणि युद्धच!' या ग्रंथात सर्व प्रश्नांची क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडणी केली आहे. अरब इस्त्रायल प्रश्न हा केवळ काही राष्ट्रांमधील सीमावाद नसून त्याला एक व्यापक अर्थ आहे, असे ते मानतात. हा व्यापक अर्थ आहे ज्यू इतिहास आणि संस्कृतीतून निर्माण होणारी राजकीय-सामाजिक व्यवस्था आणि इस्लामी जागतिक दृष्टिकोनातून निर्माण झालेली अरब राज्यव्यवस्था यामध्ये हा अर्थ समजण्यासाठी इस्रायलच्या भूमिकेचे पूर्ण रूप त्याच्या अस्तित्वाला मान्यता मिळण्यासाठी आहे, हे लक्षात घ्यावे लागते..

29)रावण – शरद तांदळे
We read - 355 ₹घरपोच(शिपिंग फ्री)

रावणाच्या आयुष्यात घडलेल्या घटना, आलेली अनपेक्षित वादळं, त्यानंतरही विचारांच्या झालेल्या चिंध्या जपत स्वतःच्या हिमतीवर तो लंकाधिपती झाला. इतर राजांसारखी त्याने एकट्याने सुखं उपभोगली नाहीत. त्याची जनताही सोन्याच्या घरात राहत होती. हजारो वर्षांपासून अनुत्तरीत असलेल्या रावणाच्या वैयक्तिक आयुष्याचा, व्यक्तिमत्त्वाचा धांडोळा घेतला का कधी? त्याचे आयुष्य रोमहर्षक प्रसंगांनी आणि चित्तथरारक कर्तृत्वाने भारलेलं आहे. रावणाने स्वतःच्या बळावर सर्व देवांना पराभूत केलं होतं.

30)पंडित जवाहरलाल नेहरू : खिलाफत ते काश्मीर
अरुण सारथी
We read - 355 ₹घरपोच(शिपिंग फ्री)

खिलाफत आणि काश्मीर यांना जोडणारा एक समान दुवा आहे. तो म्हणजे जिहाद, हिंदुस्थानातील मुसलमानांना जिहादची संथा प्रथम महात्मा गांधींनी खिलाफत आंदोलनाच्या निमित्ताने दिली. तेथपासून एक हजार वर्षे एकत्र राहिलेल्या हिंदूविरुद्ध मुसलमानांनी जिहादच्या स्वरूपात दंगे सुरू केले. ते आजमितीला संपलेल नाहीत, जिहादला नेहरूंचा विरोध नव्हता. खिलाफत आंदोलनाचे पर्यवसान अखेर फाळणीत झाले. या शोकांतिकेचे 'गांधी' हे नायक होते आणि सहनायक होते पं. नेहरु, या शोकनाट्यातील पं. नेहरूंचा सहभाग हे या पुस्तकाचे मुख्य सूत्र आहे.

31)ज्ञानेश्वर ते आंबेडकर - डॉ. श्रीपाल सबनीस
We read - 250₹घरपोच(शिपिंग फ्री)

डॉ. श्रीपाल सबनीस यांचा अंतर्भाव आजच्या पिढीतील बिनीच्या लेखकांत होतो. त्यांचे वैचारिक ग्रंथ महाराष्ट्रात विद्यमान्य झाले. एक परिवर्तनशील सामाजिक विचारवंत म्हणून त्यांची महाराष्ट्रात प्रतिमा आहे.

32)प्रज्ञासूर्य -शरणकुमार लिंबाळे
We read - 370₹घरपोच(शिपिंग फ्री)

" डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या कोटी कोटी रुपांचा हा संपादित सोहळा. एका दुर्गम इतिहासाचं हे अक्षरलेणं. अनेक कलावंतांच्या कुंचल्यांतून साकार झालेला हा ग्रंथगौरव. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या 'प्रज्ञासूर्या'ची करोडो किरणं ओंजळीत पकडणं अशक्यच; तरीही या विराट विद्रोही रूपाची ही अक्षरपूजा.

33)डेझर्टर -विजय देवधर
We read - 375₹घरपोच(शिपिंग फ्री)

गंथर बान्हमान यांच्या 'आय डेझर्टेड रोमेल' या पुस्तकाचा विजय देवधर यांनी केलेला हा अनुवाद आहे.
हे पुस्तक म्हणजे एक अद्भूत साहस कथा आहे. अनेक साहसी घटना आणि थरारक प्रसंगामुळे ते रोमांचकारी
झाले आहे. बान्हमान यांचे स्वानुभव आणि कल्पना यांची बेमालूम सरमिसळ असलेले हे कथानक आहे.

34)डियर तुकोबा – विनायक होगाडे
We Read - 225 घरपोच (शिपिंग फ्री)

तुकारामायण', 'मीडिया ट्रायल ऑन तुकोबा' आणि
'डियर तुकोबा' अशा तीन रुपात विनायक होगाडे यांनी त्यांना
झालेले तुकारामदर्शन आपल्यापर्यंत पोहोचविलेले आहे.

35)डोंगराएवढा -के. शिवराम कारंथ
WE Read :- 155₹घरपोच (शिपिंग फ्री)

प्रतिकूल परिस्थीती आणि निसर्गाशी दोन हात करत जगणारे गोपालय्या आणि त्यांना साथ देणारी पत्नी शंकरम्मा यांचे सहजीवन तसेच त्यांचा मुलगा त्या उभयतांना भेटायला येत नसल्याची हृदयातील वेदना व त्यांच्या कणखर जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी मनोवेधक कादंबरी. मुळात कट्टद गोविंदय्या या व्यक्तीचं बोलणं, वागणं, सच्चेपणा आणि धीरोदात्त वृत्ती या कादंबरीच्या प्रेरणास्थानी आहे. लेखकाने त्यांच्या जीवनावर आधारित गोपालय्या हे पात्र साकारले आहे.

36)असा झाला पुणे करार-प्रभाकर ओव्हाळ
150₹घरपोच (शिपिंग फ्री)

'पुणे करार' युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील एक ऐतिहासिक संघर्ष पर्व ! ......त्यातील नाट्यमय घडामोडींवर आधारित, जळजळीत वास्तवाचा वेध घेणारी...
एक अनोखी कादंबरी ! प्रभाकर ओव्हाळ यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली...!

37)पिढीजात - श्रीकांत देशमुख
We read- 585₹ घरपोच (शिपिंग फ्री)

'एकाएकी नवनाथच्या डोळ्यांतून पाणी आलेलं. किती साधं असतं या लोकांचं जगणं. किती साधी आणि सोपी मागणी. मरणाची भीती नाही. जन्माला आलेले सारेच जाणार आहेत. कितीतरी मोठे आले आणि गेले. आम्ही तर साधी माणसं. पोटापुरतं मागणारी. धरणीमातेला मृत्यू थांबव, हे त्यांचं मागणं नाही; तर फक्त जीवन अमर ठेव. किती साधी प्रांजळ मागणी. नवनाथ थरारून गेला. काय बोलावं, हे त्याला कळेना. या सरकारी नोकरीमुळं जगण्याचे कितीतरी स्तर आपण जवळून पाहतोय.

38)मुखवटा -अरुण साधू
We Read -355₹घरपोच (शिपिंग फ्री)

रक्ताच्या नात्याचा संबंध देखील उरला नाही, अशा घराच्या रगाड्याला जुंपलेली ती आहे सत्तर वर्षांची निपुत्रिक बालविधवा. तिला कादंबरीची नायिका तरी कसे म्हणायचे! आहे खरी कथाभागाच्या वेंâद्रस्थानी. उसन्या नातेवाईकांच्या मुला-बाळांना मायेच्या घट्ट धाग्यांनी जखडून ठेवणारी.

