पोस्ट्स

डियर तुकोबा ♥️

इमेज
जगतगुरु तुकोबा माझ्यासाठी खरे मोटिवेशनल स्पिकर आहेत.तुकोबाच्या प्रत्येक अभंगात ऊर्जा आणि प्रेरणा असते.म्हणूनच मी वेळोवेळी तुकाराम बावांच्या अभंगाची गाथा व तात्यांनी लिहलेलं विद्रोही तुकाराम चाळत असतो.त्यातून मला कायम जगण्याची आणि परिस्थितीशी लढण्याची प्रेरणा आणि हिम्मत मिळत असते.शेकडो वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या या महान विभूतीचे विचार आज सुद्धा तेवढेच प्रासंगिक आहेत, जेवढे त्याकाळात होते.म्हणूनच "तुका आकाशा एवढा" आणि "तुका आशेचा किरण "म्हणतात ते उगाच नाही. तर हे सर्वकाही सांगायचं कारण हे की, मी काही दिवसांपूर्वी विनायक दादा लिखित "डियर तुकोबा"या एका आगळ्या वेगळ्या आणि शानदार पुस्तकाचा प्रवास पूर्ण करून आलो.आणि नेहमीप्रमाणे या पुस्तकाच्या सुद्धा प्रेमात बुडालो. (यावेळी अपेक्षेप्रमाणे जास्तच.) काहीतरी सुंदर आणि अप्रतिम वाचल्याची प्रचिती हे पुस्तक वाचून मला आली.जणू मी 'तुकोबाच्या' सानिध्यात वावरून आलोय असं मला वाटतंय.यामध्ये रेखाटलेल्या अप्रतिम अश्या चित्रांतून मला तुकोबा डोळ्यांनी बघून आल्यासारखं वाटतंय.पहिल्या 'पृष्ठापासून तर शे...

द ओल्ड मॅन अँड द सी ♥️

इमेज
1950 साली हेमिंग्वे लिखित या कादंबरीचा पुलं देशपांडे यांनी केलेला अनुवाद "एका कोळियाने"पूर्वी किमान दोन वेळा वाचलेलं होतं तर आता नुकतंच 'भारती पांडे" यांनी केलेला या सेम पुस्तकाचा अनुवाद सुद्धा वाचून पूर्ण केलं.तर आता लवकरच मुळ इंग्रजी पुस्तक सुद्धा वाचायला घेईन.कारण हे पुस्तक म्हणजे एक अप्रतिम असा प्रवास आहे,जो प्रत्येकाने करायला हवा.मुळात अनुभवायला हवा.यातून बोध घेऊन खूप काही शिकायला हवं आणि आयुष्यात ते रुजवायला हवं.🌿 या पुस्तकाच्या लेखकाला नोबेल पारितोषिक मिळाला होता आणि यामध्ये या कादंबरीचा मोठा वाटा होता असं म्हणू शकतो.या कादंबरीची कथा ही खूप उत्कृष्ट असून खूप काही शिकवून जाणारी आहे.जी वाचकाला आपल्या प्रेमात पाडते. साधी आणि सरळ वाटणारी ही शौर्य कथा खूपच रोचक आणि इंटरेस्टिंग आहे.एका कोळ्याच्या प्रवासाची, एका माशाबरोबरच्या आणि विशाल समुद्राबरोबरच्या त्याच्या एकाकी झगड्याची आणि जिंकूनही हरण्याची ही आगळी वेगळी कहाणी आहे.पंचमहाभूतांनी माणसासमोर उभ्या केलेल्या आव्हानाचे, त्यातल्या सौंदर्याचे आणि दुःखाचे एक अद्वितीय आणि कालातीत वर्णन म्हणून या कादंबरीचा उल्लेख करावा ल...