39)धडपडणा-या तरुणाईसाठी -संदीपकुमार साळुंखे
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)

स्वप्नं पाहायला कुणी शिकवावं लागत नाही. तरुणाई स्वप्नाळू असतेच मुळी. पण स्वप्नं सहजासहजी साकार होत नाहीत. ती कठोर परीक्षा घेतात आणि कोणतीही दयामाया न दाखवता अनेकांना अपयशाचे रट्टे देतात. साहजिकच पदरी निराशा येते. पुढची वाट दिसेनाशी होते. काय करावं, कुठे जावं... काही कळत नाही. मार्गदर्शक मित्र भेटत नाही... अशा असंख्य तरुणांना थोरल्या भावाच्या नात्यानं धीर देणा-या, उठून उभं राहण्यासाठी हात देणा-या आणि स्वप्नं साकार करण्यासाठी नेमकी कोणती साधना कशी नि केव्हा करायची, हेही समजावून सांगणा-या एका तरुणाचं हे बावनकशी लखलखतं आत्मकथन...

40)तिसरी क्रांती -अरुण साधू
We Read -400₹घरपोच (शिपिंग फ्री)

मानवी इतिहासातील समतावादी समाजरचनेचा अट्टाहासाने केलेला असा भव्य, महत्वाकांक्षी आणि क्लेशकारक प्रयोग संपला. पण ज्यासाठी रशियन जनतेने रक्त, घाम आणि अश्रू दिले त्या आदर्शांचे काय? स्तिमित करून टाकणा-या सोवियेत क्रांतीचा रोमहर्षक, विस्तीर्ण पट... '

41)आस्तिकशिरोमणी चार्वाक -डॉ.आ.ह.साळुंखे
We read किंमत - 250₹घरपोच (शिपिंग फ्री)

चार्वाकांविषयी गैरसमज दूर करणारे एक अप्रतिम पुस्तक. चार्वाकांचे विचार आजही उपयुक्त आहेत. चार्वाकांचा देहात्मवाद, जडवाद, बुध्दीचे स्वातंत्र्य जपणे, प्रत्यक्ष प्रमाण व लौकिक अनुमानाचा पुरस्कार करणे, कर्मकांडांना विरोध इ. अनेक गोष्टी काळाच्या ओघात सत्य ठरल्या आहेत.

42) संदर्भ पोखरतोय -पवन नालट
We read Price - 255₹घरपोच (शिपिंग फ्री)

मला माहीत होतं थडग्यांवर जीव लावणारी माणसं सर्वच धर्मांत असतात माणसांवर जीव लावणारी माणसं सापडत नाहीत कुठेही! धर्मानं बांधल्या होत्या कधीच्याच कबरी माणसाचं अस्तित्व खोल पुरून कधी मंदिरावर उभारलेल्या कळसामधून कधी मशिदीवर रोवलेल्या चंद्रकोरीमधून माणसांच्या विचारांना विचारांनी तिलांजली देणारी माणसं विवेकाचा कत्लेआम करत असतात दररोज...

43)मला प्रभावित करून गेलेले पुस्तक -विनोद शिरसाठ
200₹ घरपोच (शिपिंग फ्री)

या पुस्तकातून अशा निष्कर्षाप्रत सहज येता येईल की, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वेगवेगळी पुस्तके प्रभाव टाकून जाऊ शकतात. यातून ‘वाचनाचे’ व अधिक चांगल्या वाचनाचे महत्त्व अधोरेखित होते. शिवाय, अभिजात किंवा संशोधनपर किंवा अस्सल जीवनानुभव सांगणारी किंवा अद्भुत अनोखे विश्व दाखवणारी किंवा कल्पकता प्रतिभा यांना बढावा देणारी पुस्तके, प्रभाव टाकून जाण्याची क्षमता जास्त बाळगून असतात. म्हणजे तशी पुस्तके वाचण्याची सवय असेल तर आपला सभोवताल समजून घेण्यासाठी ती विशेष उपयुक्त ठरतात!

44)शहिद भगतसिंग यांची जेल डायरी-अभिजित भालेराव
We Read -325₹ घरपोच (शिपिंग फ्री)

भगतसिहांना पुस्तकं वाचण्याची खूप आवड होती. त्यांनी जेलमधी 713 दिवसांत 302 ग्रंथ वाचले. म्हणजे कमीत कमी दोन दिवसात एक ग्रंथ वाचला. त्यांना इतके ग्रंथ कुठून मिळत होते...तर त्यांना ‛लाहौरच्या द्वारकादास’ लायब्ररीतून ग्रंथ मिळायचे.भगतसिंह इतक्या पुस्तकांचे नाव सांगायचे, की त्या लायब्ररीमध्ये काही पुस्तक नसायचे.इतक्या पुस्तकांचे ते वाचन करत होते.त्यांनी वाचन केलेल्या ग्रंथांच्या नोट्स डायरीमध्ये लिहून ठेवलेल्या आहेत.अनेक देशातील विचारवंतांची पुस्तके भगतसिंग यांनी वाचली होती हे त्यांनी लिहिलेल्या डायरीतून आपल्या लक्षात येते.डायरी इंग्रजीत लिहलेली आहे.त्यांचे अक्षर खूप सुंदर आहे.त्यांना जगातील सर्व चांगल्या लेखकांची पुस्तके पाहिजे होती.यावरून त्यांच्या वाचनाची आणि लेखनाची आवड आणि जिद्द आपल्या लक्षात येते.

45)साद घालतो कालाहरी
We read - 465₹घरपोच (शिपिंग फ्री)

'क्राय ऑफ कालाहारी’ हे पुस्तक म्हणजे कालाहारी वाळवंटात सात वर्षे राहिलेल्या मार्क आणि डेलिया ओवेन्स यांच्या जंगली प्राण्यांच्या सहवासातील अनुभवांवर आधारित कादंबरी आहे. त्याचा मंदार गोडबाले यांनी मराठी अनुवाद केला आहे. बदली कपड्यांचा एक जोड आणि एक दुर्बीण वगळता बाकी विशेष काही न घेता मार्क आणि डेलिया या तरुण अमेरिकन जोडप्याने प्राणिजीवनाचा अभ्यास करण्यासाठी आफ्रिकेचे विमान पकडले. तिथे पोहोचल्यावर एक जुनाट लँडरोव्हर गाडी विकत घेऊन त्यांनी कालाहारी वाळवंटात (डिसेप्शन व्हॅली) खोलवर मजल मारली.

46)रफ स्केचस -सुभाष अवचट
We read Price - 355₹घरपोच

प्रख्यात चित्रकार सुभाष अवचट यांनी रेखाटलेली ही रफ स्केचेस आपल्याला तीच विरळा संधी देतात. आयुष्यात त्यांना भेटलेली माणसं, त्यांचं वेगळेपण, स्वतःची चित्रं, त्या चित्रांमागचा विचार, त्यामागची प्रोसेस,जगभरातले चित्रकार, त्यांचं म्हणणं, माणसाला व्यापून असलेल्या भाव-भावना अशा नाना गोष्टींना सहजपणे कवेत घेत जाणारं अवचटांचं लिखाण त्यांच्या चित्रांइतकंच उत्स्फूर्त आणि लखाखतं आहे.

47)अवणी T1 -नवाब शफाअत अली खान
We read Price - 225₹घरपोच

अवनीचा बंदोबस्त हा तिला मारूनच करणे योग्य होते की अयोग्य?” हे पुस्तक तुम्हाला तुमचे उत्तर मिळवून देण्यास नक्कीच मदत करेल ही अशा व्यक्त करतो.
        
48))लॉर्ड्स ऑफ द डेक्कन – अनिरुद्ध कणिसेट्टी
We Read -455₹घरपोच (शिपिंग फ्री)

सहसा विशाल भारतीय उपखंडाचा इतिहास सांगताना, आधुनिक काळातील भारताचा मोठा भाग एकाच राजाच्या आधिपत्याखाली असण्याचा काळ अत्यल्प असल्याचं सांगितलं जातं. परकी आक्रमणं आणि गंगेच्या खोऱ्यातील राजकारण यांनी बहुतांश लोक झपाटून गेल्याचं दिसतं मात्र उर्वरित उपखंडाचा इतिहास हा अत्यल्प प्रमाणात आणि सहसा फक्त तळटीपांच्या स्वरूपात दिला जातो. कनिसेट्टी यांच्या या विद्वत्तापूर्ण आणि निःपक्षपातीपणे लिहिल्या गेलेल्या पहिल्याच पुस्तकाचं गंभीरपणे स्वागत झालं आहे.

49)नर्मदे हर हर -जगन्नाथ कुंटे
We read Price - 255₹घरपोच

नर्मदा भारतातील एक प्राचीन नदी. तिची परिक्रमा म्हणजे नर्मदेला चालत प्रदक्षिणा घालण्याची परंपराही हजारो वर्षापूर्वीची. आज या परिक्रमेला भक्तीबरोबरच उत्कंठेचेही वलय लाभले आहे. श्रद्धापूर्वक परिक्रमा कशी करावी, याचे सविस्तर वर्णन जगन्नाथ कुंटे यांनी 'नर्मदे हर हर'मध्ये केले आहे. मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्राचा सीमा भाग असं विस्तीर्ण प्रदेश या परिक्रमेत येतो. सर्वाधिक परिक्रमा मध्य प्रदेशातून होते.

50)तुझ्यासह तुझ्याविना -डॉ.आ.ह साळुंखे
We read  - 175₹ घरपोच.(शिपिंग फ्री)

तुझ्यासह आणि तुझ्याविना : संस्कृतमधलं ललित साहित्य आणि लेखकांच्या पत्नीच्या आठवणी यांना एकत्र गुंफण्याचा प्रयत्न केला आहे.

51)न्याय – मायकल सॅंडेल
We Read -355₹घरपोच (शिपिंग फ्री)

खोट बोलण हे नेहमीच वाईट असतं का?
व्यक्तिस्वातंत्र्याला काही मर्यादा असली पाहिजे का?
अपवादात्मक परिस्थितीत एखाद्याचा खून करावा लागल्याचं समर्थन करता येऊ शकेल का?
मुक्त बाजरपेठ खरंच मुक्त आहे का?
विषमता कमी करण्यासाठी ठरावीक लोकांवर कर आकारणं न्याय्य आहे का?

52)महामाया निळावंती -सुमेध
मुळ किंमत - 350₹
We read किंमत - 325 घरपोच (शिपिंग फ्री)

1992 साली घडलेली एक अजब घटना. एक बाप निळावंतीची पोथी शोधत सह्याद्रीच्या जंगलात येतो. त्याच्यासोबत आहे त्याच्या मुलाचा बर्फात अन मिठात ठेवलेला मृतदेह. ह्या जतन केलेल्या मृतदेहाला जिवंत करण्यासाठी बाप जंगजंग पछाडतो. शेवटी त्याला अनपेक्षितरित्या जंगलात साक्षात निळावंतीचं अस्तित्व सापडतं. बाप आपल्या मुलाच्या मृतदेहाला जिवंत करू शकतो का? वनदेवता निळावंती अजूनही अस्तित्वात आहे का? तिची भाषा म्हणजे कोणती भाषा? निळावंती जर आजही अस्तित्वात असेल तर चारशे वर्षांपूर्वी ती मेली नव्हती का?

53)पु. शि. रेगे यांची समग्र कविता – पु. शि. रेगे
We Read - 1255₹घरपोच (शिपिंग फ्री)

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मराठी कवितेला नवे रूप प्राप्त करून देण्यात बा. सी. मर्ढेकरांइतकाच पु. शि. रेगे यांचाही वाटा आहे. अन्य वाङ्मयप्रकारांच्या संदर्भात कवितेच्या स्वरूपाच्या वेगळेपणाची — कवितेच्या विशुद्धतेची — अचूक जाणीव रेगे यांच्या कवितेतून प्रथम प्रकट झाली. पु. शि. रेगे यांच्या सर्व कविता सुधीर रसाळ यांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह या ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत.

54)मी देशाला काय देऊ शकतो - एपीजे अब्दुल कलाम
We read- 225₹घरपोच (शिपिंग फ्री)

देशातील सर्वांत लाडक्या शिक्षकाच्या स्मृत्यर्थ ‘याचि सम हा’ असे अत्युत्कृष्ट शिक्षक म्हणून डॉ. कलाम ओळखले जातात. त्यांचे बोल, त्यांचे विचार, त्यांची जीवनशैली अनेक दृष्टींनी स्वतंत्र वस्तुपाठ आहेत. त्यांचा जवळून सहवास लाभलेले आणि त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासोबत असलेले त्यांचे शिष्य सृजन पाल सिंग यांनी हे पुस्तक त्यांना अर्पण केले आहे

55)मऱ्हाटा पातशाह -केतन पुरी
We read- 255₹घरपोच.(शिपिंग फ्री)

70 पेक्षा जास्त संदर्भग्रंथ आणि 250 पेक्षा जास्त डच भाषेतील कागदपत्रांचे भाषांतर करून अतिशय अपरिचित माहितीचे दालन उलगडून दाखवणारा संदर्भग्रंथ म्हणजेच ‘मऱ्हाटा_पातशहा’.
एक वर्षात तब्बल चार हजार प्रतींची विक्री करणारे ऐतिहासिक पुस्तक म्हणजे 'मऱ्हाटा पातशाह'.

56)नास्तिकयात्रा -सुनील दांडेकर
We read -315 घरपोच (शिपिंग फ्री)

'या पुस्तकाचा उद्देश तुम्हाला काही पटविण्याचा वा विकण्याचा नाही, तर काही विचार तुमच्यासमोर तपासायला ठेवण्याचा आहे. कोणत्याही विचारसरणीबद्दल तुम्हाला साशंक बनवण्याचा आहे. मग तो विचार विज्ञानातला असो वा देवाधर्माचा ! देव आणि धर्म याबाबतीत आधुनिक विज्ञानाने जे प्रश्न उपस्थित केले आहेत आणि अनेक क्षेत्रांमधील अनेक प्रश्नांची विज्ञानाने जी समर्पक उत्तरे दिली आहेत, त्यांचा गोषवारा वाचकापर्यंत पोहचविणारी तर्कवादाच्या दिशेने टाकलेली पाच पावले म्हणजे नास्तिकयात्रा'

57)पिरॅमिडच्या प्रदेशात - डॉ. अच्युत बन
We read Price - 245₹घरपोच.(शिपिंग फ्री)

इजिप्त म्हणजे साडेचार हजार वर्षांची प्राचीन संस्कृती. इजिप्त म्हणजे फारोह, नाईल, ममीज् अन् अवाढव्य मंदिरे. पण या सर्वांहून ठळक वैशिष्ट्य म्हणजे इजिप्तचे पिरॅमिड. प्राचीन जगातील आश्चर्यांपैकी आधुनिक जगापर्यंत पोहोचलेले एकमेव आश्चर्य म्हणजे इजिप्तचे हे पिरॅमिड. या प्राचीन संस्कृतीच्या अवशेषांचे, वास्तूंचे अन् प्रतीकांचे वेधक दर्शन घ्यायचे असेल, तर चला जाऊ सफरीला -

58)सोयरीक घराशी -अंजली कीर्तने
We read किंमत - 325₹ घरपोच (शिपिंग फ्री)

माणसाच्या भावजीवनातील या उत्कट नातेसंबंधाचा बहुस्तरीय शोध या पुस्तकात अंजली कीर्तने यांनी घेतला आहे. बाळपणीच्या रम्य परिसरातील घरं, लघुपट निर्मितीसाठी शोधलेली घरं, परदेशप्रवासात गवसलेली घरं आणि वाचनातून मनात स्थानापन्न झालेली घरं, यांची व्यक्तिचित्रं त्यांनी आपल्या रसपूर्ण शैलीत रंगवली आहेत. चिंतनाची डूब असल्यानं लेखनाची अर्थसघनता वृद्धिंगत झाली आहे.