प्रकाशवाटा ♥️

इमेज
रात्री डॉ.प्रकाश बाबा आमटे लिखित "प्रकाशवाटा"हे त्यांचं आत्मकथन तिसऱ्यांदा वाचून पूर्ण केलं.आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टीकोन देणारं हे पुस्तक माझ्या फार फार आवडीचं आहे.या आत्मचरित्रातून मला नेहमी खूप प्रेरणा आणि ऊर्जा मिळत असते.या पुस्तकातून आज पर्यत खूप काही शिकलोय आणि शिकत असतो. आयुष्याकडे व आयुष्यातील येणाऱ्या समस्यांकडे बघण्याची एक नवीन दृष्टी मिळते.तर वेगवेगळ्या समस्यांवर मात करण्याची हिम्मत मिळते. प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर.आयुष्यात येणाऱ्या अडीअडचणीवर मात करतं सतत चालतं राहणे,मुळात हे फार कठीण काम असतं.हे काही सर्वांनाच जमतं नाही.आपल्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी तर सर्वंच जगतात पण समाजातील दबलेल्या,कुचलेल्या आणि वंचित व दुर्लक्षित घटकांतील लोकांसाठी जगायला किंवा त्यांच्याबद्दल विचार करायला किती जणांकडे वेळ असतो ?  आज आपल्याला योग्य तो आहार आणि चांगल्या आरोग्य सुविधा मिळतात.पण त्या रानात मानवी वस्तीपासून कोसो दूर राहणाऱ्या आदिवासी समाजाचा काय ?त्यांच्यापर्यंत या बेसिक सुविधा खरंच पोहचतात का ?यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आ...

इजिप्सी ♥️

इमेज
सुरुवातीला आपल्या अप्रतिम प्रस्तावनेत लेखिका दिपा देशमुख मॅम लिहितात :- हजारो वर्षांपूर्वीचे पिरॅमिड कुणी बांधले असतील, त्यांच्या आतली रचना, त्या वेळी प्रगत तंत्रज्ञान नसताना हे कसं शक्य झालं असेल, तिथल्या राजांचे / महत्त्वांच्या लोकांचे मृतदेह म्हणजेच ममी एका विशिष्ट तऱ्हेच्या पेटीत जतन का कराव्या वाटल्या असतील, ममीबरोबर सोनं-चांदी आणि हजारो वस्तू का ठेवल्या जात असतील, इजिप्शियन लोकांच्या चित्रविचित्र देव-देवता कशा होत्या, त्यांची हायरोग्लिफ नावाची अत्यंत क्लिष्ट अशी चित्रलिपी काय सांगू पाहत होती, आजवर तिथे होऊन गेलेले तीनशे फेरो म्हणजे कोण होते, त्यांचं महत्त्व काय, तुतानखामून कोण होता, रामसेस या फेरोचे असंख्य पुतळे का बांधले गेले, या फेरोचं काम काय होतं, नेफेर्तिती, हॅटशेपसूत आणि अनेक राण्या कशा होत्या, त्यांची वैशिष्ट्यं कोणती अशा अनेक प्रश्नांची उत्तरं 'इजिप्सी' वाचताना मिळतात. आणि खरंच मुळात एवढंच कारण हे पुस्तकं वाचायला पुरेसं आहे.कारण या सर्व प्रश्नांची दिलेली उत्तरे ही खूप इंटरेस्टिंग आणि रोचक आहे.जे वाचणे एक वाचकांसाठी मेजवानीच ठरते.🌿 __________________★★______...

साखळीचे स्वातंत्र्य ♥️

इमेज
खरोखर "हंगर स्टोन" चं काम  करणार एक अप्रतिम पुस्तकं 🌿 अशक्य वाटणाऱ्या किंवा कधी ध्यानीमनीही नसणाऱ्या शक्यतांचा प्रत्यय ‘ब्लॉकचेन’मुळे आपल्याला येऊ लागला आहे. केंद्रीकरणामुळे निर्माण होणारी मक्तेदारी थांबणे, त्यामुळे विकेंद्रीकरणाचे वाढणारे महत्त्व, योग्य व्यक्तींना योग्य मोबदला मिळवून देण्याचे स्वप्न, पारदर्शकता, माहितीचा योग्य मोबदला, एकाधिकारशाही किंवा संघशाहीपासून सुटका करून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचे महत्त्व अशा विचारांचे पुनरुत्थान झाले. ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाकडे एखादी तांत्रिक भपकेदार जादूगिरी म्हणून न पाहता, या विचारांचे द्योतक म्हणून पाहिले तर या तंत्रज्ञानाचा विकास वा वापरदेखील त्या दिशेने होईल. कारण हे विचार अमलात आणण्यासाठी फक्त ‘ब्लॉकचेन’ पुरेसे नाही, त्यास इच्छाशक्ती, नेतृत्व, जनसामान्यांचा आधार वा योग्य दबाव, हे सारे आवश्यक आहे.  कोणतीही महत्त्वाची गोष्ट ‘किचकट, गुंतागुंतीची’ आहे किंवा हा ‘फक्त तज्ज्ञ मंडळींचा विषय’ आहे असे दर्शवून तीपासून जनसामान्यांना दूर ठेवले जाते. ही नीती आर्थिक, वैज्ञानिक, सामाजिक, राजकीय वा वित्तीय क्षेत्रांमध्ये सर्रास वापरली ...