59)एक होता कार्व्हर -वीणा गवाणकर
We Read -245₹घरपोच (शिपिंग फ्री)
भावी पिढ्यांच्या सुख-समृद्धीचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच हवे असे पुस्तक.'

60)लर्न टू अर्न- पीटर लिंच
We Read -385₹घरपोच (शिपिंग फ्री)

केवळ गुंतवणूक कशी करावी यावर भाष्य करून हे पुस्तक थांबत नाही, तर वाचकांना गुंतवणूकदारासारखा विचार करायलादेखील प्रवृत्त करते.

61)या जीवनाचे काय करू?- डॉ. अभय बंग
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)

अभय बंग यांच्या ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ पुस्तकाने महाराष्ट्राच्या हृदयाला व जीवनशैलीला हात घातला. ‘कोवळी पानगळ’ अहवालाने महाराष्ट्राच्या सामाजिक संवेदनशीलतेला हलवले. ‘निर्माण’ या उपक्रमाने युवा पिढीसमोर नवी क्षितिजे उभी केली. आता ते महाराष्ट्राशी संवाद करत आहेत, एका खास प्रश्नावर. या जीवनाचे काय करू?

62)प्रेरणा द साउंड ऑफ सायलेन्स - उज्वला सहाणे
We read किंमत - 350₹ घरपोच (शिपिंग फ्री)

63)भंगार -अशोक जाधव
We Read -185₹घरपोच (शिपिंग फ्री)
,
भंगार' हे आत्मचरित्र गोसावी समाजाचं चित्र आपल्यापुढं ठेवतं. गोसावी समाजाचं भटकं जीवन, तीन दगडांची चूल, तीन थामल्यांवर (काठ्यांवर) उभी पालं, भंगार गोळा करण्यातील मरण यातना, कोंडाळ्याचे तीन भागीदार ( माणूस, कुत्रं नि डुक्कर), जातपंचायतीचा बडेजाव, स्त्रीचं अस्तित्वहीन जगणं. मुलांचं जन्मतः नि जन्मभर वंचित जगणं, हे सारं शब्दबद्ध करणारं 'भंगार' वाचकाला गोसावी समाजाचं भंगारपण समजून घ्यायला भाग पाडतं...

64)पर्व -डॉ.एस.एल. भैरप्पा
We read Price - 485₹घरपोच.(शिपिंग फ्री)

व्यासरचित महाभारतातील आभाळाएवढ्या उंचीची पात्रे; परंतु सगळ्यांचे पाय मातीचे. अवघी जीवनमूल्ये कसोटीला लावणारे समरप्रसंग. संघर्ष. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व वेगळे. प्रत्येकाच्या प्रेरणा वेगळ्या. प्रत्येकाचे प्राक्तनही वेगळे. त्याचबरोबर अनेक चमत्कार; दैवी शाप; दैवी वर. मानवी पातळीपेक्षा वेगळ्या पातळीवर जाणारे कथानक. कर्नाटकमधील अग्रगण्य कादंबरीकार तत्त्वचिंतक डॉ. एस.एल. भैरप्पा यांनी या चमत्कारांच्या, शापांच्या आणि वरदानांच्या भरभक्कम पडद्याआड लपलेल्या माणसांचा शोध घेतला. आधुनिक मानववंशशास्त्रीय, समाजशास्त्रीय, संकल्पनांच्या प्रकाशझोतात महाभारतातल्या व्यक्तिरेखांच्या वर्तनाची संगती लावली. त्यामुळेच पर्व ही महाभारताची एक विलक्षण प्रत्ययकारी अनुभूती देणारी कलाकृती ठरली. तशीच खळबळजनकही. त्या महाकादंबरीचा हा रसपूर्ण मराठी अनुवाद. सहजसुंदर.

65)जिज्ञासापुरुष ह्युएनत्संग -डॉ.आ.ह साळुंखे
We read Price - 250₹घरपोच.(शिपिंग फ्री)
संस्कृतीच्या पुनर्मांडणीचे कार्य किती गांभीर्याने केले पाहिजे,ते समजण्यासाठी च्वांग यांचे चरित्र अगदी आजही मार्गदर्शक आहे.

66)एका रानवेडयाची शोधयात्रा -कृष्णमेघ कुंटे
WE Read :- 275₹घरपोच (शिपिंग फ्री)

मदुमलाईच्या जंगलातला एक तरुणप्रसन्न जीवनानुभव त्यातल्या सा-या चढउतारांसह, रौद्रथरारांसह आणून देणारं हे उत्कट पुस्तक असंच अनुभवण्याजोगं पुस्तक आहे... कृष्णमेघ जेथे रमला त्या मदुमलाईच्या प्रेमात पाडणारं... आणि त्याच्या हातून जे निसटलं त्याबद्दल हुरहूर लावणारं... वाचकांच्या जंगलजाणिवा प्रगल्भ करणारं, सहजसुंदर शैलीतलं... '

67)निसर्गायण -दिलीप कुलकर्णी
We read Price - 240₹घरपोच.(शिपिंग फ्री)

आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही ह्या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्या समोर उभ्या ठाकल्या आहेत. ही मनोवृत्ती जोवर बदलत नाही, तोवर ह्या समस्या सुटणार नाहीत. हा बदल कसा असला पाहिजे? तो कशानं शक्य होईल? आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान ह्यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. '

68)आधुनिक भारताचे प्रेषित : स्वामी विवेकानंद -माधव मोर्डेकर
WE Read :- 275₹घरपोच (शिपिंग फ्री)

स्वामी विवेकानंद या नावाचा केवळ उच्चारच आपल्याला एका उदात्त, उत्तुंग आणि उन्मनी अवस्थेत घेऊन जातो. त्यांच्या जीवनाचा वेध घेणे म्हणजे भारतीय संस्कृती, तिचे नैतिक अधिष्ठान, तिची जीवनमूल्यपध्दती यांचा अभ्यासच आहे. त्यांनी दिलेला सहिष्णुतेचा संदेश ख-याखु-या ज्ञानाचा आविष्काराचा आहे. त्यामुळे स्वामीजी या देशाचा एक आदर्श, अनुकरणीय प्रवक्तेच टरतात. त्याशिवाय, आपल्या सभोवतालच्या तळागाळातील जनसामान्यांच्या कल्याणासाटी संन्याशांचा संप्रदाय निर्माण करण्याचे जे व्रत त्यांनी घेतले त्यामुळे स्वामी विवेकानंद एक महान प्रेषित व असाधारण लोकाग्रणी टरतात.

69)लोक माझे सांगाती -शरद पवार
We read किंमत - 325₹घरपोच (शिपिंग फ्री

शरद पवार गेली साडेपाच दशकं देशाच्या जडणघडणीत महत्वपूर्ण सहभाग असणा-या नेत्यानं घेतलेला आपल्या राजकीय वाटचालीचा विश्लेषक वेध. '
70)अर्थाच्या शोधात -व्हीकटर फ्रँकलन
We read किंमत - 185₹ घरपोच (शिपिंग फ्री)

71)हसरे दुःख - भा.द खेर
We read Price - 495₹घरपोच.(शिपिंग फ्री)

माझं आयुष्यच नाटयमय आहे. तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव माझ्या चित्रपटांवर पडणारच. त्यातील सारं वास्तव मी स्वत:च अनुभवल्यामुळे माझे चित्रपट जिवंत वाटतात. नकळत मी लोकांना जीवनातलं दु:ख दाखवून देतो. आपल्या हस-या मुखवटयातून जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणा-या मनस्वी कलावंताच्या आयुष्याची कहाणी. '

72)घोस्ट रायटर -आशिष महाबळ
225₹घरपोच (शिपिंग फ्री)

विज्ञान संशोधनाची नवनवी क्षेत्रं विकसित होत असताना विज्ञानकथा लेखनानेही नव्या कल्पना धुंडाळाव्यात, अशी अस्सल विज्ञानप्रेमी वाचकांची अपेक्षा असते. या संग्रहातल्या कथा ही अपेक्षा नक्कीच पूर्ण करतात. विज्ञानकथावाचनाची आपली इयत्ता वाढवतात.

73)बारबाला -वैशाली हळदणकर
WE Read :- 175₹घरपोच (शिपिंग फ्री)

मी स्वत:ला वेश्या समजत नव्हते. माझ्या मनाच्या कोप-यात मी स्वत:ची एक प्रतिमा हळुवार जपली होती. बाहेरून मला कोणीही ओरबाडलं, रक्तबंबाळ केलं तरी त्या प्रतिमेला मी प्राणपणाने जपणार होते. ती प्रतिमा एका कलाकाराची होती. मनस्वी कलाकाराची. पण मला हे जमणार होतं का? पुरुषांना जणू माझा वास यायचा, की ही अशी बाई आहे, जिला आपण चिरडू शकतो, वापरू शकतो. माझ्याबाबत घडूनघडून काय घडणार होतं? काय घडायचं राहिलं होतं? जे काय घडायचं ते घडो; पण मला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नको होती. मुलांच्या आयुष्याची नासाडी नको होती. अपेक्षा खूप मोठ्या नव्हत्या पण जे आयुष्य होतं तसंच सुरू राहिलं असतं तर मी किती काळ जिवंत राहू शकले असते? कशा अवस्थेत जिवंत राहू शकले असते?

74)खुलूस -समीर गायकवाड
300₹घरपोच (शिपिंग फ्री)

खुलूस म्हणजे निर्मळ सच्चेपण, आस्था आणि निष्ठा...
या स्त्रियांचं जगणं त्यांच सच्चेपणानेचितारणारं हे पुस्तक..
रेड लाइट डायरीज .. . खुलूस !

75)धर्म आणि समलैंगिकता -देवदत्त पट्टनायक
We read- 185₹घरपोच

समलैंगिकता म्हणजे काय? आपले धर्म याबद्दल काय म्हणतात? हिंदू पौराणिक कथा, इस्लाम, जैन आणि बौद्ध धर्मातील साहित्यात याविषयी काय दृष्टीकोन दिसतो? या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन देवदत्त पट्टनायक यांनी जगभरातील प्रत्येक धर्माचा समलैंगिकतेबद्दलचा काय विचार आहे, हे या पुस्तकात स्पष्ट केलं आहे. याशिवाय, निसर्गात समलैंगिकता सहजपणानं दिसते व त्यात अनैसर्गिक काही नाही असंही ते दाखवून देतात.

76)शेतकऱ्याचा असूड’-महात्मा फुले
We read-160₹घरपोच(शिपिंग फ्री)

हे महात्मा जोतीराव फुले यांनी निर्मिलेले फार सुंदर रूपक आहे. शेतकऱ्याच्या खांद्यावर असणारा हा असूड केवळ शेतकीत साहाय्य करणाऱ्या जनावरांसाठीच वापरला जातो असे त्यांना वाटत नाही. सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध आणि शोषकांविरुद्धही हा असूड वापरला पाहिजे.

77)डोंगरी ते दुबई -हुसेन जैदी
We read-400₹घरपोच(शिपिंग फ्री)

मुंबईवर ६० वर्षे आपला प्रभाव पाडणारे गुंडाच्या टोळ्यांचे डॉन होते. त्यात हाजी मस्तान, करीम लाला, वरदराजन मुदलियार, छोटा राजन, अबू सालेम हे होते. पण या सर्वांवर कडी केली ती दाऊदने. या सर्वांची तपशीलवार माहिती काढून अभ्यासपूर्वक त्यांच्यावर लिहिलेले हे पहिलेच पुस्तक आहे.

78)समर्थ-मंजुश्रीगोखले
We read-400₹घरपोच(शिपिंग फ्री)

समर्थ रामदासांची ही जीवनगाथा. जांब या गावातील त्यांचं बालपण, लहानपणापासूनच नदीशी, रामरायाशी, हनुमंताशी जडलेलं नातं, प्रत्यक्ष रामरायाने, हनुमंताने त्यांना दिलेला अनुग्रह, लहानपणापासूनच व्यायामाबद्दल त्यांना असलेलं प्रेम, त्यांची अखंड साधना, पुरश्चरण, बलोपासना, हिंदू धर्माऱ्यारक्षणासाठी ठिकठिकाणी स्थापिलेली मारुती मंदिरं, मठ, युवकांना संघटित करून, रामनवमी, हनुमानजयंतीसारऱ्याउत्सवातून अंगीकारलेली समाजाभिमुखता, शहाजी राजे आणि शिवाजी राजांशी असलेला अनुबंध, चाफळ येथील रामंदिराची स्थापना, शिवथर घळ येथे झालेली दासबोधाची निर्मिती, त्यांनी भारतभर केलेलं भ्रमण, सज्जनगडावरील त्यांचं वास्तव्य, त्यांचा शिष्यपरिवार आणि शेवटी सज्जनगडावर त्यांचं रामरूपात विलीन होणं...असा हा रामदासांचा जीवनप्रवास ओघवऱ्याभाषेत शब्दबद्ध केला आहे.

79)शेअर बाजार - जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव!
-रविन्द्र देसाई
We read-265₹घरपोच(शिपिंग फ्री)

शेअर म्हणजे कंपनीच्या मालमत्तेवर आपला हक्क आणि नफ्यात पूर्ण हिस्सेदारी; पण कंपनीला तोटा झाला, तर मात्र आपल्यावर काहीच जबाबदारी नाही. चांगल्या शेअर्समुळे म्हणून तर समृद्धीची गंगाच दारी अवतरू शकते. पण मुळात शेअर्स म्हणजे काय? ते मिळतात कुठे? चांगले शेअर्स नेमके ओळखायचे कसे? त्यांच्या खरेदीची व विक्रीची योग्य वेळ कोणती? इन्ट्रा-डे आणि डिलिव्हरी व्यवहारांतील खाचाखोचा कोणत्या? कंपनीची कार्यक्षमता नेमकी कशी जोखायची? ताळेबंद व नफा- तोटा पत्रक कसे वाचायचे? एखादी कंपनी उद्यासुद्धा फायद्यात राहील की नाही, हे इंटरनेटवरील उपलब्ध माहितीवरून आजच ओळखायचे कसे? नेमके हेच तर सारे सांगितले आहे या पुस्तकात! तुमच्या सा-या शंकांचे अत्यंत सोप्या शब्दांत निरसन करणारे मराठीतील एकमेव सचित्र पुस्तक शेअर बाजार जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव! '