वाट तुडवताना ♥️

इमेज
मी 'रोज एक पाटी शेण गोळा करतो, मग देशील पुस्तक ?' आई :-  'आरं शेणकुट्याचं पैसं पुस्तकावर उधळलास तर खाशील काय? या दोन प्रश्नांच्या सोबत वाढणारं लेखकाचं हे मन आहे. या दोन प्रश्नांच्या संघर्षातला आलेख त्यात आहे. या दोन प्रश्नांमधल्या दोन भुकांनी जळणासाठी त्याला उकीरडे शोधायला लावले आहेत, चिखल वाहायला लावले आहे, डिंक गोळा करायला लावला आहे, खांद्याला घट्टे पडेपर्यंत पाणी वाहायला लावले, हमाली करायला लावली, आतडी जाळण्यासाठी भुताचा नैवेद्य खायला लावला, नळाला तोंड लावून भुकेवर मारा करून घेतलेला आहे, सायकलीचे पंक्चर काढले आहेत, पेपरचे गठ्ठे बांधून बसमध्ये टाकले, बुक बाइन्डिग केले, कंपाउंडर म्हणून काम केले, आणि 'भाकरी युगाचा शाप' कशी बनली आहे हे अनुभवले. भाकरीचा अभावसुद्धा त्याचे अर्थपूर्ण स्वेतर होऊन गेला. या अभावाने त्याला पुस्तकांपासून दूर ठेवले. पण एक भूक दुसऱ्या भुकेची भूक वाढवत असते; या न्यायाने त्याची पुस्तकांविषयी भूक तीव्र होत गेली.🌱 उत्तम कांबळे हे लेखक माझ्या काही निवडक आवडीच्या लेखकांच्या यादीत नेहमी अग्रणी असतील.यांच्या लिखाणाचा मी फार चाहता आहे.सरांनी लिहलेलं सर...

मी अल्बर्ट एलिस ♥️

इमेज
 डॉ.अंजली जोशी लिखित डॉ.अल्बर्ट एलिस यांच्या जीवनप्रवासाचा व व्यक्तिमत्त्वाचा मागोवा घेणारी ही आत्मचरित्रात्मक कादंबरी प्रत्येकाने वाचायलाच हवी अशी आहे. अमेरिकेतील सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ.अल्बर्ट एलिस यांच्या जीवनावर लिहलेली ही मराठीतील दर्जेदार कादंबरी मी 2 दिवसांपूर्वी परत एकदा वाचून संपवली.आणि पुढे भविष्यात सुद्धा वेळोवेळी मी ही कादंबरी वाचत राहणार आहे एवढं नक्की.कारण प्रत्येक वेळी या कादंबरीतून नवीन आयाम,अर्थ आणि तत्वज्ञान उमजत, समजत जाणारं आहे.आपल्या आयुष्यातील असंख्य प्रश्नांची उत्तरे आपल्याला या कादंबरीतून मिळत जातात.अगदी सोप्या व मुद्देसूद भाषेत जीवनाचा मूलभूत तत्वज्ञान आणि मानसशास्त्राची एक रोचक आणि भन्नाट सफर घडवून आणण्याचं काम ही कादंबरी खूपच उत्कृष्ट पद्धतीने करते.डॉ.एलिस सरांची असामान्य बुद्धिमत्ता,बालवयातलं प्रगल्भ वाचन , तत्त्वज्ञानाचा त्यांनी केलेला गाढ अभ्यास , शारीरिक दुर्धरतेवर त्यांनी केलेली मात आणि मृत्युपर्यंत अखंड कार्यरत राहून बुद्धिनिष्ठतेची कास न सोडण्याचा त्यांचा कणखरपणा , हे सर्वच लेखिकेप्रमाणे आपल्याला सुद्धा विलक्षण आणि थक्क करून सोडण...