80)मंत्र गुंतवणुकीचा -अरविंद परांजपे
We read-265₹घरपोच(शिपिंग फ्री)

अर्थनियोजनापासून आर्थिक उद्दिष्टांपर्यंत वाटचाल करण्याचे बहुविध मार्ग असतात. पैशाची गुंतवणूक आणि त्यासाठीचे विविध पर्याय म्हणजे अशा मार्गांवरची वाटचाल. कोणता पर्याय निवडावा? पीपीएफ? शेअर्स? म्युच्युअल फंड? सोने? स्थावर मालमत्ता? पेन्शन स्कीम? कोणताही पर्याय निवडायचा; तर संशोधन, अभ्यास आणि अनुभव म्हणजे यशस्वी गुतंवणुकीचा पाया. वस्तूचे योग्य मूल्यांकन करण्याची क्षमता, इतरांना न दिसलेली गोष्ट हेरणे आणि यथायोग्य विश्लेषण हे यशस्वी गुंतवणू्कदारासाठी आवश्यक गुण. या गुणांच्या आधारे यशस्वी गुंतवणुकीची पायाभरणी कशी करावी, हे सर्वांना उलगडून दाखवणारा.

81)थिजलेल्या काळाचे अवशेष - नीरजा
We read-355₹घरपोच(शिपिंग फ्री)

मराठी साहित्यातील कविता आणि कथा या क्षेत्रांत नीरजा यांनी स्वत:चे एक स्थान तयार केले आहे. ‘थिजलेल्या काळाचे अवशेष' ही त्यांची पहिलीच कादंबरी, या क्षेत्रातही त्या आपला ठसा निर्माण करतील, असा विश्वास देऊन जाते.

82) चंद्रमुखी-विश्वास पाटील
We read-355₹घरपोच(शिपिंग फ्री)

'तो ध्येयधुरंधर राजकारणी, ती तमाशातली शुक्राची चांदणी. लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतवळीची ही रशीली कहाणी '

83)लस्ट फॉर लालबाग -विश्वास पाटील
We read-695₹घरपोच(शिपिंग फ्री)

परेल-लालबागच्या गगनचुंबी टॉवरबनाखाली गाडलेल्या लाखो श्रमिकांचे हुंदके अन् उसासे... संपाच्या सुलतानीनं गिरणगावाला प्रथम चिरडलं, पाठोपाठ जागतिकीकरणाचा भूलभुलैय्या दाखवून गिरणबाबूंची हाडं नि फासोळया उखडल्या. चोरांची आणि थोरांचीही स्वप्नं एकजीव झाली. मुंबईत अंडरवर्ल्ड आणि ओव्हरवर्ल्डच्या सटिंगनं नंगा नाच ओढवला. शांघाय-सिंगापूरचं कुक्कू लावून चौदा हजार कोटी3 रुपयांच्या एफएसआयचा बाजार गरम केला गेला ! तुमच्या-आमच्या डोळयांसमोर लुटल्या गेलेल्या लाखो श्रमिकांच्या सार्वत्रिक फसवणुकीची एक काटेरी ठणकती महागाथा...

84)मृत्युंजय-शिवाजी सावंत
We read-555₹घरपोच(शिपिंग फ्री)

असा हा कर्ण, भीष्माचं पतन होईपर्यंत समरांगणात पायच टाकणार नव्हता! इंद्रानं पूर्वीच त्याची कवचकुंडलं आपल्या पुत्रासाठी अर्जुनासाठी म्हणून दानाच्या मिषानं त्याच्यापासून हस्तगत केलीच होती. परशुरामांनी, ‘तुला ऐन युद्धाप्रसंगी ब्रह्मास्त्र स्फूरणार नाही.’ असा मर्मभेदी शाप त्याला दिला होता. महेंद्र पर्वतावरच्या ब्राह्मणाचे ‘तुझ्या रथाचं चक्र, भूमीही युद्धात अशीच रूतवून ठेवील!’ हे उद्गार कोणीही विसरू शकत नव्हतं. जगात अनेकांनी दान केलं असेल पण पण मरणाच्या दारातील एवढं चित्तथरारक, उत्तुंग एकनिष्ठ, अजोड दान तो एकटाच करू जाणत होता पहिला पांडव! ज्येष्ठ कौंतेय! अजोड दानवीर, सूर्यपुत्र!

85)श्रीमान योगी -रणजीत देसाई
We read-555₹घरपोच(शिपिंग फ्री)

रणजीत देसाई शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रसिध्द ऐतिहासिक कादंबरी

86)संभाजी -विश्वास पाटील
We read-655₹घरपोच(शिपिंग फ्री)

औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही! गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी,कवी-राज्यकत्र्याची आणि पराक्रमी सेनानीची गाथासंशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती!आजचे अग्रगण्य प्रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांनासह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यांनी,सागरखाड्यांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांचीचित्तथरारक, वादळी, पण वास्तव गाथा!!

87)स्वामी-रणजित देसाई
We read-300₹घरपोच(शिपिंग फ्री)

महाराष्ट्रातल्या जनतेला जिने मंत्रमुग्ध केले, अशी मराठी सारस्वतातील अजरामर साहित्यकृती. रणजित देसाई : मराठी साहित्याला समृद्ध करणारे थोर साहित्यिक. १९४६ साली `भैरव` या कथेला लघुकथास्पर्धेत वाचकांकडून एकमुखाने पहिले पारितोषिक.

88)वेरूळ लेण्यांतील शिल्पवैभव-राधिका टिपरे
We read-255₹घरपोच(शिपिंग फ्री)

सुमारे दोन किलोमीटरच्या परिसरातील पाषाण खोदून त्यात कोरलेली समूहशिल्पे वेद-उपनिषिदे, पुराणांतील देव-देवता आणि त्यांचे अलौकित्व विषद करतात. सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिाQस्थतीचे प्रतिबिंब या शिल्पकलेतून व्यक्त होते. जीवनमूल्यांना आध्यात्मिक आधार देणारी शिल्पकला आपल्याला जीवन जगण्याची नवी दृष्टी देते. द्वैत-अद्वैत, सगुण-निर्गुण, आकार-निराकार आणि परमेश्वराची निरामयता या गोष्टींना मानवी पातळीवर उद्धृत केले आहे ते या शिल्पकलेनेच. काळ्या पत्थरातून जिवंत झालेला आपला भूतकाळ कोरीव शिल्पांतून मूकपणे आपल्याशी संवाद साधीत असतो.

89)पावनखिंड -रणजित देसाई
We read-225₹घरपोच(शिपिंग फ्री)

महाराज आणि त्यांच्या मावळ्यांविषयी वाचाव तेवढ कमीच आहे. महाराजांचा प्रत्येक मावळा हा हिरे, रत्न मणिकांहूनही अनमोल आहे. महाराज आणि त्यांच्या मावळ्यांविषयी वाचताना अभिमान वाटतो, अनेकदा ऊर भरून येतो, अनेकदा डोळेही पाणवतात, अशी स्वामीनिष्ठा बघन तर प्रश्न पडतो की कुठून येते एवढी स्वामिनिष्ठा, आता त्या साठी स्वामीही तसाच असावा लागतो म्हणा.

90)कास्ट मॅटर्स - सूरज एंगडे
We read-385₹घरपोच(शिपिंग फ्री)

या स्फोटक पुस्तकात, जगातल्या अनेक खंडांमध्ये शिक्षण घेतलेले पहिल्या पिढीचे दलित अभ्यासक, जातीबाबत खोलवर रुजलेल्या धारणा आणि तिचं बहुस्तरीय स्वरूप विशद करतात. दररोज नरकयातना भोगावा लागणारा दलित आणि प्रेम व विनोदबुद्धीनं भारलेली त्याची अपूर्व बंडखोरीही यात आढळते. दलितांमधील अंतर्गत जातीभेदांपासून ते उच्चभ्रू दलितांचं वर्तन आणि त्यांच्यातील आधुनिक काळातल्या अस्पृश्यतेची विखुरलेली रूपं ब्राह्मणी सिद्धांताच्या अटळ प्रभावाखाली कार्यान्वित असतात. जोवर दलित सत्ता मिळवण्यासाठीच्या लढ्यात नेतृत्वस्थानी नसतील आणि ब्राह्मणवादाविरोधात ब्राह्मण उभे राहणार नाहीत, तोवर जातीचं अस्तित्व राहणार असल्याची मांडणी एंगडे करतात.

91)डॅम इट व बरेच काही -महेश कोठारे
We read-755₹घरपोच(शिपिंग फ्री)

सिनेसृष्टीतील जेष्ठ-दिग्गजांचा महेशजींना मिळालेला सहवास व प्रदीर्घ अनुभव नवीन ज्ञानात भर घालणाराच ठरला. कलेची साधना, मनाचे हळवेपण, घोर अडचणींवर केलेली मात, एक सच्चा कलावंत कुठल्या मुशीतून घडतो, तावून-सुलाखून निघतो याची साक्ष खर्‍या अर्थाने ‘डॅम इट व बरेच काही’ मधून दिसते. एक कलावंत व माणूस म्हणून उलगडत जाणारा त्यांचा हा प्रवास, झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त, दिलदार मित्र व मनस्वी लक्ष्याचं चटका लावून जाणं, सतत नवीन प्रयोग व अथक कष्ट, हिंदी-मराठी सिनेमांतील कलात्मक योगदान, जिद्द ही प्रयत्नवादाला साद घालणारी. या पुस्तकातून महेशजी आपल्याशी बोलत आहेत, चाहत्यांशी व रसिक वाचकांशी मनापासून, खिलाडूपणे संवाद साधत आहेत... असेच वाटत राहते, हेच या पुस्तकाचे मर्मस्थान व एका सच्च्या कलावंताचे जीवनगाणे...

92)फेलानी -अरूपा पतंगिया कलिता
We read-445₹घरपोच(शिपिंग फ्री)

सत्यघटनांवर आधारित हे पुस्तक म्हणजे धाडसाची, वांशिक लढ्याची - हिंसेची आणि तग धरून जिवंत राहिल्याची कथा आहे. आतापर्यंतच्या आसाम मधील दोन मोठ्या आंदोलनांनी अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. यांचे राजकीय चित्रण या पुस्तकात आहे. आसामच्या लोकप्रिय कादंबरी लेखिकेने या पुस्तकात सत्ता स्पर्धेमध्ये दिसणारा मानवी जीवनाविषयीचा अनादर आणि अनास्था, सत्तेसाठी चाललेला किळसवाणा खेळ, त्यात सामील झालेल्यांचा ढोंगीपणा आणि वांशिक हिंसेची भयानकता यांचे कठोर आणि निर्भीड शब्दात चित्रण केलेले आहे.

93)भारताची कुळकथा- मधुकर के. ढवळीकर
395₹घरपोच (शिपिंग फ्री)

'भारताचा इतिहास सुरू कधी होतो? महाभारत म्हणजे खरेच ‘जय’ नावाचा इतिहास आहे? इतिहासाचा प्रवास मांडायचा कोणत्या आधारावर? साम्राज्यांच्या उभारणीच्या अन् पतनाच्या आधारावर? धार्मिक प्रभावांच्या पायावर? की साहित्यातील वर्णनांच्या कल्पनांवर? पर्यावरण, आर्थिक अन् सामाजिक बाबी, पुरातत्त्वीय उत्खननातून मिळालेले सबळ पुरावे अशा अभिनव प्रमाणकांचा उपयोग करून प्रागैतिहासिक काळापासून मांडलेला भारताचा इतिहास म्हणजे भारताची कुळकथा'

94)मी फुलनदेवी -मारी तेरेज क्यूनी
405₹घरपोच (शिपिंग फ्री)

रॉबिनहूडचा स्त्री अवतार म्हणजे फूलनदेवी. उत्तर प्रदेशात जन्मलेल्या डाकूराणी फूलनदेवीचं हे खरंखुर आत्मकथन आहे. खालच्या जातीच्या गरीब घरात जन्मलेल्या फूलनने दारिद्र्य आणि अपमानाचं जीणं यांचा सामना केला. अशा समाजात ती टिकून राहिली की जिथे पोटात आणि भिंतींमध्ये माती लिंपावी लागते, अशा समाजात की जिथे भटक्या म्हशीला एखाद्या मुलीपेक्षा जास्त मान दिला जातो. आपल्यापेक्षा तिप्पट वयाच्या विधुराशी लग्न लागल्यावर अवघ्या अकराव्या वर्षी तिला मारहाण, अपमान आणि अत्याचारांना सामोरं जावं लागलं. समाजानं तिची वेश्या म्हणून संभावना केली. तिला ठार करण्यासाठी सुपारी घेतलेल्या डाकूंनी तिला पळवलं. पण ती त्यातूनही जगली आणि स्वतः डाकू बनली. पुरुषांसारखी बंदूक चालवून ती दरोडे घालू लागली. तरीही ती एक स्त्री होती. तिला प्रेमाची भूक होती.

95)शिरसवाडी~गणेश बर्गे
225₹घरपोच (शिपिंग फ्री)

शिरसवाडी म्हणजे लव आणि रुपाली यांच्यातलं अविरत प्रेम, शिरसवाडी म्हणजे लव आणि जयु यांच्यातलं बंधुत्व, शिरसवाडी म्हणजे लव आणि गावकऱ्यांनी केलेल्या एका अनाथ मुलाचा सांभाळ. यातच शिरसवाडीचे कथानक नकळतपणे पकड घेत. वाचण्याचा वेग वाढू लागतो तस आपण शिरसवाडी मध्ये पोहचतो.

96)प्राणिमित्रांच्या जगात ~विजय देवधर ♥️
210₹घरपोच(शिपिंग फ्री)

पक्षी, प्राणी आणि जलचर हे जीवसृष्टीचे अविभाज्य घटक आहेत;पण कुत्रा, मांजर हे पाळीव प्राणी आणि बैल, घोडा, गाय, म्हैस असे काही उपयुक्त प्राणी सोडले, तर आपण इतर प्राण्यांची फारशी दखल घेत नाही. मग हे प्राणी आपण फक्त प्राणिसंग्रहालयातच पाहतो. त्यांचं जीवन, त्यांचं विश्व आपल्याला सर्वस्वी अपरिचितच असतं; पण वाघ-सिंहांसारख्या हिंस्र, आक्रमक प्राण्यांवरही मुलांसारखं प्रेम करणारी माणसं या जगात आहेत.

97)'फिन्द्री -सुनिता बोर्डे
350₹घरपोच (शिपिंग फ्री)

प्रचंड म्हणजे प्रचंड आवडली ही कादंबरी.लेखिकेने ज्याप्रमाणे एका नकोशी असलेल्या मुलीची आणि त्याची आईची दुःख आणि संघर्षपूर्ण असलेली गाथा या कादंबरीतून वाचकांसमोर मांडली आहे, त्याला खरंच तोड नाही.कुठल्याही अलंकारिक भाषेचा वापर न करता,एकदम सोप्या आणि साध्या भाषेत लिहली गेलेली ही कादंबरी वाचकांवर एक प्रकारची मोहिनी पाडते. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत एकाच ठिकाणी खिळवत ठेवणाऱ्या या कादंबरीची खासियत आहे,तिची मांडणी.लेखिकेला जे काही सांगायचं-मांडायचं होतं ते उद्देश त्यांनी खूपच चांगल्या पद्धतीने साध्य केलं आहे.
समस्त स्त्री जातींची सत्य व्यथा आणि कैफियत आपल्याला पावलोपावली यातून वाचायला मिळते.

98)नाही मानियले बहुमता : विवेकवादी चिंतन -नंदा खरे । संकलन-संपादन – विद्यागौरी खरे, मेघना भुस्कुटे, धनंजय मुळी, रविकांत  पाटील
We Read - 650₹ घरपोच (शिपिंग फ्री)

सुमारे तीस वर्षांच्या पटावर घडलेल्या लेखनापैकी हे काही निवडक लेख. वेगवेगळ्या नियतकालिकांसाठी, वेगवेगळ्या काळांत, वेगवेगळ्या विषयांवर लिहिले गेलेले. त्यामुळे त्यांतलं सूत्र शोधणं कठीण आहे; पण अशक्य मात्र नाही. कारण लिहिणारा माणूस एकच आहे. त्या माणसाची विज्ञान-विवेक यांच्यावर असलेली निष्ठा, सगळ्या लोकांना सुखी-समाधानी आयुष्य मिळावं अशी आस, आणि मुख्य म्हणजे - माणसांवर नि जगण्यावर असलेलं निरतिशय प्रेम - सुरुवातीपासून शेवटपर्यंत अभंग राहिलेलं दिसतं. मराठी वाचकाला, आणि त्यातही ज्ञानाकरता भुकेल्या असलेल्या तरुण दोस्तांना विज्ञान, तत्त्वज्ञान, विवेकवाद या विषयांवरचं सकस साहित्य उपलब्ध करून दिलं पाहिजे हा ध्यास त्यामागे आहे.

99)'मृत्यू कथा' ~आशुतोष भारद्वाज 🌿
320₹घरपोच (शिपिंग फ्री)

'मृत्यू कथा' हे वास्तववादी लेखन प्रकारातील एक उल्लेखनीय असेच पुस्तक आहे, असे म्हणावे लागेल. अत्यंत बारकाईने घेतलेली माहिती, चिकित्सकपणे शोधलेले मर्म यामुळे हे वाचन वाचकास समृद्ध करून जाते. या गतिमान, सहानुभूतिपूर्ण, धाडसी आणि कधी कधी तर रक्तच गोठवून टाकेल, अशा पुस्तकातून बस्तरचा प्रत्यक्ष परिसर, कथानकातील पात्रे, तेथील नागरी युद्धाचे सामाजिक परिणाम या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर जिवंत होऊन उठतात.

100)संताजी घोरपडे -रवी मोरे
200₹घरपोच (शिपिंग फ्री)

शिवछत्रपतींच्या गनिमी कावा तंत्राचा शेवटचा पाईक म्हणजे रणमार्तंड संताजीबाबा...!!
आपल्या मनगटावर ज्याने हिंदुस्थानचं रणक्षेत्र बदललं...ज्याच्या घोडदौडीमुळे औरंगजेबाला अकबरापासून चालत आलेला खजिना दख्खनच्या पठारावर ओतावा लागला...!!

101)महात्मा गांधी -लुई फिशर
625₹घरपोच (शिपिंग फ्री)

गांधी सर्वांपासून निराळे होते. त्यांनी ईश्वर किंवा धर्माचा प्रचार केला नाही. ते जणू जागते वागते प्रवचनकार होते. त्यांनी असे दाखवून दिले की, आधुनिक काळात आणि या काळातील राजकारणातही त्या सर्वांची तत्त्वे लागू करता येतील. सत्ता, संपत्ती आणि अहंकारातून माणसाला गिळंकृत करणाऱ्या आधुनिक जगात गांधींच्यासारखा एखादाच चांगला माणूस निर्माण होणे, हे अतर्क्य होते. सर्वच दृष्टींनी ते अत्यंत व्यवहारी होते. आयुष्य हे विविध प्रकारच्या जिवंतपणाने भरलेले असते याची त्यांना जाण होती.

102)दस्तावेज -आनंद विंगकर
625₹घरपोच (शिपिंग फ्री)

आनंद विंगकर या मराठीतील प्रथितयश कवी आणि लेखकाची 'दस्तावेज' ही कादंबरी म्हणजे आत्मचरित्र आणि सर्जनशील कथन या दोन वाङ्मयप्रकारांचा हृद्य आणि प्रभावी असा मेळ आहे. परिवर्तनवादी राजकीय चळवळीतील एका कार्यकर्त्याच्या आत्मशोधाचा हा प्रदीर्घ प्रवास आपल्याला अतिशय गुंतागुंतीच्या व्यवस्थांच्या गाभ्याचे दर्शन घडवतो.

103)वॉल्डन -हेन्री डेव्हिड थोरो
325₹घरपोच (शिपिंग फ्री)

वॉल्डन हे अमेरिकन ट्रान्सेंडेंटलिस्ट लेखक हेन्री डेव्हिड थोरो यांचे पुस्तक आहे. हा मजकूर लेखकाच्या नैसर्गिक वातावरणातील साध्या राहणीचे प्रतिबिंब आहे. हे काम स्वातंत्र्याची वैयक्तिक घोषणा, सामाजिक प्रयोग, आध्यात्मिक शोधाचा प्रवास, व्यंगचित्र आणि - काही प्रमाणात - स्वावलंबनासाठी एक पुस्तिका आहे.

104)अखेरचे शिलेदार -पी साईनाथ
325₹घरपोच (शिपिंग फ्री)

अखेरचे शिलेदार' या पुस्तकात स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ असलेले काही जण त्यांची गोष्ट आपल्याला सांगतात. आदिवासी, दलित, इतर मागासवर्गीय,
मुस्लीम, हिंदू आणि शीख पंथाची माणसं आहेत ही. ते वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारताच्या विविध प्रांतांतली, विभिन्न संस्कृती जपणारी आणि वेगवेगळ्या पाश्वभूमीची ही मंडळी आहेत. काही आस्तिक आहेत; तर काही नास्तिक. काही डावे, काही गांधीवादी; तर काही आंबेडकरवादी.

105)तिसरा स्तंभ – रघुराम राजन
425₹घरपोच (शिपिंग फ्री)

सरतेशेवटी, या पुस्तकातील इतिहासातला फेरफटका आशावाद सूचित
करणारा आहे. आपली जीवनमूल्ये अपरिवर्तनीय नाहीत, ती बदलतात.
डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर म्हणाले होते, ‘वैश्विक नैतिकतेची
कमान खूप उंच आहे; पण ती न्यायाकडे झुकणारी आहे. छोट्या छोट्या
तुकड्यांमध्ये इतिहासाचे अवलोकन केले, तर द्वेषाचे बी पेरून कलहाचे
पेव फोडण्यासाठी वंशवाद आणि लढाऊ राष्ट्रवाद जगात पुन्हा पुन्हा डोके
वर काढत असतात असे वाटेल, त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होते.

106))द आंत्रप्रन्यूर -शरद तांदळे
We read किंमत - 225₹घरपोच (शिपिंग फ्री)

द आंत्रप्रन्योर हे पुस्तक माणसाला विशेषता तरुणांना स्वताची औकात दाखऊन देणारं पुस्तक आहे. शरद तांदळे सरांनी त्यांचा जीवन प्रवास मंडला आहे.

~We Read 🌿♥️

https://chat.whatsapp.com/J58KV2PCm97CRz4L8K7v8o

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